ारोहित्राच्या बिघाडामुळे शेतकरी हैराण – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
उंडवडी, ता. ३१ : गोजुबावी (ता. बारामती) हद्दीतील जाधववस्ती येथील वस्ती तसेच कृषीपंपाना वीजपुरवठा करणारा रोहित्रामध्ये सातत्याने तांत्रिक बिघाड आहे. पाण्याअभावी पिके सुकली आहेत. दीड महिन्यात तीन वेळा बिघाड झाल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. यामुळे नवीन रोहित्र बसून कायमची समस्या मिटवावी, अशी मागणी त्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.
रोहित्राच्या बिघाडामुळे शेतकऱ्यांनी विहिरीच्या पाण्यावर रब्बी हंगामातील ज्वारी, कांदा, मका तसेच भाजीपाला पिके घेतली आहेत. मात्र सातत्याने बिघाड होत असल्याने शेतकऱ्यांच्या विहिरीत पाणी असून देखील कृषीपंप बंद ठेवण्याची वेळ आली आहे. परिणामी बहरात आलेली शेतातील पिके पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर आली आहेत. ऐन दिवाळीच्या सणाला घरगुती वीज गायब झाल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोयी झाली. या वीजरोहित्रावर शेतीपंपाची १९ तर ९ घरगुती वीज जोड अवलंबून आहेत.
रोहित्राच्या दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीकडे पाठपुरावा केल्यानंतर तात्पुरता बिघाड काढून देण्यात येता. मात्र आठ दिवसांनी परिस्थिती पुन्हा जैसे थे अशीच होते.
येथील वीज रोहित्राचा महावितरण कंपनीने बिघाड कायमस्वरूपी काढून शेतीपंपांचा व घरगुती उपकरणांसाठी लागणारा वीजपुरवठा तातडीने सुरळीत सुरू करून द्यावा, अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे.
गोजुबावी (ता. बारामती) : जाधववस्ती येथील नादुरुस्त असलेले रोहित्र.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares