पिकअप-लक्झरीच्या धडकेत तीन शेतकरी जागीच ठार; संतप्त शेतकऱ्यांनी लक्झरी फोडली; नाशिक-सापुतारा… – TV9 Marathi

Written by

| Edited By: महादेव कांबळे
Jun 09, 2022 | 9:56 PM
नाशिक: नाशिकला (Nashik) भाजीपाला विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या पिकअप आणि लक्झरी बसचा समोरासमोर धडक (Pickup and luxury bus accident)  होऊन झालेल्या भीषण अपघातात पिकअपमधील 3 शेतकरी जागीच ठार (3 farmers Death) झाले. तर चार ते पाच शेतकरी जखमी झाले आहेत. नाशिक-सापुतारा महामार्गावरील (Nashik-Saputara Highway) बोरगावच्या चिखली शिवार वळणावर हा भीषण अपघातात झाला. अपघातानंतर संतप्त शेतकऱ्यांनी लक्झरीच्या काचा फोडून तोडफोड केली आहे. अपघातानंतर घटनस्थळी मोठा जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघातग्रस्त शेतकरी कळवण तालुक्यातील राहिवाशी असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील शेतकरी कळवणहून नाशिकला भाजीपाला विक्रीसाठी घेऊन जात होते. त्यावेळी नाशिक-सापुतारा रोडवर नाशिकच्या दिशेने वळत असताना अचानक जाणाऱ्या पिकअप- लक्झरी बसचा सामोरासमोर धडक होऊन भीषण अपघातात झाला. यावेळी पिकअपमधील 3 शेतकरी जागीच ठार झाले तर चार ते पाच शेतकरी जखमी झाले आहेत.
या अपघातात 3 शेतकरी जागीच ठार झाल्याने जमाव संतप्त झाला होता. अपघातात तीन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी लक्झरी बसच्या काचा फोडून प्रचंड नुकसान करण्यात आले आहे. याप्रकरणी लक्झरी बसच्या चालकावर गुन्हा दाखल करुन त्यांना कडक शिक्षा देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
पिकअपमध्ये शेतातील माल भरला होता, त्यामुळे पिकअप आणि लक्झरी बसची समोरासमोर धडक झाली त्यावेळी पिकअपमधील शेतकऱ्यांचा माल रस्त्यावर विस्कटलेला होता. यावेळी पिकअप वाहनाचेही नुकसान झाले आहे.
नाशिक-सापुतारा महामार्गावरील बोरगावच्या चिखली शिवारात वळणावर हा भीषण अपघातात झाला असून अपघातानंतर संतप्त शेतकऱयांनी लक्झरीच्या काचा फोडून तोडफोड केली.अपघातस्थळी मोठा जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.अपघातग्रस्त शेतकरी कळवण तालुक्यातील राहिवाशी आहेत.

Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 1517
Channel No. 1259
Channel No. 682

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares