देशातील एकमेव करोडपतींचं गाव; पण गावाची अवस्था पाहून डोक्याला हात माराल… – MSN

Written by

चंद्रपूर:
महाराष्ट्रात करोडपतींचे गाव खरंच आहे. होय हे खरं आहे. चंद्रपुरातील एका गावाला करोडपतींचं गाव म्हटलं जातं. आता मात्र करोडपतींचं हे गाव गावातील तरुणांना नकोसं झालं. असं काय घडलं की या गावातील तरुण गाव सोडून बाहेर जाऊ लागलेत.
गावाचा विकास खुंटला आहे. अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. गावातील अंतर्गत रस्त्यांची दैना झाली आहे. नाले तुडुंब भरल्याने सांडपाणी चक्क रस्त्यावरून वाहतंय. गावाच्या जवळच वेकोलीची खदान आहे. खदानीत होणाऱ्या ब्लास्टमुळे अनेक घरांना भेगा पडल्या आहेत. तर प्रदूषणाने अख्ख्या गावाला कवेत घेतलं आहे. नावाला करोडपती गाव असलं तरी विकासाच्या बाबतीत हे गाव पुरतं कंगाल आहे. या गावाचं नाव आहे साखरी. हे गाव राजुरा तालुक्यात येतं.
हेही वाचा-
धनत्रयोदशीला महाराष्ट्राला मुघलकालीन खजिना सापडला, खड्डा खोदताना घबाड हाती
साखरी गावातील हजार हेक्टर जमीन वेकोलीने अधिग्रहण केली. जमिनीच्या मोबदल्यात पैसे आणि तरुणांना नोकरी दिली. वेकोलीच्या दोन खुल्या खाणी साखरीत सुरु आहेत. तरुणांना वाटलं की, याच खुल्या खाणीत त्यांना नोकरीवर ठेवल्या जाईल. पण, तसं घडलं नाही. तरुणांना नागपूर, चंद्रपूर, बल्लारपूर येथील भूमिगत खदानीत पाठवल्या गेलं. नोकरीसाठी तरुणांनी गाव सोडलं. काही शेतकरी कायमचे भूमिहीन झालेत. तर काही शेतकऱ्यांना अद्यापही जमिनीचा मोबदला मिळालेला नाही.
वेकोलीच्या खदानीमुळे गावातील पोरांना नोकरी मिळाली अन् पैसाही मिळाला, हे खरं. मात्र, गावाच्या विकासाचं जे स्वप्न गावकऱ्यांनी बघितलं ते स्वप्न प्रत्यक्षात मात्र उतरलेच नाही. गावातील पंढरी घटे या सामाजिक कार्यकर्त्याने वेकोली विरोधात उपोषण केले. ज्या शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही, त्यांना त्वरित मोबदला द्यावा. प्रति सातबारा नोकरी द्यावी. स्थानिक बेरोजगारांना कामं द्यावी, अशी मागणी लावून धरली. घटे यांच्या मागणीला लोकप्रतनिधींचं बळ मिळायला हवं होत. दुर्दैवाने तसं झालं नाही. गावाची आज जी दुर्दशा झालेली आहे, त्याला लोकप्रतिनिधी, वेकोली जबाबदार असल्याची खंत घटे यांनी व्यक्त केली.
हेही वाचा-
Chandrapur: नाद करायचा नाय! चंद्रपूरकरांनी एका गोष्टीसाठी मोजले तब्बल १ कोटी रुपये
गावाला नवी दिशा देण्याचं सामर्थ्य नव्या पिढीत आहे. हे ओळखून गावाचा विकासाचं स्वप्न बघत प्रणाली मडावी या २४ वर्षांच्या तरुणीच्या हातात सरपंच पदाची धुरा गावाने सोपविली. गावाचा चेहरा मोहरा बदलण्याची इच्छाशक्ती बाळगणारी ही तरुणी कामाला लागली आहे. एकीकडे गावातील समस्या बघून निराश झालेल्या गावासाठी ही तरुणी आशेचा किरण ठरली आहे.
95236476

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares