गावातील समस्या: कौठा गावात अखेर लोकवर्गणीतून मुरुम टाकण्यास युवकांकडून सुरुवात – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
गावातील महत्त्वाची समस्या रस्त्याचे असून ती सोडवण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याने गावातील तरुणांनी लोकवर्गणीतून कौठा बसस्थानक पासून ते जिल्हा परिषद शाळा पर्यंत रस्ता जे.सी.बी.च्या साहाय्याने मुरुम टाकण्याचे काम हाती घेतले. युवकांनी सर्वांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातल्याने गावात चर्चेचा विषय बनला आहे. इतर वेळी निवडणुका आल्या की लाखो रुपये उधळण करणारे रस्ता दुरुस्तीसाठी पुढे येत नसल्याने खंत व्यक्त हाेत आहे.
नेवासा तालुक्यातील कौठा ग्रामस्थांना रस्त्यासाठी मोठा सामना करावा लागतो. परंतू जिल्हा परिषद, पंचायत समिती, किंवा ग्रामपंचायतमध्ये ही कामे करून घेण्यासाठी कोणी धाडस करत नाही. आज शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी एकही रस्ता चांगला राहिला नाही. खड्डे, चिखल, काटेरी झुडपे अतिक्रमण यामुळे शेतावर जावे कसे हा मोठा प्रश्न उपस्थित केला जातो.
निवडणूक असेल तर लाखो रुपये खर्च होतात पण मुरुम टाकण्याचे काम कोणी करत नाही. विद्यार्थी व दूध उत्पादक, शेतकऱ्यांना आता जाण्यासाठी एकही रस्ता चांगला नाही. रस्ता हिच मोठी शोकांतिका असून सर्वांना त्रास होतो. एखादा अत्यावस्था रुग्ण गावापर्यंत कसे घेऊन जावे ही मोठी अडचण आहे. परंतु कोणीच पुढाकार घ्यायला तयार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गावातील तरुणांनी लोकवर्गणीतून कौठा बसस्थानक पासून ते जिल्हा परिषद शाळेपर्यंत खड्डे बुजवून मुरुम टाकण्याचे काम सुरू केले. यामुळे सर्वांच्याच डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे, अशी प्रतिक्रिया या तरुणांनी पुढाऱ्यांना दिली आहे. शेतकरी शेतावर जाताना जीव मुठीत घेऊन ये-जा करतात. तरुणांनी केलेल्या कामाचे ज्येष्ठ नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares