राजापूर ःतळवडेत अर्जुना रिव्हरसाईट फार्मर कंपनीची स्थापना – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
फोटो ओळी
-rat३p१८.jpg ः६००७० राजापूर ः अर्जुना रिव्हरसाईड फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. ची माहिती देताना कंपनीचे अध्यक्ष आणि पितांबरी उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई.
———–
तळवडेत अर्जुना रिव्हरसाईट
फार्मर कंपनीची स्थापना
शेतकऱ्यांना एकत्र करणार ; मालाची खरेदीसह विक्रीही करणार
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३ ः भारत हा कृषीप्रधान देश आहे; मात्र, बियाण्यांच्या उपलब्धतेपासून तयार मालाला मिळणार्‍या भावापर्यंत शेतकरी बांधवाच्या अनेक समस्या दीर्घकाळ प्रलंबित असल्याने शेतकर्‍यांची उन्नती व प्रगती होण्याच्या दिशेने प्रत्यक्षात काहीच योजना दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. यावर उपाय म्हणून प्रत्यक्ष शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन आपल्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे याच उद्देशाने कोकणातील राजापूर तालुक्यातील तळवडे येथे अर्जुना रिव्हरसाईड फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. ची स्थापना करण्यात आली आहे.
तालुक्यातील तळवडे येथे पत्रकार परिषेदेत याची घोषणा करण्यात आली. तळवडेचे सुपुत्र व पितांबरी उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई हे या कंपनीचे अध्यक्ष राहणार आहेत. तळवडेचे सरपंच प्रदीप प्रभुदेसाई हे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रणव मुळ्ये हे समन्वयक पदाची धुरा सांभळणार आहेत. सुरवातीला रत्नागिरी जिल्ह्यातील ऊस, तांदूळ, केळी, शेंगदाणा व बांबू याची लगवड करणार्‍या शेतकर्‍यांना या कंपनीचे सदस्यत्व देण्यात येणार आहे.
वरील पिकांसाठी लागणारे सर्व प्रकारचे साहाय्य कंपनीकडून करण्यात येणार आहे. तयार मालाची रास्त दरात खरेदी आणि विक्रीदेखील कंपनीकडून करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. पितांबरी गेल्या ३० वर्षापासून अभिनव उत्पादनांची विक्री व वितरण करत असल्याने संपूर्ण देशभर कंपनीची सक्षम वितरण यंत्रणा कार्यरत आहे. तसेच कंपनीचे अॅग्रीकेअर डिव्हिजनचे महाराष्ट्रातील सर्व कृषी विद्यापिठासोबत दृढ संबंध असल्याने पितांबरी सर्व शेतकरी बांधवांच्या पाठिशी समर्थपणे उभी असेल, अशी ग्वाही प्रभुदेसाई यांनी दिली.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares