आंबा, काजू बागायतदारांचे 18 ला उपोषण – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
आंबा, काजू बागायतदारांचे १८ ला उपोषण
कर्जमाफीची मागणीः उप जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ३ः महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत २ लाखावरील कर्जदार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी तसेच खावटी कर्जदार शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी मिळावी, या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांनी १८ ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन आज उप जिल्हाधिकारी जयकृष्ण फड यांच्याकडे सादर केले.
सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन देउन तसेच धरणे आंदोलन, मोर्चा काढून त्यांचे लक्ष वेधले. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या मागण्याची दखल घेतली गेलेली नाही. कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याच्या समस्या व मागण्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. केवळ आश्वासने देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कर्जबाजारी आंबा बागायतदार शेतकरी एकवटले असून त्यांनी आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आमच्या मागण्यांबाबत तात्काळ निर्णय जाहीर करावा; अन्यथा १८ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले जाईल, असा इशारा दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बदलत्या वातावरणामुळे आंबा, काजू हंगामामध्ये फळांना फळमाशीचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. दिलेल्या पीक विम्याच्या नुकसान भरपाईत सुद्धा शेतकऱ्यांचे नुकसान भरून येत नाही. जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार शेतकरी आर्थिक संकटात सपडला आहे. कर्जबाजारी झाल्याने त्यांच्यापुढे आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला नाही. आंदोलन, मोर्चा काढूनही जिल्हा प्रशासन दखल घेत नाही. त्यामुळे १८ पासून उपोषण व त्याची दखल न घेतल्यास शेताच्या बांधावर आत्महत्या करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनावर श्यामसुंदर राय, महादेव गावडे, नारायण गावडे, विट्ठल घोगे, राजन होडावडेकर, उदय गावडे, सुरेश गांवकर, आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares