Sindhudurg : बाल शेतकरी दुडु दुडु पावलांनी शेती करतोय, शेतातील लीलया पाहून सर्वत्र कौतुक – TV9 Marathi

Written by

|
Jun 04, 2022 | 3:19 PM
सिंधुदुर्गमध्ये अंगणवाडीत शिकणारा तळकोकणातील बालशेतकरी आहे. फोंडाघाट गावातील अवघ्या चार वर्षांचा चैतन्य जोईल हा शेतकरी शेतात लीलया वावरतो. कहर म्हणजे शेतातील सर्व कामांबरोबरच जोत(हल)ही धरतो. दुडु दुडु पावलांनी शेतात जोत धरताना त्याचे व्हिडिओ वायरल झालेत. शेतीची प्रचंड आवड असलेला हा छोटा बळीराजा सध्या कोकणात जोरात वायरल होत आहे.त्याच्या या शेतातील लीलया पाहून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
लहान मुला एका बैलाची काळजी घेतोय…त्याला रानातून फिरवतोय…त्या बैलाने देखील त्याला जीव लावला आहे. दोघांत मैत्रीचं नात घट्ट झाल्याचं दिसतंय
ग्रामीण भागात अनेक लहान मुलांना बैल, शेतकरी, शेतीसाठी लागणारं साहित्य या गोष्टीची प्रचंड वेड असतं. वडिल ज्या प्रमाणे बैलाची काळजी घेतात. त्याचप्रमाणे लहान मुलगा सुद्धा घेत असतो असं चित्र बऱ्यादचा गावाकडं पाहायला मिळतं. तसेच सध्या सोशल मीडियावर अनेक लहान मुलांचे व्हि़डीओ व्हायरल होतात.
इतर लोकांप्रमाणे चिमुरडा शेतात राबतोय. घरचे जसे काम करीत आहेत. त्याप्रमाणे काम करतोय. या फोटोमध्ये तो नांगरणीनंतर दिसत असलेली ढेकळं हातातली बांबूने बारीक करीत आहे.
Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 1517
Channel No. 1259
Channel No. 682

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares