Pisces Characteristics: मीन राशीच्या लोकांची स्वभावातील चंचलता, घालवते आयुष्याची सफलता! – Lokmat

Written by

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 07:00 AM2022-06-08T07:00:00+5:302022-06-08T07:00:02+5:30
मीन अर्थात मासा. माशाप्रमाणे या राशीचे लोक चंचल असतात. या चंचल वृत्तीमुळे हुशार असूनही त्यांच्या प्रगती मार्गात अडथळा येतो. हे लोक भौतिक सुखात रमतात. ते मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. ध्येय साध्य झाले नाही, की पाण्याबाहेर असलेल्या मासोळीसारखी यांची चरफड होते. 
कुंडलीत बाराव्या स्थानावर येणारी राशी म्हणजे मीन रास. ही स्त्री रास आहे. त्यामुळे या लोकांचा स्वभाव कधी गुंतागुंतीचा तर कधी सरळसोट असतो. या राशीला सौम्य राशी चिन्ह असेही म्हणतात. ही राशी पूर्वभाद्रपदाची एक अवस्था, उत्तराभाद्रपदाची चार अवस्था आणि रेवती नक्षत्राची चार अवस्था मिळून बनलेली आहे. बृहस्पति हा मीन राशीचा स्वामी आहे. त्यामुळे त्यांनी अनावधानानेदेखील गुरुंचा अपमान करू नये. 
मीन राशीच्या स्त्रिया गुणवान आणि सुंदर असतात. 
स्त्री मुळातच चंचल, त्यात रास मीन असेल तर अशी स्त्री घटकेत आपला निर्णय कधी बदलेल हे सांगता येणार नाही. परंतु त्या प्रत्येक स्थितीत आनंदाने जगतात. मीन राशीच्या स्त्रिया अतिशय गुणवान आणि सुंदर असतात आणि त्यांना पुत्र आणि नातवंडे यांचे सुख प्राप्त होते.
भौतिक सुखाची अपेक्षा :
मीन राशीच्या लोकांना उच्च दर्जाचे आणि ऐश्वर्यपूर्ण जीवन जगण्याची तीव्र इच्छा असते. मीन राशीचे राशीचे लोक बहुआयामी व्यक्तिमत्त्वाने समृद्ध असतात. हे लोक शारीरिक ताण कमी परंतु मानसिक ताण जास्त घेतात. बौद्धिक मार्गाने पैसा कमावतात. या लोकांच्या कुंडलीतील शनीची स्थिती अनुकूल असेल तर ते रग्गड पैसा कमावतात आणि श्रीमंती उपभोगतात. याउलट शनीचे स्थान प्रतिकूल असेल तर हालअपेष्टांचे जीवन जगतात. यावर उपाय म्हणजे मीन राशीच्या लोकांनी कायम ज्येष्ठांच्या सेवेला आणि दानधर्म करण्याला प्राधान्य दिले पाहिजे, तरच ते प्रतिकूल परिस्थितीचा सामना करू शकतील आणि अनुकूल स्थितीत अधिक प्रगती करू शकतील. कन्या, कर्क, वृश्चिक, धनु या राशीच्या लोकांशी त्यांची चांगली मैत्री होते. 
नृत्य नाट्य संगीत यांत रस असतो :
कुंडलीत शुक्र शुभ किंवा उच्चस्थानी असेल तर अशा व्यक्तीला शास्त्रीय संगीतात खूप रस असतो. नाटकाची आवड असते. कलाक्षेत्रात हे लोक चांगली प्रगती करतात. परंतु तिथेही चंचल वृत्ती ठेवल्यास फार काळ एका क्षेत्रात टिकाव धरू शकत नाहीत. एका वेळी दोन दगडावर पाय ठेवण्याची सवय त्यांना नडते. मन स्थिर करण्यासाठी या लोकांनी प्राणायाम, ध्यानधारणा नित्याने करायला हवी. गुरुभक्ती तसेच हनुमंताची उपासना त्यांना लाभदायक ठरते. 
 
सूर्योदय
06:37
सूर्यास्त
18:01
04-11-2022 शुक्रवार
Year Name : शुभकृत, दक्षिणायन
तिथी : कार्तिक शुक्ल​ एकादशी
नक्षत्र : पूर्वाभाद्रपदा
अमृत काळ : 08:03 to 09:28
वर्ज्यं : 18:15 to 19:50
दुमुहुर्त काळ : 9:1 to 9:49 & 15:25 to 16:13
राहूकाळ : 10:54 to 12:19
FOLLOW US :

Copyright © 2020 Lokmat Media Pvt Ltd

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares