Agriculture Minister : कृषीमंत्री अब्दुल सत्तार उतरले बांधावर, वारंगा येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी – TV9 Marathi

Written by

|
Aug 20, 2022 | 6:24 PM
नागपूर : अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहेत. नुकसानग्रस्त भागाचा सर्वे करा. पंचनामे करा, त्यांच्या भावना समजावून द्या. शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्याच्या प्रयत्न करा. अशा सूचना राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी महसूल ( Revenue) व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. नागपूर ग्रामीणमधील पांझरीलोधी व वारंगा येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी कृषी मंत्र्यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, उपविभागीय अधिकारी (Sub Divisional Officer) इंदिरा चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (District Agriculture Superintendent) मिलींद शेंडे, नायब तहसीलदार सचिन शिंदे, नियोजन मंडळाचे सदस्य, पदाधिकारी,अधिकारी व कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी पांझरीलोधी येथील शेतकरी प्रशांत मारोती ठाकूर यांच्या कापूस शेतीची पाहणी केली. शेतात आठ ते दहा दिवस पाणी साठल्याने तेथील पीक पूर्णत: करपून गेले आहे. तेथे पुर्नशेतीच करावी लागणार आहे. त्यासोबत वारंगाचे सरपंच राजेश भोयर यांच्या शेतात पाणी शिरल्याने त्यांचेही पीक नष्ट झाले आहे. तलाठी, कृषी सहायकांनी योग्य सर्व्हे व पंचनामे करावेत. प्रत्यक्ष तपासणी सोबतच त्या भागाची व्हिडिओग्राफी व फोटोग्राफीसह यथोचित प्रस्ताव सादर करावेत. जेणे करुन अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे, या कामात कुठलीही हयगय होता कामा नये, असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधितांना दिले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून नुकसानग्रस्त भागाची माहिती घेतली. यावेळी गावातील शेतकरी, नागरिक, तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक उपस्थित होते.
विदर्भात मागील काही दिवसांपासून निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी नागपूर विभागीय कार्यालयात बैठक बोलावली होती. या बैठकीत कामठी मौदा विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या अडचणी आणि समस्यांकडे शासनाचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ कसा देता येईल. याकडे सुद्धा सकारात्मक दृष्ट्या पाहिले जावे, अशी विनंती यावेळी आमदार टेकचंद सावरकर यांनी केली. पीक विम्याच्या संदर्भात जनजागृती करण्याच्या दृष्टीने विस्तृत माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. नुकसान भरपाई देताना कोणीही वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी असेही यावेळी सांगितले.

Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 1517
Channel No. 1259
Channel No. 682

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares