Cotton News : नंदूरबार जिल्ह्यात कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत, – ABP Majha

Written by

By: भिकेश पाटील | Updated at : 01 Oct 2022 09:40 AM (IST)
Edited By: गणेश लटके
Cotton News
Cotton News : राज्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कापसाचे (Cotton) उत्पादन घेतलं जातं. यावर्षी देखील राज्यात मोठ्या क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे. मात्र, कापूस उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत आहेत. सुरुवातील अतिवृष्टीचा फटका आणि आता कापसावर होत असलेला रोगांचा प्रादुर्भाव यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड केली जाते. मात्र, आता कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळं कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
नंदूरबार जिल्ह्यात एक लाख 25 हजार हेक्टर क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड
जळगाव, धुळे, नंदूरबार हे जिल्हे सर्वात मोठा कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा बेल्ट म्हणून ओळखले जातात. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कापसाचे उत्पादन घेतलं जाते. मात्र, नंदूरबार जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे. कारण कापूस पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. मागच्या वर्षी कापसाला मिळालेल्या विक्रमी दरानंतर नंदूरबार जिल्ह्यात कापसाच्या क्षेत्रात प्रचंड वाढ झाली होती. यावर्षी खरीप हंगामात जिल्ह्यातील एक लाख 25 हजार हेक्टर क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे. कापसाला मिळालेला चांगला भाव यावर्षी कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. नंदूरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कापसाची पाने लाल पडून गळत आहेत. पर्यायाने झाडाचे पोषण खुटत आहे.त्याचा परिणाम झाडाच्या वाढीवर आणि उत्पादनावर होत असतो. एकूण यावर्षी वेळेवर झालेला पाऊस आणि पोषक वातावरणामुळं कापसाचे उत्पादन चांगले येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे.
नंदूरबार जिल्ह्यातील पंधरा ते वीस हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. राज्य सरकारनं लाल्या बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत. तसेच शेतकऱ्यांना सरसकट एकरी मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून  केली जात आहे. कापसाच्या पिकाला यावर्षीही दहा हजारांच्या वर दर मिळत आहे. मात्र, लाल्या रोगामुळं उत्पादन कमी होणार असल्यानं शेतकऱ्यांची अवस्था  कभी खुशी कभी गम अशी झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:
Parbhani News : परभणीतल्या शिराळा गावाता 12 बैलांची जीभ कापल्याचा संशय, सर्व अहवाल निगेटिव्ह आल्यानं कोणताही रोग नसल्याचे स्पष्ट    
Swabhimani Shetkari Sanghatana : एकरकमी FRP सह विविध मागण्यांवरुन स्वाभिमानी आक्रमक, सांगली जिल्ह्यातल्या कारखान्यांवर काढली मोटसायकल रॅली
Radhakrishna Vikhe Patil : कुक्कुटपालन व्यवसायासमोरील समस्या सोडवण्यास शासनाचं प्राधान्य, राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात येणार : विखे पाटील 
Rabi Season : रब्बी हंगामात शेतकऱ्यांसमोर विजेची मोठी समस्या, रब्बीच्या पिकांसाठी पाण्याची आवश्यकता
Nandurbar : कोकणसह नंदूरबार जिल्ह्यात भात कापणीला सुरुवात, काही ठिकाणी पारंपारिक पद्धतीनं तर कुठे ट्रॅक्टरनं मळणी सुरू
CNG PNG Price Hike : मुंबईकरांना महागाईचा झटका! आजपासून CNG-PNG च्या दरात वाढ
शालेय पोषण आहाराचे नाव बदलले, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण नामकरण
Twitter : अॅक्टिव्हिस्ट ग्रुप्सचा जाहिरातदारांवर दबाव, त्यामुळे ट्विटरचा महसूल घसरला; इलॉन मस्कचा आरोप 
MPSC Prelims Results 2022: एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, संपूर्ण यादी वाचा इथे
…अखेर जळगावधील सभा रद्द, सुषमा अंधारे पुण्याकडे रवाना, कार्यकर्त्यांकडून पुष्पवृष्टी

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares