Abdul Sattar : मदतीपासून एकही शेतकरी वंचित नसेल : कृषिमंत्री सत्तार – Agrowon

Written by

पुणे ः अतिवृष्टीमुळे (Wet Drought) संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून गांभिर्याने पावले टाकली जात आहेत. नुकसान (Crop Damage) झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दखल सरकार घेईल, अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिली.
पुणे दौऱ्यावर असताना मंगळवारी (ता. १) पत्रकारांशी ते बोलत होते. ‘‘विरोधी पक्ष या मुद्द्यावर काही बोलत असल्यास बोलू द्या. तो त्यांचा अधिकार आहे. मात्र नुकसान भरपाईपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही याकरिता आम्ही काळजी घेत आहोत. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील शेतकरीपुत्र आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव आहे. त्यामुळेच साडेचार हजार कोटींची मदत आतापर्यंत राज्यभर केली गेली. अतिपावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची माहिती घेण्यासाठी पंचनामे सुरू आहे. पंचनामे पूर्ण होताच मदतवाटपाची प्रक्रिया सुरू होईल,’’ असे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले.
नुकसान भरपाई वाटप नियोजनाविषयी ते म्हणाले, ‘‘नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याच्या कामकाजाबाबत मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांशी चर्चा केलेली आहे. नुकसानग्रस्त भागांना मी स्वतःही भेटी दिल्या आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत. अतिपावसामुळे हानी झालेल्या भागांची माहिती मुख्यमंत्रीही घेत होते. त्यांनी निराश झालेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम केलेले आहे. चांगली मदत देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.’’
राजीनामा देण्यास तयार
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या आव्हानाबाबत श्री. सत्तार यांना पत्रकारांशी छेडले. ‘‘मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्यास मी एका आठवड्यात माझ्या पदाचा राजीनामा देईल. मी सिल्लोडमधील आमदारकीचाही राजीनामा देईन. मात्र ठाकरे यांनी वरळी मतदार संघाचा राजीनामा द्यावा. दोन वर्षांची वाट कशासाठी बघायची? लगेचच टेस्ट मॅच खेळा आणि दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊ द्या.’’ अशा शब्दांत श्री. सत्तार यांनी श्री. ठाकरे यांना प्रतिआव्हान दिले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
© agrowon 2022

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares