संतप्त शेतकऱ्यांनी रोखले कांद्याचे लिलाव – Dainik Prabhat

Written by

दोन तासांनंतर लिलाव सुरळीत
नगर – कांदा लिलावात कांद्याला कमी भाव मिळत असल्याचे लक्षात येताच संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नेप्ती उपबाजार आवारात लिलाव बंद पाडून आंदोलन केले. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. तब्बल दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे समितीतील व्यवहार ठप्प झाले होते. त्यानंतर कांद्याला समाधानकारक भाव मिळाल्यानंतर आंदोल मागे घेण्यात आले.
सध्या कांद्याला चांगले भाव मिळत आहेत. नेप्ती समितीतही चांगले भाव मिळत आहेत. मात्र, सोमवारी लिलाव सुरू झाल्यानंतर कांद्याचे भाव अचानक कमी झाले. त्यामुळे येथे कांदा घेऊन आलेले शेतकरी चांगलेच संतापले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदेश कार्ले यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी विरोध करत तत्काळ लिलाव बंद पाडले.
व्यापारी व आडते संगनमत करून भाव पाडत असल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला. जवळपास दोन तास आंदोलन सुरू होते. बाजारभावाबाबत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. संदेश कार्ले म्हणाले, की पारनेर बाजार समितीत 3500 ते 3800 रुपये तर लासलगाव बाजार समितीत 3300 रुपये भाव आहे. मात्र, येथे फक्त 1800 रुपये भाव काढण्यात आल्याने लिलाव बंद पाडले. बरेचशे आडते टेम्पो चालकांना कांदा टाकण्यासाठी कमिशन देतात. त्यामुळे येथे आडतेच व्यापारी बनल्याचे दिसत आहे.
याबाबत बाजार समितीकडे तक्रार आल्यास समितीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. तक्रारी आल्यास संबंधित आडत्यांना नोटीसा दिल्या जातील तसेच शेतकऱ्यांचा विकला न गेलेला माल बाजार समितीने सांभाळण्याबाबत आश्‍वासन देण्यात आले. त्यानंतर कांद्याला 2900 ते 3500 प्रति क्विंटलपर्यंत भाव निघाले.
कांद्याला 3500 रुपये भाव
सोमवारी लिलावासाठी 45 हजार 137 क्विंटल आवक झाली होती. शनिवारच्या लिलावाच्या तुलनेत सोमवारी आवक जास्त होती. यावेळी लिलावात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला सरासरी 2900 ते 3500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. तसेच दोन नंबर कांद्याला 2000 ते 2900, तीन नंबरा कांद्याला 1000 ते 2000 आणि चार नंबर कांद्याला 500 ते 1000 रुपयांपर्यंत भाव मिळाले.
ईपेपरराशी-भविष्यकोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

Copyright © 2022 Dainik Prabhat
Login to your account below




Please enter your username or email address to reset your password.



source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares