निपाणी : आंदोलन – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
nip0203
59831
धारवाड : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित ठिय्या आंदोलनप्रसंगी राजू पोवार, चुनाप्पा पुजारी, राघवेंद्र नाईक, मल्लाप्पा अंगडी यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते.
धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या
रयत संघटना आक्रमक ः ऊस दरासह नुकसान भरपाईची मागणी
निपाणी, ता. २ : यंदाच्या हंगामातील उसाला सरकार आणि साखर कारखान्यांनी एकत्र येऊन प्रतिटन 5 हजार 500 रुपये दर द्यावा या मागणीसाठी आक्रमक झालेल्या रयत संघटनेतर्फे प्रत्येक तालुक्यामध्ये आंदोलन केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर धारवाड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. निर्णय होईपर्यंत आंदोलन छेडण्याचा इशारा चिक्कोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी दिला.
राजू पोवार म्हणाले, उसाला प्रतिटन पाच हजार ५०० रुपये दराची मागणी साखर मंत्र्यांसह कारखान्यांकडे केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन साखरमंत्र्यांनी दिले होते. पण तोडगा न निघाल्याने बेळगाव जिल्ह्यात आंदोलन सुरू ठेवले आहे.
चुनाप्पा पुजारी, शिवानंद मोगलीहाळ, गणेश एळगेर, संजू हुवनावर, राजेंद्र नाईक, कुमार बोबटे, रमेश पाटील, उमेश भारमल, बाबासाहेब पाटील, नामदेव साळुंखे, सुभाष देवर्षी, चिनू कुळवमोडे, रोहन पाटील यांच्यासह शेतकरी व रयत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
———-
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares