PM KISAN : देशभरातील 60 लाख 30 हजार शेतकरी 10 व्या हप्त्यापासून वंचितच, जबाबदारी कुणाची ? – TV9 Marathi

Written by

| Edited By: राजेंद्र खराडे
Jan 06, 2022 | 3:36 PM
मुंबई : (PM Kisan Sanman Yojna) पीम किसान सन्मान निधी योजनेचा 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करुन सात दिवसाचा कालावधी लोटलेला आहे. असे असतानाही देशातील तब्बल 60 लाख 29 हजार 628 शेतकऱ्यांना अद्यापही हा हप्ताच वर्ग झाला नसल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे. (Central Government) केंद्र सरकारच्या माध्यमातून ही योजना राबवली जात असली तरी यामध्ये राज्य सरकारचीही तेवढीच महत्वाची जबाबदारी आहे. अपात्र-पात्र (Farmer) शेतकरी कोण, तो या योजनेसाठी पात्र आहे का ? असेल तर त्याच्या कागदपत्रांची पूर्तता ही जबाबदारी राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागाचीही आहे. त्यामध्येच अनियमितता झाल्याने आज 7 दिवसानंतरही पात्र, शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारांनी योग्य ती तत्परता दाखवली नसल्याने हे शेतकरी योजनेपासून वंचित राहिलेले आहेत.
ज्या शेतकऱ्यांचे पैसे रोखण्यात आले आहेत ते शेतकरीच आहेत का याची तपासणी केली जात आहे. शिवाय मध्यंतरी अनेक अधिकारी कर्मचारी यांनी परस्पर योजनेतील निधी हडप केला होता. त्यामुळे बारिक शंका असली तरी थेट पैसेच रोखून धरले जात आहेत. यामध्ये महसूल विभागाकडून शेतकऱ्यांचा अहवाल, बॅंके खाते, आधार कार्डवरील स्पेलिंग मिस्टेक अशा बाबी देखील समोर आल्याने पैसे रोखून धरले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून अपात्र नागरिकही योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे सर्व माहिती खात्रीची झाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्गच केली जात नाही. गेल्या दोन वर्षापासून असे प्रकार समोर येत आहेत.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जाणारी योजना असली तरी राज्य सरकार यांचीही भूमिका महत्वाची राहिलेली आहे. राज्य सरकारच्या यंत्रणेकडून हा शेतकरी असल्याचे सांगण्यात आल्यावरच योजनेस शेतकरी पात्र ठरतो. केंद्र सरकार योजनेचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करीत नाही तर राज्यांनी पाठवलेल्या आकडेवारीनुसार योजनेचा निधी राज्य सरकारच्या खात्यावर जमा केला जातो. त्यानंतरच तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जातो.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अनुशंगाने सरकारने pmkisan.gov.in ही वेबसाईट सुरु केलेली आहे. या वेबसाईटवर Log In करुन Beneficiary Status यावर क्लिक करुन आपला मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यावर क्लिक करुन काय मॅसेज येतोय तो पहावा लागणार आहे. यामध्ये पैसे जमा झाले असतील तर तसा मॅसेज येईल अन्यथा का जमा झाले नाहीत त्याचे कारणही सांगितले जाईल. त्याची प्रिंट घेऊन तु्म्ही बॅंकेत दाखवले तरी तुमचा प्रश्न मार्गी लागणार आहे. शिवाय यावर समाधान झाले नाही तर जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याशी बोलूनही प्रश्न मार्गी लागणार आहे. योजनेच्या माहीतीच्या अनुशंगाने हेल्पलाइन क्रमांक 155261/011-24300606 संपर्क क्रमांक देण्यात आला आहे.
जर तुम्ही या योजनेला अर्ज करत असाल तर सर्व कागदपत्रांमध्ये नाव आणि वडिलांचे नाव यांचे स्पेलिंग तपासा. महसूल नोंदी करताना काय आहेत त्याची पाहणी करावी लागणार आहे. आधार क्रमांक चुकीच्या पद्धतीने भरला तर तो दुरुस्त करण्याचा पर्याय दिला जातो. महसूल नोंदी, आधार किंवा बँक खात्यातील त्रुटी या कारणांमुळेच अनेक शेतकऱ्यांचे पैसे खात्यावर जमा झालेले नाहीत. तर दुसरीकडे 33 लाख असे शेतकरी आहेत जे पात्र नसतानाही योजनेचा लाभ घेत होते. त्यांच्याकडून आता वसुलीचे काम सुरु आहे.

Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 1517
Channel No. 1259
Channel No. 682

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares