Maharashtra News Updates 01 November 2022 : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 – ABP Majha

Written by

By : एबीपी माझा वेब टीम | Updated: 01 Nov 2022 10:37 PM (IST)
चेंबूर पोलिसांनी एसयूव्ही कार चालवणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. मोटारसायकल चालवणाऱ्या 30 वर्षीय व्यक्तीला गाडीने धडक देऊन मारल्याप्रकरणी, चार दिवसांनंतर सोमवारी ही अटक करण्यात आली आहे. मयत हा आपल्या बहिणीकडे भाईदूज साजरी केल्यानंतर आपल्या घरी परत जात होता. मृत गौरव नरोटे 30, हा मोटारसायकलवरून घरी जात असताना चेंबूर येथील मल्हार हॉटेलजवळ 26 ऑक्टोबर रोजी भरधाव वेगाने येणाऱ्या टोयोटा फॉर्च्युनरने त्याला धडक दिली. हा भीषण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आणि त्यानंतर ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली.अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव हृदय भानुशाली असून तो घाटकोपरचा रहिवासी आहे. 
काँग्रेस नेते नितीन राऊत भारत जोडो यात्रे दरम्यान हैदराबाद मध्ये पायी चालताना गर्दीमध्ये इतरांचा धक्का लागून खाली पडले. त्यामुळे त्यांच्या डोळ्याजवळ किरकोळ जखम झाली आहे. सध्या सोबतच्या कार्यकर्त्यांसह ते हैदराबादचे एका खाजगी रुग्णालयात गेले आहेत.
त्यांचा कुटुंबीयांसोबत बोलणं झालं असून ते ठीक असल्याची माहिती राऊत कुटुंबीयांनी दिली आहे.
आमदार भास्कर जाधव यांना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने २३ नोव्हेंबरपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. वैभव नाईक यांना लाचलुचपत विभागाच्यावतीने चौकशीची नोटीस पाठविण्यात आल्याने त्यांच्या समर्थनार्थ १८ ऑक्टोबर रोजी कुडाळ येथे महाविकास आघाडीच्या वतीने मोर्चा नंतरच्या भाषणात भास्कर जाधव यांनी प्रक्षोभक भाषण केले होते. विशेषतः केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या कुटबियांवर आरोप केले होते. त्यामुळे भाजप कार्यकर्ते संतप्त झाले होत कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 
       
या प्रकरणी अटक होवू नये यासाठी जिल्हा न्यायालयात आमदार भास्कर जाधव यांनी अटक पूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर आज न्यायालयाने सुनावणी केली असुन २३ नोव्हेंबर पर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या  न्यायालयीन कोठडीत 14 दिवासंची वाढ झाली आहे. देशमुख यांच्यासह पालांडे आणि शिंदे या दोन आरोपींना मुंबई सत्र न्यायालयानं 15 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.  
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून अटक झाली होती. सध्या ईडी प्रकरणात अनिल देशमुखांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र सीबीआयच्या प्रकरणात देशमुख अजुनही जामीनाच्या प्रतिक्षेत न्यायालयीन कोठडीत आहेत. 
 
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड या मतदारसंघात सभा घेणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून अब्दुल सत्तार आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा सिल्लोड दौरा महत्वपूर्ण ठरणार आहे. आदित्य ठाकरे 7 नोव्हेंबरला बुलढाणा आणि सिल्लोड दौऱ्यावर असणार आहेत. बांधावर जाऊन आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.   
हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात असलेली जय काली माता महिला नागरी बँकेत चोरट्यांनी सोमवारी रात्री चोरीच्या उद्देशाने शटर तोडून प्रवेश केला. चोरट्यांनी आतील रूममधील तिजोरी बाहेर आणली आणि ती तिजोरी फोडून पैसे लंपास करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना तिजोरी फुटली नाही. वजनदार तिजोरीच्या मजबुतीपुढे चोरट्यांनी हात टेकले आणि तिजोरी मधून रक्कम न काढता आल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. अखेर आज सकाळी पोलिसांनी घटास्थळी दाखल होऊन माहिती घेतली असता तिजोरी फोडण्यात चोर अपयशी ठरल्याचे दिसून आले. तर तिजोरी उघडल्यानंतर तिजोरीतील 20 लाख रुपये रोख रक्कम असल्याचे दिसून आले आहे.
Parbhani News Update : परभणीत एक हजार रूपयांची लाच घेताना लिपिकाला अटक करण्यात आलीय. पूर्णा पाटबंधारे विभागात हा लिपिक कार्यरत असून प्रल्हाद गिरी असं त्याचं नाव आहे. अनुकंपा तत्त्वावरील नोकरीचा प्रस्ताव औरंगाबादला पाठवण्यासाठी त्याने लाच मागितली होती. 
Wardha News Update : उद्यापासून वर्धा शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे. युद्ध पातळीवर पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू आहे. वर्धा शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन आरती चौकात फुटल्याने तीन दिवस पाणीपुरवठा ठप्प राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर  नगर परिषदेच्या वतीने जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर करण्यात आले असून 28 तासानंतर उद्या पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळालाय. 
किनवट तालुक्यातील झळकवाडी घाटात ऑटोचा भीषण अपघात होऊन दोन ठार, दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना. तेलंगणा राज्यातील आडेली देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना  घेवून जाणाऱ्या  ऑटोचा अपघात झाल्याने, नागेश रामा टारपे वय 19 वर्षे व बालाजी पांडुरंग खोकले वय 19 वर्षे या दोन भाविक तरूणांचा जागीच मृत्यू झालाय. तर या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडलीय. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालूक्याती झळकवाडी घाटात आज दुपारी4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलीय…
Solapur News Update :  सोलापूरचे लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने लोहार यांना 3 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 
Ahmednagar News Update : अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यात अनेक तालुक्यात अद्याप पंचनामे झाले नसल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत. तर काही ठिकाणी उशिराने पंचनामे होत असल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याच त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथे अतिवृष्टीमुळे अनेक पिके वाया गेली असून पंचनामे उशिराने सुरू झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांनी वाट बघून पुढच्या पिकांसाठी शेतीची मशागत सुरू केली आहे. त्यामुळे शासनाने सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. तसेच खरीप रब्बी अशी विभागणी न करता पंचनामे करावेत अशी मागणी होत आहे. 
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुलगा सलील देशमुखला मुंबई सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात देण्यात आलेलं समन्स रद्द करण्यात आलं आहे. आज सलील देशमुख कोर्टात हजर झाल्यानंतर समन रद्द करत जामीनही मंजूर करण्यात आला आहे. सलील यांना 3 लाखांच्या रोख हमीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. 
कल्याण डोंबिवलीत बनावट कागदपत्रांच्या आधारे रेरा परवानगी मिळवणाऱ्या सबंधित  बिल्डरांभोवती एसआयटीने फार्स आवळण्यास सुरुवात केली आहे.या प्रकरणात सबंधित  40 बिल्डरांची बँक खाती गोठविण्यात आली असून खोटी कागदपत्र प्रकरणात तहसीलदार, रजिस्ट्रेशन कार्यालय आणि केडीएमसी आयुक्तांना एसआयटीने पत्र व्यवहार करुन सर्व प्रकारची पूढील प्रक्रिया थांबविण्याची सूचना केली आहे. इतकेच नाही तर सरकारी जागेवर किती ठिकाणी अतिक्रमण झाले आहे यासंदर्भातही माहिती मागितली गेली आहे.
गेल्या काही दिवसांपासून आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात शाब्दिक चकमक सुरु होती. मात्र हा वाद आता संपला आहे, असं रवी राणा यांनी सांगितलं आहे. माध्यमांशी बोलताना ते असं म्हणाले आहेत. 
नक्षलवाद्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ आता त्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉक्टर राहुल गेठे यांना देखील जीवे मारण्याची धमकी दिलीय. डॉक्टर राहुल गेठे यांना त्यांच्या घरी नक्षलवाद्यांनी लालशाईनं लिहिलेले धमकीचे पत्र मिळाले आहे.  
Beed News Update : बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे ओलाद दुष्काळ जाहीर करून प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर करावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गेवराई जवळ धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. 
दिवाळी पूर्वीच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याची अपेक्षा होती. मात्र अद्यापही नुकसानीची मदत मिळालेली नाही. त्यामुळे बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सरसकट शेतकऱ्यांना सरकारने तत्काळ मदत करावी या मागणीसाठी हा रस्ता रोको करण्यात आला.  
Beed News Update : बीड शहरात दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास गूढ आवाज झालाय. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भूगर्भातून अचानक गूढ आवाज झाला. हा गुढ आवाज फक्त बीड शहरातच नाही तर पाटोदा परिसरात देखील आल्याची माहिती काही नागरिकांनी दिली आहे. नेमका हा आवाज कशामुळे आला याचा शोध अजून लागू शकला नाही. काही दिवसांपूर्वी असाच गुढ आवाज परळी तालुक्यातल्या परचुंडी गावातून आला होता. त्याचा तपास होण्या अगोदरच आता बीड शहरातून आलेल्या गुढ आवाजाने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.  
Konkan News Update : मागील आठ ते दहा दिवसांपासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मासेमारीवर परिणाम झाला असून सध्या मासे कमी प्रमाणात मिळत आहेत. वातावरणात सातत्यानं बदल होत असल्यानं त्याचा हा फटका बसल्याचं मच्छिमारांचं म्हणणं आहे. सध्या किनाऱ्यावर उभ्या असलेल्या बोटींचं प्रमाण देखील लक्षणीय आहे. मागील वर्षभरापासून सातत्यानं असा फटका बसत असून त्यामुळे आर्थिक गणित कोलमडल्याचं मच्छिमारांचं म्हणणं आहे. त्यामुळे  मासे कमी मिळत असल्यानं माशांच्या दरात देखील वाढ झालेली आहे. काही वेळेला केवळ एकाच प्रकारचा बंपर मासा मिळत असल्याचं देखील मच्छिमार सांगतात.  
राज्यातील उद्योगांबाबत श्वेतपत्रिका काढणार असल्याचं राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलं आहे. येत्या महिनाभरात ही श्वेतपत्रिका जारी करण्यात येणार आहे असं ते म्हणाले. 
Bachchu Kadu : ‘जली को आग कहते है, बुझी को राख कहते है’ म्हणत विरोधकांना आव्हान देत बच्चू कडू यांच्या प्रहार मोळाव्याला सुरुवात झाली. यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले, प्रहार हा आंडूपांडूंचा पक्ष नसून लढवय्यांचा पक्ष आहे. आम्ही कोणाच्या वाटी जात नाही. पण आमच्या वाटीला जाणाऱ्याला सोडत नाही म्हणत त्यांच्या भाषणाला सुरुवात झाली. यावेळी मोठ्या संख्येत कार्यकर्त्यांची उपस्थिती आहे.
#LIVEUpdates पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहूल चोक्सीला सेबीचा दणका, 5 कोटींचा दंड #MehulChoksi https://t.co/FzUOpuMfw0 pic.twitter.com/TlhSq8ILbH
#NewsAlert किशोर पेडणेकरांची मुंबई पोलिसांकडून अडीच तास चौकशी, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात घोटाळा केल्याचा किशोरी पेडणेकरांवर आरोप #Kishoripednekar https://t.co/MhVUjlXUWW pic.twitter.com/QXcRYK0yi5
Beed News : बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं ओला दुष्काळ जाहीर करून प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर करावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गेवराईजवळ धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. दिवाळी पूर्वीचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, अद्यापही नुकसानीची मदत मिळालेली नाही. त्यामुळं बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व सरसकट शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ मदत करावी या मागणीसाठी हा रस्ता रोको करण्यात आला.
कोकणात प्रस्तावीत असलेली आॅईल रिफायनरी बारसुमध्ये करण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरू
या रिफायणरी संदर्भात राज्य सरकार या आठवडयात अधिकृत घोषणा करण्याची शक्यता
बारसुमधील रिफायणरी संदर्भात राज्य सरकारचा प्रतिनीधी म्हणून उद्योग मंत्री उदय सामंत शेतक-यांच्या सोबत करणार चर्चा
महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेल्याने सरकारवरती मोठ्या प्रमाणावर टिका सुरु झाली आहे. ही रिफायनरी बाहेर जाऊ नये म्हणुन सरकार घेणार निर्णय
या रिफायणरीला विरोध करणा-या संघटनांच्या प्रतिनिधींना तडीपारआणि जिल्हा बंदीच्या नोटीस पाठवायला सुरुवात केल्याचा संघटनांचा आरोप
यावरुन राजकारण तापण्याची शक्यता

बारसू-सोलगाव रिफायनरी विरोधी आंदोलनाच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना तडीपारीच्या नोटिसा.
सत्यजीत चव्हाण
नरेंद्र जोशी
अमोल बोळे
नितीन जठार
दीपक जोशी
सतीश बाणे
यांस आलेल्या आहेत
RBI आजपासून डिजीटल रुपया जारी करणार आहे.
सध्या देशातील पायलट प्रोजेक्ट म्हणून याची
सुरुवात करण्यात येणार आहे.
🔗https://t.co/qHQV1C9G5w#RBI pic.twitter.com/EvHZuUM9Ak
#NewsAlert सर्वोच्च न्यायालयाकडून दोन्ही पक्षकारांना 4 आठवड्यांची मुदत, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी लांबणीवर #MaharashtraPoliticalCrisis #Maharashtra https://t.co/8uSYDOhSws pic.twitter.com/u13el7KROb
#NewsAlert दोन्ही गटांनी कागदपत्रांचा गोषवारा द्या, दोन्ही बाजूंनी एकत्र बसून महत्त्वाचे मुद्दे ठरवा : सुप्रीम कोर्ट #MaharashtraPoliticalCrisis #Maharashtra https://t.co/8uSYDOhSws pic.twitter.com/b3OSnekJoH
Delhi Fire : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील नरेला येथील एका प्लास्टिक कारखान्यात भीषण आग लागली आहे. सोमवारी सकाळी 9 वाजून 35 मिनिटांनी अग्निशमन दलाला आगीसंदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. घटनास्थळावरून 2 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तसेच, कारखान्यात अनेकजण अडकल्याची माहिती मिळत आहे. 
Delhi | Fire breaks out in Narela Industrial Area, 10 fire tenders rushed to the spot. Three people have been rescued so far, a few people feared trapped. Rescue operation underway: Delhi Fire Service pic.twitter.com/PTh0ksEUDq
‘मै झुकेंगा नही’ हे बॅनर म्हणजे कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. आम्ही 20 वर्ष दिव्यांगांसाठी, शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणं आंदोलन केली. जर कोणी येऊन असे आरोप करत असेल तर कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होतात असे वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केलं. आज आमची भूमिका जिल्हा प्रमुख यांच्याशी बैठक करुन जाहीर करणार आहे. माझी भूमिका मी जाहीर करणार नाही तर एक दिव्यांग व्यक्ती जाहीर करणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले.
 
#NewsAlert गुजरातच्या आणंद, मेहसाणा जिल्हाधिकाऱ्यांना नागरिकत्व देण्याचे अधिकार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा मोठा निर्णय #Gujrat @_prashantkadam https://t.co/MhVUjlXUWW pic.twitter.com/zBIBvMQAUT
Pune News : पुण्यातील लुल्लानगर परिसरात असणाऱ्या एका प्रसिद्ध हॉटेलला आग लागली आहे. हे हॉटेल एका इमारतीमध्ये सातव्या मजल्यावर असल्यामुळे आगीचे लोण पसरत आहेत. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी उपस्थित असून आग विझवण्याचं काम सुरु आहे.
Maharashtra Political Crisis : राज्याच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Politics) राज्यात उत्सुकता निर्माण झालेली असतानाच आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) या संदर्भात सुनावणी होणार आहे. राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी ही सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर होणार आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये न्यायालयाच्या कामकाजामध्ये अनेक सुट्ट्या असल्याने ही सुनावणी महिनाभर पुढे ढकलण्यात आली होती.
सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
1 नोव्हेंबर रोजी देशातील अनेक राज्यांच्या निर्मितीचा इतिहास आहे. 1 नोव्हेंबर 1956 रोजी मध्य प्रदेशची स्थापना झाली. जे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि लोकसंख्येच्या बाबतीत सहावे मोठे राज्य आहे. 1 नोव्हेंबर 1966 रोजी भाषेच्या आधारावर हरियाणाची निर्मिती झाली. हा पूर्वी पूर्व पंजाबचा भाग होता. हरियाणा हे ऐतिहासिक दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाचे आहे, कारण पानिपतच्या तीन लढाया पानिपतच्या मैदानात झाल्या होत्या. हरियाणातील प्रमुख शहरांमध्ये गुडगाव, फरिदाबाद, अंबाला, हिसार, रोहतक आणि सोनीपत यांचा समावेश आहे. छत्तीसगड हे भारतातील दहावे सर्वात मोठे राज्य आहे. जे मध्य प्रदेशातील काही जिल्हे मिळून 1 नोव्हेंबर 2000 रोजी स्थापन झाले. 1 नोव्हेंबर 1956 रोजी कर्नाटकची स्थापना झाली. 1950 मध्ये भारत प्रजासत्ताक बनला तेव्हा विशिष्ट प्रदेशात बोलल्या जाणार्‍या भाषांच्या आधारे अनेक राज्ये आणि प्रांत निर्माण झाले. त्याच वेळी दक्षिण भारतातील कन्नड भाषिक लोकांसाठी म्हैसूर नावाचे राज्य निर्माण झाले. परंतु अनेक प्रदेशांनी म्हैसूर हे नाव स्वीकारले नाही आणि लोकांनी राज्याचे नाव बदलण्याची मागणी केली. शेवटी 1 नोव्हेंबर 1973 रोजी त्याचे कर्नाटक असे नामकरण करण्यात आले. केरळची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली आणि या दिवशी केरळ पिरवी दिनम दरवर्षी साजरा केला जातो. 1 नोव्हेंबर 1956 च्या राज्य पुनर्रचना कायद्याने हैदराबाद संस्थानाचे विभाजन होऊन तेलगू भाषकांचा आंध्र प्रदेश निर्माण झाला.
1950 : भारतातील पहिले वाफेचे इंजिन तयार करण्यात आले 
भारतातील पहिले वाफेचे इंजिन याच दिवशी चित्तरंजन रेल कारखान्यात तयार करण्यात आले होते. 1950 मध्ये या दिवशी भारतातील पहिले वाफेचे इंजिन चित्तरंजन रेल कारखान्यात तयार करण्यात आले होते. 1971 मध्ये येथे वाफेच्या इंजिनांचे उत्पादन पूर्णपणे बंद करण्यात आले आणि त्या जागी डिझेल इंजिन बनवण्यास सुरुवात करण्यात आली.
1956 : दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश बनले
स्वातंत्र्यानंतर दिल्ली देशाची राजधानी बनली. नंतर 1 नोव्हेंबर 1956 रोजी याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला.
1963 : नीता अंबानी यांचा जन्मदिवस 
नीता अंबानी यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1963 रोजी मुंबईत झाला. नीता अंबानी या सुप्रसिद्ध व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या पत्नी आहेत. 
1973: ऐश्वर्या राय बच्चनचा जन्मदिवस 
ऐश्वर्या राय बच्चनचा आज वाढदिवस आहे. ऐश्वर्या ही भारतीय चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. 1994 मध्ये मिस इंडिया स्पर्धेची उपविजेती ठरल्यानंतर तिने त्याच वर्षी जागतिक सौंदर्य स्पर्धा जिंकली. ऐश्वर्या रायने हिंदीशिवाय तेलुगू, तामिळ, बंगाली आणि इंग्रजी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
आजच्या दिवशी घडलेल्या इतर महत्वाच्या घटना :
1870: अमेरिकेत हवामान विभागाने पहिला अधिकृत हवामान अंदाज सांगितला.
1940: भारताचे 35वे सरन्यायाधीश रमेश चंद्र लाहोटी यांचा जन्म.
1945: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांचा जन्म.
1974: क्रिकेटपटू वी. वी. एस. लक्ष्मण यांचा जन्म.
1873: बंगाली नाटककार दीनबंधू मित्र यांचे निधन.
ट्विटरच्या ब्ल्यू टिकसाठी दरमहा 661 रुपयांचं शुल्क, इलॉन मस्कची घोषणा
टाटा ग्रुपमध्ये बंपर भरती,  iPhone च्या प्लॅन्टमध्ये 45,000 महिला कर्मचाऱ्यांची होणार भरती
White Paper : व्हाईट पेपर किंवा श्वेतपत्रिका म्हणजे काय? राज्यात आतापर्यंत कोणत्या विषयांवर श्वेतपत्रिका काढण्यात आली?
Devendra Fadanvis : नायगाव BDD चाळीच्या विकासाचं काम 1 जानेवारीपासून सुरू, देवेंद्र फडणवीसांनी घेतला कामाचा आढावा 
Digital Currency: आरबीआयने लॉन्च केली भारताची डिजिटल करन्सी, डिजिटल रुपया कसा काम करेल? जाणून घ्या

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares