Todays Headline 2 November 2022 : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या – ABP Majha

Written by

By: एबीपी ब्युरो | Updated at : 02 Nov 2022 12:04 AM (IST)
Edited By: सतिश केंगार
Todays News
Todays Headline : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी…  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे पुन्हा कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येणार 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एका कार्यक्रमानिमित्त एकत्र येणार आहेत.  महेश मांजरेकरांच्या ‘वीर दौडले सात’ या सिनेमाच्या मुहूर्तासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. ताज लँड्स एंड, वांद्रे, संध्याकाळी 7.30 वाजता
शरद पवार भारत जोडो यात्रेला उपस्थित राहणार का? आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मागील दोन दिवसांपासून मुंबईतील प्रसिद्ध ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल आहेत. आज त्यांची एक महत्त्वाची टेस्ट होणार असून त्यानंतरच त्यांना डिस्चार्ज मिळणार की त्यांची ट्रीटमेंट सुरू राहणार याबाबतीत डॉक्टर निर्णय घेणार आहेत. जर सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या तर आज दुपारी दोन पर्यंत शरद पवार यांना डिस्चार्ज मिळू शकतो आणि त्यानंतर ते शिर्डी येथे होणाऱ्या अधिवेशनासाठी जाणार आहेत. दुसरीकडे भारत जोडो यात्रेत शरद पवार सामील होणार असल्याचं अशोक चव्हाणांनी म्हटलंय. या अनुषंगाने निलेश बुधावले बातमी देईल.
कोल्हापुरात लव जिहादवरुन नितेश राणेंचा ठिय्या
लव्ह जिहाद झाल्याच्या संशयावरून भाजपचे आमदार नितेश राणे कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या समोर ठिय्या आंदोलन करणार आहेत. एक अल्पवयीन मुलगी पंधरा दिवसांपासून बेपत्ता आहे. एका मुस्लिम तरुणाने तिला फूस लावून पळून नेल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीसांनी तपासासाठी 3 पथकं तैनात केली आहेत.
आज राज्य मंत्रीमंडळाची बैठक
राज्य मंत्रिमंडळाची मंत्रालयात बैठक आहे. या बैठकीत राज्यातील उद्योगांसंदर्भात चर्चा होईल. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी श्वेतपत्रिकेची घोषणा केलेली आहे. यावरती सुद्धा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.
अंधेरी पोटनिवडणूक मतदान तयारी
गुरुवारी 3 तारखेला अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे.  काही लोकांना नोटा देऊन नोटा बटण दाबण्यासाठी दबाव टाकला जातोय, असा आरोप करत ऋतुजा लटकेंनी निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिलंय. तसेच, या पोटनिवडणुकी संदर्भात मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांची पत्रकार परिषद होणार आहे. दुपारी 2 वाजता
आज भारत वि. बांग्लादेशमध्ये लढत
आज टी- 20 वर्ल्डकपमध्ये अँडलेडमध्ये भारत वि. बांग्लादेश सामना होणार आहे. द.आफ्रिकेविरोधात झालेल्या पराभवामुळे भारतानं हा सामना जिंकल्यास भारताची उपांत्य फेरीची वाट सोपी होईल. मात्र, या सामन्यावर पावसाचं सावट आहे.
आज शाहरुखचा वाढदिवस आहे 
शाहरुख खानचा आज 56 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त रात्रीपासूनच त्याच्या चाहत्यांनी मन्नतबाहेर गर्दी केली आहे. 
विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनावर तोडगा निघणार? आंदोलनकर्त्या शिक्षकांची शिक्षण मंत्र्यांसोबत बैठक 
राज्यभरातील विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी बोलावलेल्या आंदोलक शिक्षकांच्या शिष्ट मंडळाला शिक्षण मंत्र्यांनी बोलून बैठकीत सहभागी करून न घेतल्याने आंदोलन शिक्षक आक्रमक झालेत. मागील 23 दिवसांपासून आझाद मैदानावर राज्यभरातील विनाअनुदानित शिक्षकांचा आंदोलन सुरू आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी १ नोव्हेंबरला दुपारी चार वाजता वेळ दिली होती. मात्र या बैठकीमध्ये फक्त शिक्षक आमदारांसोबत शिक्षण मंत्र्यांनी चर्चा करून कुठलाही तोडगा न काढल्याने आंदोलन शिक्षक मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाहीत. शिवाय दिवाळीनंतर सुरू होणाऱ्या शाळा सुद्धा बंद ठेवणार असल्याचं शिक्षकांनी म्हटलं आहे. आता शिक्षण मंत्र्यांनी आज दुपारी 2 वाजता या शिक्षकांना चर्चेसाठी बोलावलं आहे.
इंदापूर:  राजू शेट्टी हे ऊस परिषद घेणार 
तालुक्यातील सनसर गावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे ऊस परिषद घेणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता.
सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रेत जाहीर सभा 
जळगाव- उद्धव सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रेत जाहीर सभा होणार आहे, सकाळी 8 वाजता.  
 

 
 
CRPF Appointment : सीआरपीएफमध्ये पहिल्यांदा दोन महिला अधिकाऱ्यांची महानिरीक्षक म्हणून नियुक्ती
SEWA : सामाजिक कार्यकर्त्या, सेवा संस्थेच्या संस्थापक इला भट्ट यांचं निधन
सप्टेंबरमध्ये WhatsApp ने आणली 26.85 लाख भारतीयांच्या अकाउंटवर बंदी, हे आहे कारण
पेट्रोल-डिझेलचे दर 2 रुपयांनी घटणार? सरकार आखतंय नवी रणनिती
Coronavirus : गेल्या 24 तासात देशात 1 हजार 190 नवीन कोरोना रुग्णांची नोंद 
Shivsena : ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगात अडीच लाख सदस्यत्वाचे अर्ज दाखल
संभाजी भिडे यांना महिला आयोगाची नोटीस; महिला पत्रकाराला उद्देशून केलेल्या वक्तव्यावरुन होतेय टीका…
Maruti Suzuki Cars: मारुतीने 40 वर्षात केलं 2.5 कोटी कारचे उत्पादन, जाणून घ्या कंपनीच्या यशाचे रहस्य
‘वेडात मराठे वीर दौडले सात’ सिनेमा, अक्षय कुमार शिवाजी महाराजांच्या भूमिकेत
IPL 2023 : शिखर धवन पंजाबचा कर्णधार, मयांकचा पत्ता कट

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares