LIVE Update: 'द वायर'चे संस्थापक सिद्धार्थ वरदराजन यांच्या घरी छापेमारी – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
बारामती तालुक्यातील माळेगावमध्ये विषारी ताडी पिल्यामुळे दोन व्यक्तींचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. ताडी विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच परिसरातील अवैध गुत्यांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत.
'द वायर'चे संस्थापक सिद्धार्थ वरदराजन आणि संस्थापक संपादक एमके वेणू यांच्या निवासस्थानी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेची झडती सुरू आहे. भाजपचे अमित मालवीय यांच्या तक्रारीवरून 'द वायर'वर एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे २६ नोव्हेंबरला शेतकरी मेळावा घेणार आहेत. बुलढाण्यातील चिखली गावात हा मेळावा घेणार आहेत. आता ठाकरे पुन्हा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून शिंदे सरकारला घेरणार का पाहावं लागेल.
एमओपीएनजी परिपत्रकानुसार व्यापार मार्जिन सुधारित मिळेपर्यंत 1 नोव्हेंबर पासून अनिश्चित काळासाठी पुणे ग्रामीण भागातील पंपांवर टोरेंट सीएनजीची विक्री होणार नाही. MoPNG द्वारे परिपत्रक जारी करून 1 वर्ष पूर्ण झाले तरीही टोरेंट गॅस त्यांच्या चॅनल भागीदारांना न्याय देऊ शकले नाही . त्यामुळं हा निर्णस घेण्यात आला आहे.
फडणवीसांना उत्तर देण्यासाठी आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेवून फडणवीसांनावर टीका केली आहे. ते म्हणाले " आज एकटे आसल्यामुळं माईक ओढला नाही"
वेदांता पेक्षा मोठा प्रकल्प राज्यात आणण्याचं गाजर,
महाराष्ट्राला मोठ्या प्रकल्पाचं फक्त गाजर दाखवलं.
महाराष्ट्रातून अनेक उद्योग राज्यातून बाहेर.
महाराष्ट्रातील वातावरण चांगल नाही. असं सांगणाऱ्यांच नाव सांगा.
राज्यातील काँग्रेसचे जेष्ठ नेते राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी ही भेट असल्याचे सांगितले जात आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्याच्या राज्याच्या वेगवेगळ्या घडामोडींवर भाष्य केले आहे. यावेळी फडणवीस यांनी शिंदे सरकावर फेक नॅरिटिव्ह तयार केले जात असल्याचे म्हटले आहे. याशिवाय राज्यातून जे प्रकल्प बाहेर गेले आहेत यावरही फडणवीस यांनी भाष्य केले आहे. आमच्याविरोधात वेगळ्या प्रकारचे षडयंत्र तयार केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विरोधक महाराष्ट्राची बदनामी करत आहेत असं ही फडणवीस म्हणाले.
वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांची सोशल मीडियावरुन ओळख झाली. दोघे ही एकमेकांना भेटले होते आणि त्यानंतर त्यांची मैत्री वाढत गेली. त्यानंतर मित्राने तिला आंतरराष्ट्रीय पोर्नस्टार बनवतो असे आमिष दाखवत तिला अश्लील व्हिडिओ तयार करण्यास भाग पाडलं. मित्राने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेऊन तिने काही व्हिडिओ त्याला पाठवले. हेच व्हिडिओ तिच्या मित्राने एका पोर्न वेबसाईटवर अपलोड केले. त्या मुलीला तिच्या मैत्रिणीने तिचे व्हिडिओ अशा वेबसाईटवर अपलोड झाल्याचे सांगितल्यानंतर तिने हा सगळा प्रकार घरच्यांना सांगितला. मात्र भीतीपोटी त्यांनी तक्रार देण्यास नकार दिला पण पोलिसांना शेवटी पुढाकार घेतला आणि स्वतः या प्रकरणात तक्रार दाखल केली.
गुजरातच्या मोरबी येथे रविवारी संध्याकाळी मोठी दुर्घटना घडली. माच्छू नदीवरील केबल ब्रिज कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत 132 लोकांच्या मृत्यू झाला आहे. बचाव कार्य पथकाकडून आणि अधिकाऱ्यांकडून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान उद्या गुजरातमधील मोरबी दुर्घटनेच्या ठिकाणी भेट देणार आहेत.

मागच्या काही दिवसांपासून आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात टोकाचा वाद सुरु होता. त्यावर आता पडदा पडला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रवी राणा यांनी जवळपास अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर रवी राणा यांनी बच्चू कडू यांची जाहीर माफी मागितली त्यानंतर बच्चू कडू यांनीही त्यांचे शब्द माघारी घेतले आहेत.
ज्या रस्त्यांवर खड्डे आहेत ते तात्काळ दुरुस्त करा, पुणे पोलिसांचे महापालिका आयुक्तांना पत्र पाठवण्यात आलं आहे. पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून पोलिस आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले पुणे महापालिकेला पत्र पाठवण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील अनेक रस्त्यांवर खड्डे असल्यामुळे अपघात आणि नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. पडलेल्या खड्ड्यांमुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीला देखील सामोरे जावे लागत आहे. पोलिसांकडून पुण्यातील २४ प्रमुख भागात खड्डे असल्याचे पत्र देण्यात आले आहे. या पत्रा नंतर महापालिका आयुक्त काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.
पुण्यातील कुठल्या भागात किती खड्डे (पोलिसांनी दिलेल्या यादीनुसार)
विभाग आणि खड्डे असणारे एकूण ठिकाणे
– कात्रज विभाग (८ ठिकाणं)
– सहकारनगर (३ ठिकाणं)
– स्वारगेट (३ ठिकाणं)
– सिंहगड रोड (२ ठिकाणं)
– वारजे (३ ठिकाणं)
– कोथरूड (३ ठिकाणं)
– डेक्कन (३ ठिकाणं)
– चतुष्रुंगी (३ ठिकाणं)
– शिवाजीनगर (२ ठिकाणं)
– खडकी (३ ठिकाणं)
– येरवडा (६ ठिकाण)
– विमानतळ (८ ठिकाणं)
– कोरेगाव पार्क (४ठिकाणं)
– लोणीकंद (२ ठिकाणं)
– समर्थ (५ ठिकाण)
– बंडगार्डन (१२ ठिकाणं)
– लष्कर (१)
– वानवडी (६ ठिकाणं)
– कोंढवा (१३ ठिकाणं)
– हडपसर (११ ठिकाण)
– मुंढवा (७ ठिकाण)
– लोणी काळभोर (२)
– सिंहगड रोड (४ ठिकाणं)
शिंदे फडणवीस सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्यात आंदोलन सुरू केले आहे. भाजपला दिलेले प्रत्येक मत हे गुजरातच्या प्रगतीसाठी आणि महाराष्ट्राच्या अधोगतीसाठी आहे असं म्हणत, राष्ट्रवादी संतप्त झाली आहे. सॅफरॉन हा आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला आणि याचा निषेध करण्यासाठी पुण्यात आंदोलन करण्यात येत आहे. महाराष्ट्रातून वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेडिकल इक्विपमेंट पार्क, टाटा एअरबसनंतर आता सॅफरॉन हा आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ने सरकारचा निषेध नोंदवत आंदोलन केले. स्थानिक युवकांच्या नोकऱ्या, रोजगार व महाराष्ट्राची प्रगति थांबणाऱ्या या "ED सरकार" विरोधात आंदोलन करण्यात आले आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सांगण्यात आले
र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी माघार घेतल्यानंतर महाराष्ट्रात थंडी आली असली, तरी दक्षिणेकडील राज्यांमध्ये ईशान्य मोसमी वारे सक्रिय आहेत. त्यामुळे त्या भागांत पुढील तीन-चार दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलली आहे. महाराष्ट्रावर याचा फारसा परिणाम होणार नसल्याने कमी-अधिक प्रमाणात गारवा कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात किमान तापमानात मोठी घट झाली आहे. महाराष्ट्रामध्ये थंडीची स्थिती कायम राहणार आहे. तर मुंबईसह कोकण विभाग आणि विदर्भात किमान तापमानात १ ते २ अंशांनी घट झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून औरंगाबाद येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. रविवारी पुणे शहरात राज्यातील नीचांकी १३.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.
नांदेडमध्ये बिलोली येथे जिल्हा परिषदेच्या शाळेला भीषण आग लागली आहे. आगीमद्धे शाळेतील साहित्य जळून खाक झाले आहे. आगीच कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं आहे.
कार्बन उत्सर्जन कमी करणे तसेच शहरातील वाढते प्रदूषण कसे कमी करता येईल यासाठी पुणे महानगर पालिकेत विशेष विभाग तयार करण्यात येणार आहे. पर्यावरणाच्या संबंधित कामांची जबाबदारी या विभागाकडे असेल तर नैसर्गिक उर्जा वापरण्यास प्राधान्य, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर, वृक्षरोपण करणे, विविध संस्थेबरोबर करार करून शहरात पर्यावरण बद्दल जागृती करणे ही मुख्य कामे या विभागाकडे असणार आहेत. जागतिक हवामान बदलाचे परिणाम पुण्यात उमटू लागले आहेत. यात मिथेन वायूचे उत्सर्जन, नदी दूषित होणे, वायू प्रदूषण यासारखे अनेक गंभीर प्रश्न आहेत. अशा प्रकारचे विभाग स्थापन करणारे पुणे हे राज्यातील पहिले शहर ठरणार
महागाईमुळे सामान्यांचे कंबरडे आधीच मोडले आहे. अशातच मुंबई महापालिका प्रशासनाने आता पाणीपट्टीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या उद्यापासून (1 नोव्हेंबर) अंमलबजावणीसाठी प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. यानुसार आता मुंबईकरांच्या पाणीपट्टीत 7.12 टक्क्यांनी वाढ होणार आहे.
कंपनीने जवळपास 10 हजार कार परत मागवल्या आहेत. यामध्ये वॅगन आर, सेलेरिओ आणि इग्निस या कारचा समावेश आहे. तीन हॅचबॅक कारच्या मागील ब्रेक असेंबली पिन भागामध्ये दोष असल्याची शक्यता कंपनीने वर्तवली आहे.
गुजरातमधील मोरबीत काल झुलता पूल कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 132 जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोकांचं आतापर्यंत बचावकार्य सुरू आहे
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares