वाहनधारकांचे पोलीस ठाण्याला निवेदन – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
पोलिस बंदोबस्त देण्याची
वाहनधारकांची मागणी
शिरोळ, ता. ३१ ः ‘आंदोलन अंकुश’ च्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे शेतकरी, वाहनधारक व ऊसतोड मजूर यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना पोलिस बंदोबस्त मिळावा, अशा मागणीचे निवेदन वाहनधारकांच्या वतीने शिरोळ, जयसिंगपूर व कुरुंदवाड पोलिस ठाण्याला देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, ‘आंदोलन अंकुश’ चे कार्यकर्ते वाहने रोखत आहेत. यावेळी वाहनचालकांना दमदाटी करीत आहेत. तसेच ऊस तोडी रोखताना ऊसतोड मजुरांना भीती दाखवत आहेत. त्यामुळे वाहनधारकांचे व ऊसतोड मजुरांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचा या आंदोलनास पाठिंबा नसताना व साखर कारखान्याने एकरकमी एफआरपीची रक्कम देण्याची घोषणा केली असताना चुकीच्या पद्धतीने आंदोलन होत आहे. त्यामुळे आमच्या वाहनांचे तसेच शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्याकरिता पोलिस बंदोबस्त मिळावा. निवेदनावर विजय एकसंबे, आझाद शेडबाळे, बाबासो मडिवाळ, दस्तगीर मकानदार आदी वाहनधारकांच्या सह्या आहेत.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares