देशाचे कृषीमंत्री कोण हो..तोमर, तो..मर; नेमक अस का म्हणाले भुजबळ ? – My Mahanagar

Written by

You subscribed MyMahanagar newsletter successfully.
Something went wrong. Please try again later.
नाशिक : राज्यात अतिवृष्टीने शेतकर्‍यांंचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकरयांचे अश्रू पुसण्याची गरज आहे. मात्र ते करायचे सोडून राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार अधिकार्‍यांना तुम्ही दारू पिता का असे विचारतात. देशाचे कृषीमंत्री कोण असे त्यांनी उपस्थितांना प्रश्न केला. तेव्हा उपस्थितांमधून तोमर असा आवाज आला. भुजबळांनी तो.. मर असा उल्लेख करत आम्हाला तर देशाचे कृषीमंत्री शरद पवारच आहेत, असे आजही वाटते, असेही ते म्हणाले.
निफाड तालुक्यातील रानवड येथे स्व.अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था, पिंपळगाव बसवंत संचलित कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना लि., काकासाहेब नगरचा 40वा गळीत हंगाम शुभारंभ सुरू झाला. त्यानिमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला संबोधित करताना भुजबळ यांनी हे विधान केले. कृषीमंत्री कोण आपले अब्दुल सत्तार ते जिल्हाधिकार्‍याला म्हणाले तू दारू पितो का? बरं देशाचे कृषी मंत्री कोण आहेत हो ? तोमर तोमर, लोकांमधून आवाज आला. तोमर… तो मर… मला माहीत नाही. तो मर.. तो मर.. अजूनही आम्हाला शरद पवार साहेबच कृषी मंत्री आहेत, असे वाटते असे ते म्हणाले. कुणाचीही अडचण असली की चला पवार साहेबांकडे. मग ऊस उत्पादक शेतकरी असो की इतर शेतकरी. सर्वजण पवारांकडे समस्या घेऊन येतात. पवार साहेबही या समस्या मार्गी लावतात. दिल्लीत जाऊन प्रश्न सोडवतात. दिल्लीत पवारांना कुणीही नकार देत नाही. राज्यच नव्हे तर देशाला पवारांची मोठी देणगी आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. यावेळी भुजबळांनी कृषीमंत्री दादा भुसे यांचीही खिल्ली उडवली. पूर्वीच्या मंत्रीमंडळात भुसे कृषीमंत्री होते तेव्हा त्यांना काही सांगता येत होत. पण आता काय तर म्हणे कोणतं ‘बंदर’ खाते दिले आहे. अरे कोणते ‘बंदर’, असा टोलाही त्यांनी लगावला.
राज्यातून उद्योग गुजरातला जात असल्याच्या मुद्यावरही त्यांनी टोला लगावला. आधी फोक्सकॉन गेला. आता काल परवा टाटांचा एअरबसही गुजरातला गेला. पुढे मागे निफाडला होणारा प्रस्तावित ड्रायपोर्टही गुजरातला गेल्यास वाईट वाटण्याचे कारण नाही. शेवटी आम्ही काहीही बोललो तरी,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यावर वरिष्ठ शक्तींच्या पुढे जाऊ शकत नाही असा टोला त्यांनी लगावला. या देशाच्या ५० टक्के कर एकट्या महाराष्ट्रातून देशाला मिळतो. परंतु आपल्या राज्यातील रोजगार चालले असे सांगत महाराष्ट्राला कमकुवत केले जात आहे. पण महाराष्ट्र कोणापुढे झुकणार नाही. धीर धरा, बदल झाल्याशिवाय राहणार नाही असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी ‘माय महानगर’चे Android App डाऊनलोड करा

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares