Grapes: पावसामुळे द्राक्षाचा हंगाम लांबणार? द्राक्षांच्या निर्यात धोरणांमुळे – ABP Majha

Written by

By: मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा | Updated at : 01 Nov 2022 09:18 AM (IST)
Edited By: प्राची आमले
Feature Photo
नाशिक: नाशिक जिल्ह्यातील पावसाने दहा बारा दिवसापूर्वी माघार घेतली.  मात्र आपल्या पाऊलखुणा  शेतातील पाण्याच्या रूपाने आजही कायम आहत.  पाण्याचा निचरा होत नसल्यानं आजही जिल्ह्यातील अनेक शेतात पाणी आहे. परिणामी  शेतीकामे रखडली आहे, दरवर्षी साधारणपणे सप्टेंबर अखेरपर्यंत पाऊस थांबतो आणि ऑक्टोबर महिन्यातंय द्राक्ष बागांच्या छाटणीला सुरवात होते. आत नोव्हेंबर एक दिवसावर आला तरीही अनेक शेतात छाटणीला सुरवात झाली नाही तर काही शेतकऱ्यांनी नुकतीच छाटणी  हाती घेतली आहे. ऐन थंडीत छाटणी होत असल्यानं द्राक्ष मण्यांची फुगवण होणार नाही, रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच औषध फवारणीला सुरवात झाली असून खर्चही वाढत आहे. रेंगाळलेला  पाऊस आणि लवकर पडलेली थंडी यामुळं द्राक्ष हंगाम एक दीड महिना पुढे ढकलला गेला आहे .त्यामुळे द्राक्ष चाखण्यासाठी वेळ तर लागेलच पण शेतरक्यांचं मालाला भावही मिळणार नाहीये.
 
अस्मानी आणि सुलतानी संकटावर मात करून शेतकरी आतंरराष्ट्रीय  बाजारपेठेत  चिली, दक्षिण आफ्रिका, पेरू, इजिप्त या  देशांना आव्हान देतो.  मात्र राज्य आणि केंद्र सरकराचे पाठबळ कमी पडते. निर्यातीला पोषक धोरण नसल्यानं त्याचा फटका द्राक्ष उत्पादकांना बसतोय. युरोपमध्ये द्राक्ष निर्यात करतांना इतर देशांना शून्य टक्के ड्युटी लागते तर भारताकडून आठ टक्के वसूल केली जाते. मागील वर्षी बांगलादेशाने इम्पोर्ट ड्युटी किलोमागे 50 रुपयांवरून 70 रुपये वाढविल्याने सीमा भागातच द्राक्षे फेकून देण्याची वेळ आली होती.
 चीन, रशिया, युक्रेन या देशात मागील वर्षी निर्यात झाली नाही. असे संकट एकामागोमाग एक येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून उदयोग इतर राज्यात गेल्याने राजकरण आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा द्राक्ष उत्पदकांचे प्रश्न समस्या सोडावाव्या एवढीच अपेक्षा शेतकरी करत आहे. नवनवीन पेटंट सरकारने शोधण्याची गरज आहे. परकीय चलन मिळवून देण्याची ताकद महाराष्ट्रात असताना इतर देशातील फळ आपल्याकडे येतात आणि आपली फळ बाजूला पडतात अशी खंत शेतकरी व्यक्त करतोय.
 
 पळत्याच्या मागे धावण्यापेक्षा आपल्या  शेतीला, शेतीपूरक उद्योगांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. हंगाम सुरु होण्याच्या आधीच जर सरकारने लक्ष  घातले तर आनंदाचा शिधा देऊन  दिवाळी गोड करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे आपल्या श्रमाचे मोल मिळाल्यानेच त्यांचे आयुष्य रसरशीत द्राक्षाप्रमाणे गोड होण्यास वेळ लागणार नाही.

 
‘शेतकऱ्यांना फक्त एक रुपयात पीकविम्याचे कवच’; कृषिमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती
Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीनं दीड लाख हेक्टरवरील सोयाबीन पाण्यात, कर्ज काढून रब्बीची पेरणी करण्याची वेळ
Uddhav Thackeray : 26 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे घेणार शेतकरी मेळावा, बुलढाण्यातील चिखलीत होणार एल्गार, शिंदे सरकारला घेरणार
Sugar Export : केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवर एक वर्षासाठी बंदी, मात्र, ‘या’ देशांमध्ये निर्यातीसाठी सूट 
Narendra Singh Tomar : कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर आज पुण्यात, फलोत्पादन क्षेत्रातल्या योगदानाबद्दल शेतकऱ्यांसह उद्योजकांचा करणार सत्कार
Kishori Pednekar Enquiry : ‘कर नाही त्याला डर कशाला’, दादर पोलिसांकडून अडीच तासांच्या चौकशीनंतर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया
GST Collection: ऑक्टोबर महिन्यात उच्चांकी जीएसटी संकलन, महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा
Sukesh Chandrashekhar: ‘प्रोटेक्शन मनी’ म्हणून ‘आप’च्या मंत्र्याला 10 कोटी दिले; सुकेश चंद्रशेखरच्या दाव्याने खळबळ
Kiran Lohar ACB Raid : लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या बंगल्याची झाडाझडती; सोलापूर ACB ला अहवाल दिला जाणार
Onion Rates Hike : नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याची आवक घटल्याने दरात दुप्पट वाढ, घाऊक दर 15 रुपयांवरुन 30 रुपयांवर पोहोचला

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares