Shirdi Sai Baba: शिर्डीतील हार-फुलांचा वाद पेटला; विक्रेते-ग्रामस्थ आक्रमक; मंदिरातच मोठी खडाजंगी – TV9 Marathi

Written by

| Edited By: महादेव कांबळे
Aug 26, 2022 | 12:56 PM
शिर्डीः शिर्डीतील साई मंदिरातील (Sai Mandir Temple Shirdi) हार-फुले आणि प्रसादावारील बंदी (Har-Fule Andolan) हटवावी यासाठी आज फुल विक्रेते आणि ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. हार फुलं घेऊन विक्रेत्यांनी साई दर्शनासाठी जाण्याचा प्रयत्न केला असता साईबाबा संस्थान सुरक्षा रक्षक आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापटही यावेळी झाल्याचे दिसून आले. यावेळी आंदोलकांनी बॅरेगेट हटवण्याचा प्रयत्न केला असतानाच मोठी खडाजंगी झाल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. यावेळी मंदिर परिसरातील विक्रेत्यांकडून हार-फुले हिसकावल्याने आंदोलक संतप्त झाले होते. जमिनीवर लोटांगण घालत आंदोलकांनी (agitation) साईबाबा विश्वस्तांना सदबुद्बुी दे असेही साकडे घालण्यात आले. यावेळी आंदोलकांना शांत करत त्यांना मंदिरात दर्शनासाठी सोडण्यात आले.
शिर्डी साई मंदिरात हार-फुले आणि प्रसाद घेऊन जाण्यास बंदी असल्याने ही बंदी उठवावी या मागणीने जोर धरला आहे. त्यामुळे याप्रकरणी आता कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे साई समाधीवर फुले वाहून गांधीगिरी मार्गाने आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
साईबाबा संस्थान प्रशासनाने काळे यांना आंदोलन करण्यास मज्जाव केला असुन तसे पत्रदेखील देण्यात आले आहे. त्यामुळे काळे यांना मंदिरात प्रवेश दिला जातो का याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
संजय काळे आपल्या आंदोलनावर ‌ठाम असुन कोपरगाव येथील त्यांच्या निवासस्थानापासुन शिर्डी असे 15 किलोमीटर ते पदयात्रा करणार आहेत तर तर दुसरीकडे आज साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाची बैठक असल्याने यामध्ये बंदीचा निर्णय मागे घेतला जातो का याकडेही शेतकरी, व्यावसायिक आणि त्यावर अवलंबून असणारे मजूरांचे लक्ष लागून राहिले आहे.
संजय काळे यांना आंदोलन करू नये यासाठी संस्थान प्रशासनाकडून पत्र देण्यात आले असले तरी साई समाधीवर फुल अर्पण करण्यावर बंदी उठवण्याची मागणी करण्यात आली आहे. संजय काळे यांच्या या आंदोलनाला शेतकरी , व्यवसायिक आणि ओवणी मजुरांचादेखील आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यात आला आहे.

Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 1517
Channel No. 1259
Channel No. 682

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares