Latest Marathi News | पेठरोडवरील खड्ड्यामुळे नागरिक त्रस्त अन् पाठदुखीने चालक हैरान – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
मखमलाबाद (जि. नाशिक) : शहरातील मुख्य रस्ता असलेल्या आणि परराज्याला जोडणाऱ्या पेठ रोडवरील खड्ड्यांमुळे रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे.मोठे खड्डे पडल्याने ‘खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे’ अशी म्हणण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे. खड्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याने या मार्गावरुन वाहतूक करताना चालक, स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.
खड्ड्यांमुळे नागरिकांना पाठदुखी तसेच रस्त्यांवर साचलेल्या धुळीमुळे श्‍वसनाच्या तक्रारी जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे लवकर या रस्त्याची रस्त्याची दुरुस्ती न केल्यास नागरिकांकडून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. पेठ रोड हा अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरुन दररोज हजारो वाहनांची ये-जा सुरू असते.
यातच याच मार्गावर बाजार समिती असल्याने शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे. यासह मखमलाबाद, म्हसरूळमधील नागरिकांसाठी पेठ रोड महत्त्वाचा आहे. अवजड वाहने, प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सदेखील याच मार्गाचा वापर करतात. सततच्या पावसामुळे या रस्त्यावर मोठे खड्डे तयार झाली आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साठल्याने खड्यांचा अंदाज वाहनचालक यांना येत नसल्याने अनेक छोटे, मोठे अपघातदेखील झाले.
हेही वाचा: Nashik : घर सोडून गेलेल्यांची पोलिसांमुळे ‘घरवापसी’
मात्र आता पाऊस थांबून सुमारे आठ ते दहा दिवसांचा कालावधी ओलांडला आहे. शहरातील इतर मार्गांवर असलेल्या रस्त्यांची डागडुजी जोरात सुरू आहे. मात्र पेठ रोडवर पडलेल्या खड्ड्याकडे दुर्लक्ष झाल्याची ओरड स्थानिक नागरिक करत आहे. ओरड झाल्याने प्रशासनाकडून केवळ खड्ड्यात माती टाकून रस्त्यांची मलमपट्टी करण्याचा धडाका सुरू आहे.
"पेठ रोड हा वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात माती टाकून ते बुजविले जात आहे. मात्र या खड्डे बुजविण्याच्या उपायांमुळे आम्हाला या रस्त्यावरून जाणे अवघड झाले आहे. माती टाकल्याने धुळ उडत आहे. धूळ दारे, खिडक्यांवाटे घरात येत आहे. दैनंदिन वापराचा हा महत्त्वाचा रस्ता असल्याने रस्ता लवकरात लवकर व्हावा, हीच अपेक्षा आहे." -दिलीप रसाळ, स्थानिक रहिवासी
"पेठ रोडवर पक्के डांबरीकरण व्हावे यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र पडलेल्या खड्ड्यात माती टाकून तात्पुरती केली जाणार मलमपट्टीने रस्त्यांची अवस्था पुन्हा जैसे थे होणार आहे. परिसरातील शेतकरी व नागरिक यांनीही यासंबंधी तक्रारी केल्या आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ हा रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावून नागरिकांना दिलासा द्यावा."
– सुनीता पिंगळे , माजी नगरसेविका
हेही वाचा: Nashik : ड्रोनच्या घिरट्यांसाठी परवानगी आवश्‍यकच : पोलीस आयुक्त
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares