४७०० कोटींची मालमत्ता असणाऱ्या नेहा नारखेडे आहेत तरी कोण? – Loksatta

Written by

Loksatta

सायली परांजपे
गेल्या आठवड्यात आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२२ प्रसिद्ध झाली. एकंदर धनाढ्यांच्या संपत्तीबद्दल जनसामान्यांमध्ये बऱ्यापैकी औत्सुक्य असल्यामुळे अशा याद्यांवर बरीच चर्चा होते. जगभरातील श्रीमंत भारतीयांची यादी, त्यांच्या संपत्तीत वर्षभरात झालेली वाढ असे अनेक तपशील आयआयएफएलच्या वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये आहेत.
भारतातील उद्योजक गौतम अदाणी अर्थातच या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत, तर त्यांचे भाऊ विनोद शांतीलाल अदाणी सर्वांत श्रीमंत एनआरआय ठरले आहेत. झेप्टोचा संस्थापक अवघा १९ वर्षीय कैवल्य वोहरा यादीतील सर्वांत तरुण सदस्य ठरला आहे. मात्र, या यादीतील ३३६व्या क्रमांकावरील नावाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ते नाव म्हणजे नेहा नारखेडे.
आणखी वाचा : नवरात्रीचे नऊ रंग नेमके कसे ठरवले जातात? जाणून घ्या यामागे दडलेले गुपित
अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे स्थायिक झालेल्या ३७ वर्षांच्या नेहा नारखेडे या यादीतील सर्वांत तरुण सेल्फ-मेड भारतीय स्त्री उद्योजक ठरल्या आहेत. त्यांची मालमत्ता सुमारे ४७०० कोटी रुपये एवढ्या मूल्याची आहे. हुरुन इंडिया रिच लिस्टमधील या टिपिकल मराठी आडनावाच्या स्त्रीबद्दल त्यामुळे चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. नेहा यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांची सोशल मीडियावरील प्रोफाइल्स पुरेशी बोलकी आहेत. फेसबुक किंवा इन्स्टाग्रामसारख्या व्यक्तिगत माहिती देणाऱ्या सोशल मीडिया साइट्सवरून नेहा नारखेडे यांच्याबद्दल फारशी माहिती मिळत नसली, तरी लिंक्डइनसारख्या प्रोफेशनल साइट्सवरून नेहा यांच्या प्रवासाबद्दल बरेच काही जाणून घेणे शक्य आहे.
आणखी वाचा : ‘पीसीओडी’मध्ये उपयुक्त आहार विहार
नेहा यांचा जन्म आणि शिक्षण पुण्यात झाले आहे. पुणे विद्यापीठातील पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नोलॉजीमधून त्यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनीअरिंगची पदवी घेतली. कंपन्यांद्वारे मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे. फॉर्च्युन हंड्रेड कंपन्यांपैकी ६० टक्के कंपन्या अपाचे काफ्काचा वापर करत आहेत, अशी माहिती स्वत: नेहा यांनी, २०१९ साली लंडनमध्ये झालेल्या अपाचे काफ्का समिटदरम्यान दिली होती. आजही नव्याने स्थापन होणाऱ्या कंपन्या या प्लॅटफॉर्मचा वापर करतात, असे नेहा यांनी सांगितले.
सध्याच्या उद्योगविश्वात होत असलेले बदल आणि तंत्रज्ञानाला प्राप्त होत असलेले केंद्रीय स्थान याबद्दल नेहा म्हणतात, “पूर्वी तंत्रज्ञान विभागाचा विचार उद्योगातील सहाय्यकारी विभाग म्हणून केला जात होता आणि सीआयओकडे तांत्रिक प्रमुख म्हणून बघितले जात होते, आज तंत्रज्ञान हाच प्रमुख उद्योग झाला आहे आणि सीआयओ या उद्योगाचा नेता झाला आहे.”
मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares