Raju Shetti | “सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे गांभिर्याने लक्ष दिले नाही तर… “; राजू शेट्टींचा राज्य सरकारला इशारा – Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

Written by

Raju Shetty | “If the government does not pay serious attention to the farmers’ problems… “; Raju Shetty’s warning to the state government
Raju Shetti | अहमदनगर : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. तसेच राज्यात यंदाचा गळीत हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. मात्र ऊस तोडण्या अजून सुरू झाल्या नसल्याचं दिसून येतं आहे.  स्वाभिमान पक्षाचे (Swabhiman Party) नेते राजू शेट्टी (Raju Shetti) अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळवून देण्यासाठी आंदोलन करत असतात. याहीवर्षी त्यांनी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आणि आता अहमदनगरमध्ये आंदोलन केले आहे. यादरम्यान राजू शेट्टींनी राज्य सरकराला इशारा दिला आहे.
राज्यातील साखर कारखान्याचे काटे ऑनलाईन केले जावेत, सर्व साखर कारखान्याच्या काट्यांवर साखर आयुक्तांचे नियंत्रण असावे आणि यासंदर्भात अंमलबजावणी करावी या मागणीसाठी येत्या 7 तारखेला पुण्यात साखर आयुक्तालयावर भव्य मोर्चा काढणार आहे. सरकारने गांभिर्याने लक्ष दिले नाही तर 17 आणि 18 नोव्हेंबरला राज्यातील ऊस वाहतूक बंद पाडणार असल्याचा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. पुढे बोलताना ते असंही म्हणाले की, साखर कारखाने काट्यामध्ये शेतकऱ्यांचा ऊस लुटतात.
राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याच्या टाकळीमियाँ येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परीषद झाली. त्यावेळी शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून शिंदे-फडणवीस सरकारसह विरोधकांवरही निशाणा साधला. मागच्या वर्षी तुटलेल्या ऊसाला एफआरपी पेक्षा दोनशे रूपये जास्त दर साखर कारखानदारांनी दिले पाहिजेत. तसेच यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देत हंगाम संपल्यानंतर 350 रूपये द्यावेत अशी मागणी राजू शेट्टींनी ऊस परिषदेत केली आहे.
तसेच, मुकादमांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याने मुकादम व्यवस्था संपवावी आणि बांधकाम मजुरांप्रमाणे महामंडळाने ऊस तोडणी मजूर पुरवावेत. मुकादम कारखाना आणि शेतकऱ्यांची देखील फसवणूक करतात यामुळे सर्वात जास्त नुकसान शेतकऱ्यांचे होत असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :

>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<

>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA
© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA
Login to your account below
Please enter your username or email address to reset your password.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares