ऊस दराबाबत पालकमंत्री जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक घेणार – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
पालकमंत्र्यांसमवेत ऊसदरप्रश्नी बैठक घेऊ
खासदार माने यांचे ‘आंदोलन अंकुश’ला आश्वासन
शिरोळ, ता. ३०ः ‘आंदोलन अंकुश’चे कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी रविवारी खासदार धैर्यशील माने यांचा ताफा अडवला. ‘तुम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहात, यामुळे ऊसदरासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी,’ अशी मागणी केली. यावेळी खासदार माने यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत ऊसदराप्रश्नी बैठक घडवून आणण्याचे आश्वासन दिले.
शिरोळमधील शिरटी फाटा येथे ऊस वाहतूक रोखण्याकरिता ‘आंदोलन अंकुश’चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांच्यासह सर्व पदाधिकारी तळ ठोकून बसले आहेत. दरम्यान, खासदार धैर्यशील माने यांचा ताफा शिरोळहून नृसिंहवाडीकडे रवाना झाला, मात्र ते आंदोलनस्थळी थांबले नाहीत. यामुळे खासदार माने पुन्हा नृसिंहवाडीहून शिरोळकडे येत असताना शेतकऱ्यांनी शिरटी फाटा येथे त्यांचा ताफा अडविला. यावेळी शेतकऱ्यांनी ऊसदराबाबत खासदार माने यांच्याकडे आपली भूमिका मांडली. खासदार माने व चुडमुंगे यांच्यात याप्रश्नी चर्चा झाली. यावेळी चुडमुंगे यांनी सांगितले की, या परिसरातील अनेक साखर कारखान्यांनी ऊसदर जाहीर न करताच गाळप हंगाम सुरू केला आहे. कारखानदार हे पोलिसांना हाताशी धरून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करीत आहेत. याबाबत लोकप्रतिनिधी या नात्याने आपण शेतकऱ्यांना चांगला ऊसदर मिळावा, यासाठी प्रयत्न करावेत.
खासदार धैर्यशील माने म्हणाले, ‘मीही शेतकऱ्यांचा प्रतिनिधी आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य ऊसदर मिळावा, याकरिता पालकमंत्री दीपक केसरकर यांची वेळ घेऊन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासमवेत आंदोलक व शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि साखर कारखानदार यांची संयुक्त बैठक घडवून आणण्यासाठी प्रयत्न करू. आंदोलन चिघळण्याअगोदर ऊसदराबाबत निश्चित तोडगा काढण्याचे माझे प्रयत्न राहतील.’
यावेळी आंदोलन अंकुशचे जिल्हाध्यक्ष राकेश जगदाळे, तालुकाध्यक्ष दीपक पाटील, भूषण गंगावणे, अक्षय पाटील, कृष्णात देशमुख, राजाराम काटकर, महेश जाधव यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares