यशोमती ठाकुरांना अधिकाऱ्यांची लाज का काढली, म्हणाल्या माझ्या एवढं कोणी वाईट नाही… – TV9 Marathi

Written by

| Edited By: महादेव कांबळे
Nov 04, 2022 | 9:03 PM
अमरावती : गुरुकुंज उपसा सिंचन योजना प्रकल्पात झालेली लाखो रुपयांच्या विद्यूत साहित्याची चोरी हा सर्वस्वी सरकारी अनास्थेचा भोंगळ कारभार आहे. सरकारने शेतकरी आणि सरकारी यंत्रणेवर दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळविणाऱ्यांच्या कार्यकारी अभियंता यांच्या घरापुढे तीव्र आंदोलन करणार असल्याचे अमरावतीच्या माजी पालकमंत्री तथा आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणीही यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
उद्या पर्यत काम झालं नाही तर माझ्या एवढं कोणी वाईट नाही असं म्हणत लाजा वाटत नाही का तुम्हाला असा सवालही त्यांनी अधिकाऱ्यांना केला आहे.
त्यामुळे गुरुकुंज उपसा सिंचन योजना प्रकल्पातील चोरीचे प्रकरण आणखी तापणार असल्याचेच दिसत आहे.
तिवसा जलसंपदा विभागांतर्गत अमरावती- नागपूर महामार्गालगत अप्पर वर्धाच्या मुख्य कालव्याच्या बाजूला गुरुकुंज उपसा सिंचन योजना प्रकल्पाच्या वॉटर लिफ्टिंगकरिता असणारी स्वतंत्र विद्युत पुरवठा यंत्रणा फोडून लाखोंचे साहित्य अज्ञात चोरट्याने लंपास केले आहे.
रात्रपाळीत चौकीदार नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी चोरी केली होती. खरिपातील कपाशी व तूर या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांनी 400 हेक्टर क्षेत्रासाठी पाण्याची मागणी केली होती.
त्या अनुषंगाने तयारी सुरु असतानाच अचानक चोरट्यांनी रोहित्र फोडले होते. त्यामुळे खरीप हंगामातील शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही.
दुसरीकडे, रब्बी हंगामातील शेकडो हेक्टर क्षेत्र उपसा सिंचन प्रकल्पाच्या आशेवर असून त्यासाठी जलसंपदा विभागाने पाणी फिरवले आहे, असा आरोप ॲड. यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
सिचन योजनेतील लाखो रुपयांचे विद्युत साहित्य चोरीला गेले असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत असून त्याला जबाबदार कोण असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 1517
Channel No. 1259
Channel No. 682

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares