Dragon Fruit : सांगलीतल्या दुष्काळी भागात फुलतायेत 'ड्रॅगन फ्रुटचे' मळे, शेतकऱ्यांना – ABP Majha

Written by

By: एबीपी माझा वेब टीम | Updated at : 03 Nov 2022 11:56 AM (IST)
Edited By: गणेश लटके
Dragon Fruit
Dragon Fruit in Maharastra : देशातील अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस (Rain) पडतो. त्यामुळं तिथं पाण्याची समस्या निर्माण होते. पाण्याच्या समस्यामुळं तिथे बागायती शेती करता येत नाही. महाराष्ट्रातही काही भागात कमी पाऊस पडतो. पण कमी पावसाच्या ठिकाणी देखील शेतकरी नव नवीन प्रयोग करत आहेत. महाराष्ट्रातील सांगली (Sangli) जिल्ह्यातील काही भाग हा दुष्काळग्रस्त आहे. त्या ठिकाणी पाण्याची समस्या आहे. या भागात आता ड्रॅगन फ्रुटचे (Dragon Fruit) उत्पादन घेतलं जात आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळताना दिसत आहे.
योग्य प्रकारचं पीक येण्यासाठी शेतकऱ्यांना वेळेवर पाण्याची गरज असते. एकही पिक असे आहे की ज्याला पाण्याची गरज नाही. परंतू दुष्काळी भागात कमी पाण्यात ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन घेतले जात आहे. कमी खर्चात चांगला नफा या पिकातून मिळवला जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारही देखील ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीला चालना देत आहेत. या पिकाच्या लागवडीमुळं शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारत आहे. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील काही भागा हा दुष्काळग्रस्त आहे. कमी पाऊस असूनही अनेक शेतकरी तिथे ऊसाची लागवड करत होते. ऊसाच्या पिकासाठी भरपूर पाणी लागते. पण पाऊस कमी झाल्यामुळं तिथे पाण्याची समस्या निर्माण होत होती. त्यामुळं गेल्या काही वर्षांत येथील अनेक शेतकऱ्यांनी ऊस, द्राक्षे, सोयाबीन आणि भाजीपाला ही पारंपरिक पिके सोडून शेतकरी ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीकडे वळले आहेत. सांगलीत सुमारे 10 ते 15 शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रूटची लागवड सुरु केली आहे. गेल्या सहा वर्षांपासून सांगली जिल्ह्यातील अनेक शेतकरी ड्रॅगन फ्रूटचे उत्पादन घेत आहेत. 
सुरुवातीला ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी गुंतवणूक थोडी जास्त असते. मला सुरुवातील सुमारे 15 लाख रुपये गुंतवावे लागल्याची माहिती सांगलीच्या तडसर गावातील शेतकरी आनंदराव पवार यांनी सांगितले. मी गेल्या सहा वर्षापूर्वी ड्रॅगन फ्रूटची लागवड केल्याचे त्यांनी सांगितले. मी ड्रॅगन फ्रूटचे चांगले उत्पादन घेऊन वर्षभरातच निम्मा खर्च वसूल केल्याचे आनंदराव पवार म्हणाले. 2013 मध्ये सोलापूरच्या एका शेतकऱ्याकडून प्रेरणा मला मिळाल्याचे आनंदराव पवार यांनी सांगितले. दीड एकर शेतात ड्रॅगन फ्रूट पिकवून सोलापूरचा शेतकरी 27 लाख रुपये कमावत होता. यानंतर 2016 मध्ये आनंद पवार यांनीही ही शेती करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला 200 किलोचे उत्पादन मिळाले, आज सहा वर्षांनंतर ते उत्पादन 8 हजार 500 किलोपर्यंत गेल्याची माहिती  आनंदराव पवार यांनी दिली.
महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वांगी गावचे शेतकरी राजाराम देशमुख हे देखील अनेक वर्षांपासून ड्रॅगन फ्रूटची लागवड करत आहेत. त्यांनी दोन एकर शेतात ड्रॅगन फ्रुटची लागवड केली आहे. पूर्वी ते ऊसाची पारंपारिक शेती करत होते. परंतू ड्रॅगन फ्रूटच्या शेतीतून चांगले उत्पन्न मिळत असल्यानं त्यांनी पूर्णपणे ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे. कमी पाण्यात हे पीक चांगल्या प्रकारे येत असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

ड्रॅगन फ्रूटला भारतात विदेशी फळ म्हणतात. पण गेल्या काही वर्षांत देशातील शेतकऱ्यांनी त्याचे चांगले उत्पादन घेतले आहे. पण आता हे विदेशी फळ परदेशातही निर्यात होत आहे. वांगी आणि तडसर गावातील आनंदराव पवार आणि राजाराम देशमुख हे आज ड्रॅगन फ्रूटच्या शेतीतून चांगले उत्पन्न घेत आहेत. या शेतकऱ्यांनी 2021 मध्ये ड्रॅगन फ्रूट दुबईला निर्यात केले होते. याचबरोबर राजाराम देशमुख यांनी यावर्षीही सुमारे 50 किलो ड्रॅगन फ्रूट न्यूझीलंडला निर्यात केले आहे. आज महाराष्ट्रातील सांगलीचे ड्रॅगन फ्रूट हैद्राबाद, बंगळुरू, गुवाहाटी येथे पसंत केले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Dhule : धुळे जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस तरीही रब्बीचं क्षेत्र घटलं, 90  हजार हेक्टरवर पेरणी
Bharat Jodo Yatra : राहुल गांधींना शेतकऱ्यांचा विसर पडू नये, भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येण्याआधीच विदर्भातील शेतकरी नेत्यांची नाराजी 
Rice Export : 31 मार्चपर्यंत तांदळाच्या निर्यातीस परवानगी, निर्यातदारांना मिळणार दिलासा, पण… 
Raju Shetti : मुलगा पेपर लिहिणार आणि बाप तपासणार, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवरुन राजू शेट्टींचा शरद पवारांना टोला
Agriculture Export : कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादनांच्या निर्यातीत 25 टक्क्यांची वाढ, पाहा कशाची निर्यात किती झाली?
Maharashtra Politics: परतीचे दोर कापले नाहीत, शिंदे गटातील ‘हा’ आमदार आमच्या संपर्कात; सुषमा अंधारे यांचा मोठा दावा
Yogendra Yadav in Sangli : त्यांच्याकडे ईडी, सीबीआय, सत्ता, पोलिस, आमच्याकडे भारतमाता; योगेंद्र यादवांचा मोदी सरकारवर कडाडून हल्लाबोल 
Virat Kohli : बांगलादेशनं विराट कोहलीवर लावला ‘फेक फिल्डिंग’चा आरोप, म्हणतात ‘पेनल्टी दिली असती तर आम्ही जिंकलो असतो’
Ambabai Temple : अंबाबाई मंदिरात आढळला 12व्या शतकातील यादवकालीन संस्कृत शिलालेख
Sand Mafia : वाळू तस्करांचा तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला; राजकीय नेत्याच्या निकटवर्तीयाचे कृत्य?

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares