पूल बंद: गांधीग्राम येथील पूल वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
अकाेला -अकाेट मार्गावरील गांधीग्राम येथील पूल वाहतुकीसाठी बंद केला असून, पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी साेमवारी ३१ ऑक्टाेबरला ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने लक्ष दिलेच नाही, अशा शब्दात ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांसमाेर समस्यांचा पाढाच वाचला. या वेळी शेतकरी, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित हाेते. दरम्यान प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून पर्याय शाेधण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
आज स्ट्रक्चरल ऑडिट ः सकाळी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी धडक दिल्यानंतर दुपारी जिल्हाधिकाऱ्यांनी गांधी ग्राम परिसरात अधिकारी, अभियंत्यांसह पाहणी केली. ग्रामस्थांनी तीन पर्याय अधिकाऱ्यांसमाेर ठेवले. यात गाेपालखेड येथील पुलावरून वाहतूक सुरू करणे, गांधीग्राम येथील पुलाचे ९ पैकी बंद असलेले ६ गाळे माेकळे करणे, पात्रात जागा करणे आदी पर्यायांचा समावेश हाेता. यावर आता बुधवारी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट हाेणार असून, यासाठी मुंबईचा चमू येणार आहे.
या पर्यायी मार्गांचा वापर सुरू ः अकोला ते अकोटसाठी आपतापा चौक, म्हैसांग रामतीर्थ , दहीहंडा, दहीहंडा फाटा ,चोहाेट्टा मार्गे अकोटकडे जाता येत आहे. तसेच वाशीम बायपास चौक, गायगाव,उरळ,निंबाफाटा देवरीमार्गे अकोटला जाता येणार आहे. तसेच अकोटकडून अकोल्याकडे येणारी वाहतूक याच मार्गाने वळवण्यात आली आहे. गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाला ९५ वर्षापेक्षा जादा काळ झाला आहे. या पुलाला भेगा पडल्या आहेत. पुलाची दुरवस्था झाली आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुलावरून वाहतूक बंद आहे. मात्र हा पूल बंद असल्याने समस्या निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी ३१ ऑक्टाेबर राेजी जिल्हाधिकारी कार्यालवर धडक देत जिल्हाधिकारी नीमा आराेरा यांना निवेदन सादर केले. या वेळी राजेश मंगळे, विजय देशमुख, प्रशांत गावंडे, मनाेहर शेळके, रवी अरबट, डाॅ. पुरुषाेत्तम दातकर, दिलीप लेलेकर, गजानन देशमुख, प्रदीप चाेरे, गणेशराव खाेडके, कालीखाॅ खान, सुनील अघडते, प्रतापराव मेहसरे आदी हाेते.
२५ वर गावे प्रभावित
गांधीग्राम येथील पूल बंद असल्याने २५ पेक्षा जास्त गावे प्रभावित झाली आहेत. त्यामुळे तेथील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, व्यावसाियक, वीट उत्पादकांसह ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यात कनिखेड, काटी-पाटी, राेहणा, दहिहंडा, सुकळी, रेल-धारेल, धामणा, कराेडी, आंबाेडा, देवरी, कुटासा, कावसा, तराेडा, मराेडा, दनिाेडा, पळसाेद, टाकळी, नखेगाव आदींचा समावेश हाेता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares