गांधीग्राम येथील पूल बंद: पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्या; ग्रामस्थांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
अकाेला मार्गावरील गांधीग्राम येथील पूल वाहतुकीसाठी संपूर्णपणे बंद करण्यात आला आहे. दरम्यान पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सोमवारी (31 ऑक्टोबरला) ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष दिलेच नाही, अशा शब्दांत ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर समस्यांचा पाढाच वाचला. यावेळी शेतकरी, विद्यार्थ्यी, समान्य ग्रामस्थ उपस्थित हाेते. प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून पर्याय शाेधण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
गांधीग्राम जवळील पूर्णा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाला 150 वर्षापेक्षा जादा काळ झाला आहे. पुलावरून वाहतूक बंद आहे. मात्र, हा पूल बंद असल्याने समस्या निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी नीमा आराेरा यांना निवेदन सादर केले. यावेळी राजेश मंगळे, विजय देशमुख, प्रशांत गावंडे, मनाेहर शेळके, रवी पाटील अरबट, डाॅ. पुरुषाेत्तम दातकर, दिलीप लेलेकर, गजानन देशमुख, प्रदीप चाेरे, गणेशराव खाेडके, कालीखाॅ खान, सुनील अघडते, प्रतापराव मेहसरे आदी हाेते. अकाेला-अकाेट राेडवरील गांधी ग्राम येथील पूल बंद असल्याने 25 पेक्षा जास्त गावे प्रभािवत झाली आहेत.
ग्रामस्थ-जिल्हाधिकारी संवाद
1) गांधीग्राम येथील पूल बंद असल्याने विद्यार्थी, शेतकऱ्यांसह सर्वच घटकातील व्यक्तींना त्रास हाेत आहे. शेतकऱ्यांचा शेतमालाची विक्री करताना अचडणी निर्माण हाेत असून, याेग्य दरही मिळत नाही. त्यामुळे तातडीने मार्ग काढण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. यावर जिल्हाधिकारी पर्याय किंवा पर्यायी मार्ग कोणता असा सवाल केला.
2) पुलाचे काही गाळे बंद आहेत. भेग पडलेल्या ठिकाणी व्यवस्थित काँक्रिटीकरण केल्याने वाहतूक तात्पुरती सुरू होई शकते, असे ग्रामस्थ म्हणाले. याबाबत जिल्हा नियाेजन समितीच्या सभेतही प्रश्न उपस्थित करण्यात आला हाेता. मात्र यावर अपेक्षित ताेडगा निघाला नसून, आमचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने तरी पुढाकार घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
3 ) गांधी ग्राम येथील पूल ऑर्च पद्धतीचा असून, असा पूल काेसळत नसल्याचे काहींचे म्हणणे हाेते.
मनस्ताप अन् आर्थिक नुकसानही
गांधी ग्राम येथील पूल बंद असल्याने ग्रामस्थांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून आर्थिक नुकसानही हाेत आहे. 70 ते 80 कि.मी.चा फेरा पडत आहे. वाहतूक बंद असल्याने किनखेड पूर्णा येथील पाटील व पळसाेद येथील व्यक्तिला वेळीच वैद्यकीय उपचार मिळू शकले नाहीत. परिणामी त्यांचा मृत्यू झाला, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सात दिवसाच्या आत वाहतूक सुरू न झाल्यास आंदाेलन छेडण्यात येईल, असाही इशाराही ग्रामस्थांनी दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares