Optical Illusion Image: जर तुम्ही चित्रात लपलेली स्त्री शोधली, तर ठराल सुपर जीनियस! तुमच्याकडे – ABP Majha

Written by

By: एबीपी माझा वेब टीम | Updated at : 23 Aug 2022 11:27 AM (IST)
Edited By: ज्योती देवरे
Spot Woman From Optical Illusion
Optical Illusion Image: सोशल मीडियावर सध्या ऑप्टिकल इल्युजन पिक्चर्सचे फोटो व्हायरल होत आहेत. अशी चित्रे पाहिल्यानंतर भलेभले डोकी खाजवायला लागतात. जे स्वत:ला खूप हुशार समजतात, तेही ही छायाचित्रे पाहून बराच वेळ गोंधळून जातात. आता तुम्हाला असेच आणखी एक चित्र दाखवतो, ज्यामध्ये तुम्हाला चित्रात लपलेली स्त्री शोधायची आहे. 
सोशल मीडियावर व्हायरल फोटो, चित्रातील महिला शोधण्यासाठी तुमच्याकडे आहेत 10 सेकंद 
ऑप्टिकल इल्युजन फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हायरल फोटो नीट बघा आणि सांगा यामध्ये लपलेली महिला कुठे आहे? हा व्हायरल फोटो पाहून कुशाग्र बुद्धीचे लोकही गोंधळून जातील आणि त्यांना ही महिला सापडणार नाही. या चॅलेंजबद्दल सांगायचं झालं, तर चित्रातील ही महिला शोधण्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंद आहेत. ज्याला 10 सेकंदात चित्रात लपलेली स्त्री सापडेल त्याला सुपर जीनियस म्हटले जाईल.
पोपट की स्त्री?
व्हायरल फोटोमध्ये तुम्हाला पोपटाचे चित्र दिसत आहे आणि त्यात एक झाड कापले गेले आहे. या कापलेल्या झाडावर प्रथमदर्शनी एक पोपट बसला आहे असे वाटते, परंतु या चित्राकडे नीट पाहिल्यास एक महिला देखील आहे जिला तुम्हाला शोधावे लागेल.

फोटोच्या वरच्या भागावर लक्ष द्या, तुम्हाला ‘ती’ सापडेल
जर तुम्ही अजूनही महिलेचा फोटो पाहिला नसेल, तर या फोटोच्या वरच्या भागावर लक्ष ठेवा. तुम्हाला एक स्त्री डोक्यावर हात ठेवून झोपलेली दिसेल. काही वेळाने तुम्ही त्या स्त्रीला आरामात पाहू शकाल. आणि मग तुम्हीही ठराल सुपर जीनियस..!
3D आर्टचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल
ज्यांची कला पाहिल्यावर डोळ्यांवर विश्वास बसत नाही. अशा चित्रांना किंवा कलेला 3D स्केचिंग किंवा 3D आर्ट असेही म्हणतात. या कलेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. कारण, ही कला पाहून तुम्हाला खरी आणि खोटी यामध्ये फरकच करता येणार नाही. या कलाकाराने ही कलाच इतकी अप्रतिम रेखाटली आहे की, त्यातला फरकच करता येत नाहीये. सोशल मीडियावर या कलाकाराच्या कलेचे खूप कौतुक करतायत.   
 
I literally watched him draw it and he still fooled me (via caihuizsx/TT) pic.twitter.com/P6Pp49eqxn

 
महत्वाच्या बातम्या : 
Viral Video : कॅन्सरमुळे गमावला उजवा डोळा, हार न मानता डोळ्यात बसवली फ्लॅशलाइट, बनला टर्मिनेटर!
IND vs NED : पठ्ठ्यानं भारत-नेदरलँड सामना सुरु असतानाच केला गर्लफ्रेंडला प्रपोज, तिनेही दिला होकार, पाहा VIDEO
Viral Video : स्ट्रीट लाईटच्या उजेडात अभ्यास करताना दिसली मुलगी, युजर्स म्हणाले- ‘सर्वात सुंदर व्हिडिओ’
Currency : मुस्लिम बहुसंख्य असलेल्या देशाच्या नोटेवर गणेशाचा फोटो, इंडोनेशियाच्या नोटेवर श्री गणेशाचा फोटो कसा आला?
Diwali Viral Video: दिवाळीत फोटो काढताना झाला स्फोट, फटाक्यांचा जोरदार आवाज, पुढे काय घडले वाचा…
Todays Headline 31 october : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या
Horoscope Today, October 31, 2022 : मेष, कर्क आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी दिवस राहील खास! धनप्राप्तीच्या मिळतील संधी 
31 October In History : इंदिरा गांधी यांची हत्या, वल्लभभाई पटेल यांची जयंती, आज इतिहासात
Health Tips : गुलाबी थंडीत ‘या’ चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल
Kiran Pawaskar : मंत्र्यांचे राजीनामे मागाल तर आदित्य ठाकरेंचे दारू पार्ट्यांचे व्हिडीओ दाखवू; किरण पावरस्कर यांचा इशारा

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares