Loan Waiver : ‘नाबार्ड’ चा धक्कादायक अहवाल, कर्जमाफीमुळेच शेतकरी कर्जबाजारी, नेमकी काय… – TV9 Marathi

Written by

| Edited By: राजेंद्र खराडे
Apr 24, 2022 | 5:33 AM
मुंबई : आपल्या राज्यातच नाहीतर संपूर्ण देशात (Loan waiver) शेतकरी कर्जमाफीवरुन रणकंदन उठते. कर्जमाफी मग राजकीय उद्देश साधण्यासाठी असो की (Farmer) शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा उद्देश समोर ठेऊन असो. पण हा मुद्दा मुख्य एक मुद्द्यापैकी आहे. अनेक वर्षापासून वेगवेगळी राज्ये ही कर्जमाफीचा निर्णय घेतात पण हाच निर्णय शेतकऱ्यांसाठी नुकसानीचाही होऊ शकतो हेच (NABARD) नाबार्ड अर्थात राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅंकेने एका अहवालातून समोर आले आहे. कर्जमाफीच्या घोषणांमुळे शेतकऱ्यांची स्थिती सुधारत नाही, तर शेतकरी अधिक कर्जदार होण्याची शक्यता वाढते, असे म्हटले आहे.अशा घोषणांमुळे जाणीवपूर्वक कर्जफेड न करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतो आणि सवयीने कर्जफेड न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या यादीत प्रामाणिक शेतकरीही सामील होऊ शकतो, असे नाबार्डने आपल्या अहवालात म्हटले आहे. यामुळे कर्जमाफीचे हे चक्र पुढे जाते. महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेशातील एकूण तीन हजार शेतकऱ्यांशी नाबार्डने चर्चा करून शेतकऱ्यांची कर्जमाफीबाबतची वर्तणूक समजून घेतली होती.
‘नाबार्ड’ने शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर बहुतांश शेतकरी संस्थात्मक स्रोतांकडून अधिक कर्ज घेतात हे वास्तव समोर आले आहे. या अहवालानुसार शेतकऱ्यांना बँका किंवा इतर संस्थांकडून जास्तीत जास्त 7.7 टक्के व्याजदराने कर्ज मिळते, तर बिगर संस्थात्मक स्रोतांकडून कर्ज घेणाऱ्यांना 9 ते 21 टक्के दराने व्याज द्यावे लागते. अशा परिस्थितीत, शेतकरी संस्थात्मक स्त्रोतांकडून अधिक कर्ज घेतात. त्याचबरोबर पंजाबचे शेतकरी कर्ज घेण्यात इतर राज्यांच्या पुढे असल्याचंही अहवालात म्हटलं आहे. ज्याअंतर्गत पंजाबमधील एक शेतकरी दरवर्षी सरासरी 3 लाख 4 हजार लाख रुपयांचे कर्ज घेतो. उत्तर प्रदेशातील शेतकरी वर्षाला सरासरी 84 हजार रुपये कर्ज घेतो आणि महाराष्ट्रातील शेतकरी दरवर्षी 62 हजार रुपयांचे कर्ज घेतो.
ज्या उद्देशाने शेतकरी बॅंकेतून कर्ज काढतो त्याच कामासाठी त्याचा उपयोग करीत नाही. इतर कामासाठीच या पैशाचा वापर होतो. शेतीवर कर्ज घेण्यात पंजाबमधील शेतकरी हे आघाडीवर आहेत. तर किसान क्रेडिट कार्डवर घेतलेल्या कर्जाचे विवरण पंजाबमध्ये सर्वाधिक आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातही शेतीवरील कर्जाचे विपर्यास झाले असले तरी या यादीत उत्तर प्रदेश सर्वात शेवटी आहे.
Vegetable Price : पेट्रोल-डिझेलच्या पंगतीमध्ये हिरव्या मिरचीचाही ठसका, लिंबाचा आंबटपणाही कायम..!
Banana : यंदा केळीचा ‘गोडवा’च गायब, अस्मानी संकटानंतर आता महावितरणचा ‘शॉक’
Latur Market : शेतीमालाच्या दरात घट, शेतकऱ्यांसाठी ‘वेट अॅंण्ड वॉच’चा सल्ला..!

Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 1517
Channel No. 1259
Channel No. 682

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares