सांगली जिल्ह्यात केवळ ६७ टक्के पेरणी, खरीप हंगामाबद्दल शेतकऱ्यांमध्ये चिंता – Lokmat

Written by

Latest Marathi News | लोकमत / Lokmat Marathi newspaper | Live Marathi Batmya | ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com
हिंदी | English
बुधवार २ नोव्हेंबर २०२२
FOLLOW US :

शहरं
मनोरंजन
व्हिडीओ
सखी
आणखी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 04:20 PM2022-07-20T16:20:32+5:302022-07-20T16:21:01+5:30
सांगली : जुलैचा तिसरा आठवडा आला तरी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ४० टक्केच पाऊस झाला आहे. अत्यल्प पर्जन्यमानाचा परिणाम थेट खरीप पेरणीवर होऊ लागला आहे. आतापर्यंत अवघ्या ६७ टक्के क्षेत्रावरील पेरणी पूर्ण झाली आहे. तब्बल ९३ हजार ७८ हेक्टर क्षेत्रावर अद्याप पेरणी झाली नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या पावसाकडे नजर लावून बसले आहेत.

जिल्ह्यात खरिपाचे दोन लाख ८४ हजार ४१० हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी एक लाख ९१ हजार ३३२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. केवळ ६७ टक्के पेरणी झाली आहे. जुलै महिना संपत आला असतानाही ९३ हजार ७८ हेक्टरवर खरीप पिकांची पेरणीच झाली नाही. सोयाबीनचे सरासरी ४६ हजार ३३६ हेक्टर क्षेत्र असून, ३७ हजार ४२६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ती ८१ टक्के आहे. मूग, उडीद, मटकी, तूर आदी कडधान्यांची पेरणी ७६ टक्के झाली आहे. भात १६ हजार ६४ हेक्टर क्षेत्र असून, ८८ टक्के पेरणी झाली आहे.

प्रथमच १२ टक्के क्षेत्रात पेरणीच झालेली नाही. खरीप ज्वारीची २३ टक्के, तर बाजरीची ७३ टक्के पेरणी झाली आहे. पावसाचा जोर नसल्यामुळे उर्वरित क्षेत्रावर पेरणी होणार की नाही, या चिंतेत शेतकरी आहे.
तालुकानिहाय पेरणी
तालुका – पेरणी टक्केवारी
मिरज ६५.९
जत १०३.३
खानापूर १६.२
वाळवा ७४.३
आटपाडी २०.८
पलूस ८४.६
कडेगाव ४४.३
शिराळा ८४.००
तासगाव ५२.०७
कवठेमहांकाळ ७२.४
एकूण ६७.३

जिल्ह्यात १८ जुलैपर्यंत तीन वर्षांचा पाऊस (मिलीमीटरमध्ये)
तालुका – २०२२ – २०२१ – २०१९
वाळवा – १६८.४ – २६८.८ – १७१
पलूस – १४७.१ – २७०.९  – ८३
तासगाव – १०७.८ – २९२१ – २०४
शिराळा – ४२८.७ – २८२.२ – ३७३
मिरज – १४३.३ – २५९.७ – १७१
खानापूर – १२६.९ – १२८.३ – १२२
आटपाडी – ६९.४ – १३९.८ – ९३
क.महांकाळ – १८२.१ – १९२.२ – ११०
जत  – १०८.८ – २७०.८ – १२४
कडेगाव – १७९.२ – १९६.७ – २०१
पाऊस कमी झाल्यामुळे खरीप पेरणी कमी झाली आहे. पण, सध्या पाऊस सुरू झाल्यामुळे पेरण्यांना या आठवड्यात गती मिळेल, अशी अपेक्षा आहे. बियाणे, रासायनिक खताचा पुरेसा साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे. –प्रकाश सूर्यवंशी, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली.
FOLLOW US :

Copyright © 2020 Lokmat Media Pvt Ltd

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares