Dhule Cotton News : धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीचा कापसाला मोठा फटका, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव – ABP Majha

Written by

By: धनंजय दिक्षित, एबीपी माझा | Updated at : 22 Sep 2022 11:24 AM (IST)
Edited By: गणेश लटके
Dhule Cotton News
Dhule Cotton News : राज्यात सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, काही भागात मुसळधार पाऊस (Rain) झाला आहे. या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. धुळे (Dhule) जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना (Cotton farmers) देखील अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. अति पावसामुळं कपाशीवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच रस शोषण करणाऱ्या अळीचा देखील प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळं कापसाचे उत्पन्न कमी होणार असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.
धुळे तालुक्यात तसेच साक्री तालुक्यात यंदा पावसानं दमदार हजेरी लावली. यामुळं शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. पावसामुळं कपाशीच्या बोंडांचे नुकसान झाले असून, प्राथमिक अंदाजानुसार धुळे तालुक्यातील 30 हजार हेक्टर क्षेत्राला या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. गेल्या वर्षी धुळे तालुक्यात 1 लाख 7 हजार 109 हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली होती त्यात 77 हजार 295 हेक्टरवर कापूस होता. यंदा 1 लाख 747 हेक्टरवर पेरणी झाली असून, त्यापैकी तब्बल 84 हजार 961 हेक्टरवर कापसाची पेरणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाच्या लागवडीचे क्षेत्र अकरा हजार हेक्टरनं वाढलं आहे.


अतिवृष्टीमुळं कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच रस शोषण करणाऱ्या अळीचा देखील प्रादुर्भाव वाढला असून उत्पादनाचा एकीकडे खर्च वाढत असताना दुसरीकडे मात्र उत्पन्न कमी येणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. शेतकऱ्यांनी जून महिन्यापासून शेतीवर मोठा खर्च केला होता. फवारणी, निंदणी करुन खते देऊन पिके वाढवली. मात्र, पावसामुळं शेतकऱ्यांच्या हातात काहीही लागणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळं शासनाने नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.


सुरुवातीला जून महिन्यात पावसानं दडी मारल्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्यात मुसळधार पाऊस झाला होता. तसेच या चालू सप्टेंबर महिन्यात देखील काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. याचा खूप मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांमा बसला आहे. शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. तसेच अनेक ठिकाणी शेत जमिनी देखील खरवडून गेल्या आहे. या अतिवृष्टीचा राज्यातीस 27 लाख शेतकऱ्यांना फटका बसल्याची माहिती कृषीमंत्र्यांनी दिली आहे. तर काही ठिकाणी पशुधनाचं देखील नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढचे दोन ते तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: 
Dhule Farmer Suicide: धक्कादायक! गेल्या सहा महिन्यात धुळे जिल्ह्यात 32 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
Dhule ST Depot : कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीगृहाची दूरवस्था, अडचणींचा डोंगर; तरीही दिवाळीत धुळे विभागातून एसटीला सर्वाधिक उत्पन्न
Dhule: अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांनी विश्रांती कशी घ्यायची? एसटी कर्मचाऱ्यांच्या रेस्ट रुमचे भीषण वास्तव  
Dhule : राजघराणं अशी ओळख असलेल्या कुटुंबात पुत्राच्या शिवसेना प्रवेशामुळे पडली फुट, यामागे कोणती राजकीय गणिते? चर्चांना उधाण
Diwali 2022 : बाजारपेठा झगमगल्या, आकाशकंदील घेण्यासाठी ग्राहकांची लगबग; 50 रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत किंमत
Aditya Thackeray : अब्दुल सत्तारांच्या सिल्लोडमध्ये आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारली
SSC & HSC Exam : मोठी बातमी! दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढ
दुकानांच्या पाट्या मराठीत नसल्यास BMCकडून केल्या जाणाऱ्या कारवाईला सुप्रीम कोर्टाची स्थगिती
Lionel Messi – BYJU’s : स्टार फुटबॉलर मेस्सी भारतीय कंपनी Byju’s चा ग्लोबल अॅम्बेसिडर
Crime : गुंगीचं औषध टाकून केलं असं कृत्य की… मित्रांनीच इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला 40 लाखांना लुटलं, एकाला कोल्हापुरातून अटक

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares