लढाई: शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याच्या निषेधार्थ कृषी कार्यालयाला घेराव ; अशोक कानडे यांचा इशारा – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असून विमा कंपन्या शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा आरोप करीत फसवणूक खपवून घेतली जाणार नाही, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा उभा केला जाईल, ही स्वाभिमानाची लढाई असून शासनाने याची गंभीर दखल घ्यावी, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा अशोक कानडे यांनी दिला आहे.
विमा कंपनीने शेतकऱ्यांना सोयाबीनची तुटपुंजी मदत करून चेष्टा केल्यामुळे शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालय येथे विमा कंपन्यांच्या विरोधात अधिकाऱ्यांना घेराव घातला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अरुण नाईक, ज्ञानेश्वर मुरकुटे, राजेंद्र कोकणे, ॲड. समीन बागवान, भाऊसाहेब पारखे, दिलीप मुठे, बाबासाहेब कोळसे, हरिभाऊ बनसोडे, बाळासाहेब विघे, संतोष मोकळ, सरपंच डॉ. राजाराम राशीनकर, सतीश बोर्डे, कार्लस साठे, सुरेश पवार, आबा पवार, विलास शेजुळ, राजेंद्र औताडे, सोमनाथ पाबळे, आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऐन दिवाळीच्या तोंडावर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले असताना विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना तुटपुंजी भरपाई मिळाली. शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करण्यात आली. विमा कंपन्यांचे जिल्हा प्रतिनिधी फोन उचलत नाहीत, हप्ते भरुन घेतात. तलाठी, कृषी सहाय्यक यांनी पंचनामे करून अहवाल दिलेला असूनही दीड हजार रुपये हेक्टरी मदत केली. हेक्टरी ५० हजार रुपये सरसकट नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी विलास नलगे, तालुका कृषी अधिकारी अशोक साळी, विमा कंपनीचे प्रतिनिधी स्वप्नील मोकळ, आदींना निवेदन देण्यात आले. सर्व शेतकऱ्यांची सहानुभूती ठेवा, ओला दुष्काळ जाहीर करा, कर्जमाफीचे ढोंग नको, चुकीचा आकस निकष नको, कष्टाळू राजा इमानदार हाय, आत्महत्येला सरकार जबाबदार आहे, अशा अशा घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares