Narendra Singh Tomar : कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर आज पुण्यात, फलोत्पादन क्षेत्रातल्या योगदानाबद्दल – ABP Majha

Written by

By: एबीपी माझा वेब टीम | Updated at : 01 Nov 2022 09:27 AM (IST)
Edited By: गणेश लटके
Narendra Singh Tomar
Narendra Singh Tomar : केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) हे आज (1 नोव्हेंबर) पुणे दौऱ्यावर आहेत. तोमर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात (Pune) राष्ट्रीय पातळीवरील फलोत्पादन मूल्य साखळीसंबंधी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. फलोत्पादन क्षेत्रातील योगदानाबद्दल शेतकरी, एफपीओ, कृषी आधारित स्टार्ट-अप, उद्योजक, बँकर्स यांचा कृषीमंत्र्यांच्या हस्ते आज सत्कार होणार आहे. केंद्र सरकारच्या कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयातर्फे पुण्यातील वैंकुठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेत (VAMNICOM) या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
दरम्यान, आजच्या या कार्यक्रमात एका प्रदर्शनाचे उद्घाटनही कृषीमंत्री तोमर यांच्या हस्ते होणार आहे. तेसच फलोत्पादन क्षेत्रातील योगदानाबद्दल शेतकरी, एफपीओ, कृषी आधारित स्टार्ट-अप, उद्योजक, बँकर्स यांचा सत्कारही होणार आहे. तसेच सेंद्रीय मूल्य साखळीवर आधारित, फलोत्पादन क्षेत्रातील यशोगाथांचे संकलन असणाऱ्या ‘ऑरगॅनिक पॅकेजिंग ऑफ प्रॅक्टीस फॉर हॉर्टिकल्चर क्रॉप्स’ नावाच्या पुस्तकाचे प्रकाशनही कृषीमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. ‘भारतात फलोत्पादन मूल्य साखळीचा विस्तार-शक्यता आणि संधी’ या विषयावर आधारित या कार्यक्रमात शेतकरी, कृषी आधारित स्टार्ट-अप, संशोधक, धोरणकर्ते, बँकर्स आणि इतर भागधारक सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी, एफपीओ, विविध पिकांसाठीची उत्कृष्टता केंद्रे, भारतीय कृषी संशोधन परिषदेची पिक विशिष्ट संशोधन केंद्रे तसेच प्रिसिजन फार्मिंग डेव्हलपमेंट सेंटर्स असे संबंधित भागधारक एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
परदेशी, देशी आणि उच्च मूल्ये असणाऱ्या बागायती पिकांसंदर्भातील कार्यक्रम आणि संधी या सत्राचे आयोजन करण्यात आलं आहे. या सत्रात कृषी आणि कृषक कल्याण विभागाचे प्रतिनिधी परदेशी, देशी आणि उच्च मूल्ये असणाऱ्या बागायती पिक क्षेत्रातील संधींचा आढावा घेतील. त्याचबरोबर वक्ते, सेंद्रिय शेती क्षेत्रात फलोत्पादन मूल्य शृंखलेचा अवलंब करण्याबद्दल मार्गदर्शन करतील आणि विदेशी फळांशी संबंधित शेतकऱ्याच्या यशोगाथाही उपस्थितांना सांगतील.
या सत्रात भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या फुलांशी संबंधित संशोधनविषयक संचालनालयाचे प्रतिनिधी, या क्षेत्रातील संधी, आव्हाने आणि पुढच्या वाटचालीबद्दल चर्चा करतील. तसेच या क्षेत्रातील ई-कॉमर्स आणि वेस्ट टू वेल्थ स्टार्ट-अपची वाढ आणि यशोगाथा उपस्थितांना सांगतील.

या सत्रात भारतीय कृषी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि -भारतीय फलोत्पादन संशोधन आणि संस्था (ICAR- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चरल रिसर्च) यासंस्थेचे प्रतिनिधी भारतातील फलोत्पादनातील कापणीनंतरचे तंत्रज्ञान आणि आधुनिकता यावर भाष्य करतील. तसेच, या क्षेत्रांतील तज्ज्ञ वक्ते फलोत्पादनांतील ताजेपणा टिकविण्यासाठी तंत्रज्ञान आणि आधुनिकता तसेच यशस्वी कृषी उत्पादन संस्था (FPO) यांवर मार्गदर्शनपर भाषणे करतील.
या सत्रात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी आंत्रप्रेनरशिप अँड मॅनेजमेंट अर्थात निफ्टेम (NIFTEM) यांच्या प्रतिनिधीद्वारे  फलोत्पादनातील  कापणीनंतरचे  तंत्रज्ञान यांचे अवलोकन केले जाईल. तसेच, अन्न तंत्रज्ञानात अग्रेसर रहाण्यासाठी फलोत्पादनातील नवीन संशोधन आणि केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थेची (CFTRI) त्याबाबत भूमिका यावर चर्चा होईल.
या सत्रात कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण, अपेडाच्या (APEDA) प्रतिनिधीद्वारे भारतीय फलोत्पादनातील  निर्यातीच्या संधींबद्दल  मार्गदर्शन केले जाईल. फलोत्पादन मूल्य साखळी परीचालनासाठी असलेले बाजार / कंपन्या फलोत्पादन वस्तूंचे विपणन आणि निर्यात यावर कृषी / बागायती स्टार्ट-अप यांसाठी तज्ञांसह चर्चासत्र आयोजित केले जाईल.
या सत्रात फलोत्पादनातील यांत्रिकीकरण आणि त्यात भारतीय कृषी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि -भारतीय फलोत्पादन संशोधन आणि संस्था (ICAR- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चरल रिसर्च) यांची भूमिका याबद्दल चर्चा होईल. यावेळी वक्ते ग्रामीण भारतातील फलोत्पादन आणि शाश्वत शेतीमध्ये येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना सांगतील.
या सत्रात वनस्पती संरक्षण विलिनीकरण आणि साठवण संचालनालयाच्या प्रतिनिधीद्वारे कीटकमुक्त फलोत्पादन उत्पादनाचा आढावा घेतला जाईल. तसेच, वक्ते फलोत्पादन क्षेत्रातील निर्यातीच्या संधी आणि सेंद्रिय फलोत्पादन निर्यातीवरील महिला उद्योजकांच्या यशोगाथा यावर बोलतील.
महत्त्वाच्या बातम्या:
Maharashtra News Updates 01 November 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर…
Jalna News: जालना औद्योगिक वसाहतीतल्या स्टील कंपनीत स्फोट
Sangli Crime : इन्स्टास्टार गौतमी पाटीलच्या बेडगमधील लावणी कार्यक्रमाच्या परिसरात एकाचा संशयास्पद मृत्यू
GST Collection: ऑक्टोबर महिन्यात उच्चांकी जीएसटी संकलन, महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा
‘शेतकऱ्यांना फक्त एक रुपयात पीकविम्याचे कवच’; कृषिमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती
Kishori Pednekar Enquiry : ‘कर नाही त्याला डर कशाला’, दादर पोलिसांकडून अडीच तासांच्या चौकशीनंतर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया
Sukesh Chandrashekhar: ‘प्रोटेक्शन मनी’ म्हणून ‘आप’च्या मंत्र्याला 10 कोटी दिले; सुकेश चंद्रशेखरच्या दाव्याने खळबळ
Kiran Lohar ACB Raid : लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या बंगल्याची झाडाझडती; सोलापूर ACB ला अहवाल दिला जाणार
Onion Rates Hike : नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याची आवक घटल्याने दरात दुप्पट वाढ, घाऊक दर 15 रुपयांवरुन 30 रुपयांवर पोहोचला
Maharashtra Political Crisis: सत्तासंघर्षाची सुनावणी चार आठवडे लांबणीवर, सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares