Raigad News: उरण बीपीसीएलच्या १४०० कोटी विस्तारित प्रकल्पातही प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या नाहीत – Lokmat

Written by

Latest Marathi News | लोकमत / Lokmat Marathi newspaper | Live Marathi Batmya | ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com
हिंदी | English
मंगळवार १ नोव्हेंबर २०२२
FOLLOW US :

शहरं
मनोरंजन
व्हिडीओ
सखी
आणखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2022 10:34 PM2022-10-31T22:34:20+5:302022-10-31T22:34:49+5:30
– मधुकर ठाकूर
उरण – उरण येथील बीपीसीएल प्रकल्पात सुमारे १५० प्रकल्पग्रस्त शेतकरी मागील ३० वर्षांपासून अद्यापही नोकऱ्यांपासून वंचित आहेत.या प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांचा नोकऱ्यांसाठी गेल्या ३० वर्षांपासून जोरदार संघर्ष सुरू आहे. मात्र ३० वर्षांच्या संघर्षानंतरही प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला नसल्याने  प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पाच्या प्रवेशव्दारावरच बेमुदत सुरू केले आहे. साखळी उपोषणानंतरही बीपीसीएल प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी ९ ऑक्टोबर रोजी  गेटबंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
उरण तालुक्यातील भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीत ३० वर्षांपूर्वी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील या प्रकल्पासाठी भेंडखळ,बोकडवीरा, डोंगरी,फुंण्डे,आदी गावातील सुमारे ३००शेतकऱ्यांच्या २०७ हेक्टर जमीन संपादित करण्यात आलेल्या आहेत.जमिनी संपादन करताना प्रकल्पग्रस्तांना वारेमाप आश्वासने देण्यात आली होती.यामध्ये प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या देण्याच्या आश्वासनांचा समावेश आहे.मात्र आजतागायत ३०० प्रकल्पग्रस्तांपैकी फक्त १७० लोकांनाच नोकऱ्या मिळाल्या आहेत.उर्वरित प्रकल्पबाधीतांनाही प्रकल्पात नोकऱ्या देण्याच्या मागणीसाठी मागील ३० वर्षांपासून बीपीसीएल विरोधात प्रकल्पग्रस्तांचा जोरदार संघर्ष सुरु आहे. बीपीसीएल प्रशासनासोबत अनेकदा निवेदन, चर्चा, बैठका पार पडलेल्या आहेत.निदर्शने,मोर्चे, आंदोलनही करण्यात आली आहेत.मात्र प्रकल्पग्रस्तांच्या पदरी आश्वासनांशिवाय काहीही हाती लागले नाही.
आता तर बीपीसीएल प्रकल्पाचे खासगीकरण करण्यात आले आहे.या खासगीकरणानंतर येथील प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी १४०० कोटी रुपये खर्चून एचपीसीएल प्रोजेक्ट, स्टोरेजटॅन्क आदी उभारण्यात येत आहेत.त्यानंतरही स्थानिक भुमीपुत्र प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या आश्वासनांना हरताळ फासून आणि भुमीपुत्रांना डावलून मोठ्या प्रमाणात परप्रांतीय  कर्मचाऱ्यांची भरती केली जात आहे. स्थानिकांना मात्र नोकर भरतीपासून वंचित ठेवण्यात येत आहे.यामुळे संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी कंपनी प्रशासनाशी अनेकवेळा पत्रव्यवहार केला. परंतु बीपीसीएल कंपनी प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.त्यामुळे बीपीसीएल प्रकल्पाच्या मनमानी कारभारामुळे प्रकल्पग्रस्त त्रस्त झाले आहेत.प्रकल्पग्रस्तांना बीपीसीएल प्रशासन जुमानत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.त्या व्यतिरिक्त १७० स्थानिक प्रकल्पग्रस्त कामगारांपैकी सुमारे ८० कामगार सेवा निवृत्त झाले आहेत.तर काही मृत्यू पावले आहेत.मात्र त्यानंतरही मागील ३० वर्षांपासून एकाही प्रकल्पग्रस्त कामगारांची भरती करण्यात आली नसल्याची माहिती प्रकल्पग्रस्त किरण घरत यांनी दिली.
बीपीसीएल प्रशासन जुमानत संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी येथील भारत पेट्रोलियम विरोधात प्रकल्पग्रस्तांनी संघर्षाची भूमिका घेतली आहे. आधी  उपोषण त्यानंतर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.मात्र या साखळी  उपोषणानंतरही बीपीसीएल प्रशासनाकडून प्रश्न सुटला नाही तर ९ ऑक्टोंबरपासुन सर्वपक्षीयांच्या नेतृत्वाखाली गेटबंद  आंदोलन छेडण्याचा निर्वाणीचा इशाराही प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.
FOLLOW US :

Copyright © 2020 Lokmat Media Pvt Ltd

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares