Alia Bhatt Pregnancy : 'मी स्त्री आहे, पार्सल नाही…', गुड न्यूज शेअर केल्यानंतर इतकी का भडकली आलिया भट? – Lokmat

Written by

Latest Marathi News | लोकमत / Lokmat Marathi newspaper | Live Marathi Batmya | ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com
हिंदी | English
शुक्रवार ४ नोव्हेंबर २०२२
FOLLOW US :

शहरं
मनोरंजन
व्हिडीओ
सखी
आणखी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 11:49 AM2022-06-29T11:49:03+5:302022-06-29T11:55:38+5:30
 Alia Bhatt announces Pregnancy : कपूर कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) व आलिया भट (Alia Bhatt) लवकरच आईबाबा बनणार आहेत. आलियाने सोमवारी ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आणि तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. पण याचदरम्यान असं काही झालं की आलिया भडकली. आज आलियाने काही प्रसार माध्यमांना निशाणा बनवत आपली नाराजी व्यक्त केली.
आलिया व रणबीर आईबाबा बनणार असल्याची बातमी सर्वच छोट्या मोठ्या प्रसार माध्यमांनी कव्हर केली. याचदरम्यान एका न्यूज पोर्टलची बातमी पाहून मात्र आलिया संतापली. या न्यूज पोर्टलने आलियाच्या प्रेग्नंसीबद्दल वाट्टेल ते डिटेल्स छापले आणि यामुळे आलियाचा पारा चढला.

‘आलिया आता आराम करणार आहे. लंडनचं शूटींग संपल्यावर रणबीर तिला घ्यायला जाणार आहे. आलियाने आपली प्रेग्नसी अगदी योग्य वेळेत प्लॅन केली. जेणेकरून तिच्या शूटिंगवर परिणाम होऊ नये, असे काही डिटेल्स एका न्यूज पोर्टलकडून देण्यात आलेत. हे डिटेल्स वाचून आलियाने नाराजी व्यक्त केली.

मी स्त्री आहे, पार्सल नाही…
रणबीर आलियाला घ्यायला जाणार, ही रिपोर्टमधली गोष्ट आलियाला सर्वाधिक खटकली. तिने एक खास इन्स्टाग्राम स्टोरी सुद्धा शेअर केली.   ‘आपण आजही पितृसत्ताक समाजात राहतो. तुमच्या माहितीसाठी सांगते, पण काहीच बदल झाले नाहीयेत, कशालाच उशीर झाला नाहीये. कोणीही मला घ्यायला येणार नाहीये. कोणीच मला पिक अप करायची गरज नाहीये. मी एक स्त्री आहे पार्सल नाही. मला आरामाची गरज नाहीये. पण ऐकून बरं वाटलं की तुमच्यापैकी काही जणांकडे डॉक्टरचं सर्टिफिकेशन आहे. हे 2022 आहे, आपण या जुन्या विचारसरणीतून बाहेर येऊ शकतो का? अ‍ॅण्ड एक्सक्यूज मी… कारण माझा शॉट रेडी आहे,’ अशा आशयाची इन्स्टास्टोरी तिने शेअर केली आहे.  सध्या आलिया ‘हार्ट ऑफ स्टोन’ या हॉलिवूड चित्रपटाचं शूटींग करत आहे. या नाराजी व्यक्त करणाºया पोस्टआधी आलियाने शुभेच्छा देणाºया सर्वांचे आभार मानले होते.  
FOLLOW US :

Copyright © 2020 Lokmat Media Pvt Ltd

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares