Latest Marathi News | ‘ओला दुष्काळ’ साठी पवारांना साकडे – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
पाचोरा : पाचोरा व भडगाव तालुक्यांत परतीच्या पावसाने तोंडाशी आलेला खरिपाचा घास हिरावून नेला असून, शेतकरी आर्थिक विवंचनेत अडकला आहे. शेतकऱ्यांना रब्बीसाठी आधार व मानसिक धीर देण्यासाठी दोन्ही तालुक्यांत ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा, या मागणीसाठी विरोधी पक्षनेते अजित पवार यांची पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक दिलीप वाघ यांनी पुणे येथे भेट घेऊन त्यांना साकडे घातले.
पाचोरा व भडगाव तालुक्यांत राष्ट्रवादीची विधायक ध्येयधोरणे व समाजोपयोगी कामे घराघरांत पोचविण्यासाठी तसेच शेतकरी, शेतमजूर, कामगार, बेरोजगार, गोरगरीब, कष्टकरी, मध्यमवर्गीयांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या सोडवणुकीसाठीच्या नियोजनासाठी वाघ यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह २ ऑक्टोबरपासून जनसंवाद यात्रा सुरू केली आहे. (Former MLA and Chief Administrator of Agriculture Produce Market Committee Dilip Wagh is Meeting Ajit Pawar in Pune Discuss about problems regarding Wet Drought Jalgaon Agriculture News)
हेही वाचा: Jalgaon : खरिपातील 60 टक्के कापूस घरात मात्र भाव मिळेना; खंडीचे दर 1 लाखावरून घरसले
भडगाव तालुक्यातील संपूर्ण गावांना भेटी देऊन पाचोरा तालुक्यात जिल्हा परिषद गटनिहाय जनसंवाद यात्रा सध्या सुरू आहे. या जनसंवाद यात्रेदरम्यान ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी संवाद साधताना शेतकऱ्यांनी मांडलेल्या अडचणी व समस्यांच्या आधारे शेतकरी आर्थिक विवंचनेत अडकला असल्याचे स्पष्ट झाले असून, परतीच्या अतिवृष्टीमुळे खरिपाचे कापूस, मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी हे उत्पादन पूर्णतः नष्ट झाल्याने इतर राज्यांबाबतच्या धोरणाप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातही पावसमुळे झालेल्या नुकसानीची नोंद घ्यावी.
पाचोरा व भडगाव तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते पवार यांचेकडे करून त्यांना याबाबतचे साकडे घातले. तसेच जिल्हासह मतदारसंघातील राजकीय हालचाली, विविध राजकीय पक्षांची चाललेली धावपळ व प्रयत्न, स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकीचे संभाव्य चित्र या संदर्भातही दिलीप वाघ व अजित पवार यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. वाघ यांनी राजकीय व शेती विषयक सविस्तर माहिती पवार यांच्याकडे मांडली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही खरीपाच्या नुकसानीसंदर्भात माहिती देणार असल्याचे वाघ यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा: Jalgaon : थंडी सुरू होताच उबदार कपडे खरेदीसाठी ग्राहकांची होतय गर्दी
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares