गैरसोय केल्यास गय नाही – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
00685
——–
गैरसोय केल्यास गय नाही
खासदार धैर्यशील माने; जैनापूर येथील रेल्वे भुयारी रस्त्याची पाहणी
दानोळी, ता. ४ ः जैनापूर चिपरी दरम्यान रेल्वे मार्गावरून जाण्यासाठी उभारलेले रेल्वे भुयारी रस्ता नागरिकांसाठी गैरसोयीचा झाला आहे. भुयारात रस्त्यावर नेहमी तीन फुट पाणी साचते. यु टर्न असल्यामुळे वाहने वळवता येत नाहीत. ऊसाची वाहने येत नाहीत. शेतकऱ्यांनी सातत्याने लेखी व तोंडी तक्रारी देऊनही ठेकेदार दखल घेत नाहीत. यापुढे शेतकरी व ग्रामस्थांची गैरसोय कराल तर तुमची गय करणार नसल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी रेल्वे अधिकारी व ठेकेदारांना सांगितले.
जैनापूर (ता. शिरोळ) येथे चिपरी मार्गावर उभारलेल्या रेल्वे भूयारी रस्त्याची पाहणी खासदार धैर्यशील माने, पुणे विभागीय अभियंता विकासकुमार श्रीवास्तव, वरीष्ठ अधिकारी एम. एस. शिंदे, ठेकेदार व जैनापूर, चिपरी, कोथळी येथील पदाधिकाऱ्‍यांच्या उपस्थितीत केली. कोथळीचे संजय नांदणे यांनी हा भूयारी रस्ता करून शेतकऱ्‍यांची सोय नव्हे, तर गैरसोय केली असल्याचे सांगितले. जैनापूरचे विक्रम पाटील, जैनापूरचे माजी सरपंच सन्मती पाटील, बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सतिश मलमे, सरपंच संगिता पाटील, माजी सरपंच विजयकुमार पाटील, रमेश रजपूत यांनी समस्या सांगितल्या. अधिकाऱ्‍यांनी संबंधित कामाची माहिती घेवून ठेकेदाराला योग्य त्या सुचना केल्या.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares