नेतृत्व: शांतारामतात्या आहेर : स्वतत्त्वांशी बांधील असणारे स्वाभिमानी नेतृत्व – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
शेती, शिस्त आणि शिक्षण ही त्रिसूत्री जपणारे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यतत्पर असणारे तात्या बाबा अर्थात माजी आमदार शांतारामतात्या आहेर हे शुक्रवारी (दि. २१) आम्हास सोडून गेले. शेतकरी कुटुंबात जन्मास आलेल्या तात्यांना नेतृत्व मिळाले तेही संघर्षातून. शेतकरी संघटनेचे आंदोलन असो, वसाका साखर कारखान्याचे विविध प्रश्न असोत की सर्वसामान्य जनतेच्या समस्या असोत ते नेहमी आघाडीवर लढले. मात्र हे करत असताना त्यांनी कधीही तत्त्वांना मुरड घातली नाही की स्वाभिमान सोडला नाही. जशी मैत्री निभावली तितक्याच ताकदीने शत्रुत्वही निभावले, त्यामुळे भलेभले त्यांच्यापासून वचकून रहात.
ते शेतकरी संघटनेपासून सामाजिक चळवळीत उतरले असले तरी त्यांच्या राजकारणाची सुरुवात वसाका साखर कारखान्याच्या संचालक पदापासून सुरू झाली. १९८८ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी थेट चेअरमनपद गाठत वसाकाला स्थिरता आणि समृद्धी मिळवून दिली. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या आवाहनास प्रतिसाद देत ते राष्ट्रवादीत सक्रिय झाले. या नवीन पक्षात जाण्याची हिंमत दाखवणारे ते जिल्ह्यातील पहिले आमदार होते.
१९९४ मध्ये जिल्ह्यात एकाधिकारशाही असताना आणि स्वतःचे मत नसताना ते विधानपरिषद सदस्य झाले, त्यामुळे राज्यस्तरावरचे प्रतिनिधित्व व वसाका चेअरमन या माध्यमातून शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यास गती दिली. सलग नऊ वर्षे ते वसाकाचे चेअरमन राहिले. तालुक्यातील प्रत्येक निवडणुकीतील त्यांचा सहभाग विजयश्री खेचणारा असायचा. शेतकी संघ, बाजार समिती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विधानसभा निवडणूक यांत त्यांची साथ उमेदवारांना बळ पुरवत असे. त्यामुळेच आज अनेक नेते त्यांच्याविषयी कृतज्ञ आहेत. – शब्दांकन : सचिन सूर्यवंशी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares