शरद कारखान्याची जय शिवराय व आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
02328
नरंदे ः येथील शरद साखर कारखान्याची ऊस वाहतूक रोखताना जयशिवराय व आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते.
…….

शरद कारखान्याची ऊस वाहतूक रोखली
जयशिवराय, ‘आंदोलन अंकुश’चे कार्यकर्ते आक्रमक
खोची, ता. ४ : नरंदे येथील शरद साखर कारखान्याने पहिली उचल जाहीर न करता कारखाना सुरू केल्याने जय शिवराय किसान संघटना व आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी भेंडवडे फाटा येथे ऊस वाहतूक रोखून धरली. त्यामुळे कारखान्यांची ऊस वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. आंदोलनाचे नेतृत्व शिवाजी माने, गब्बर पाटील, सदाशिव कुलकर्णी, शीतल कांबळे, सागर माळी, जितेंद्र पाटील यांनी केले. कारखाना प्रशासन व संघटनेचे कार्यकर्ते यांच्यात चर्चेच्या दोन फेऱ्या निष्फळ ठरल्या असल्याचे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
साखर आयुक्तांनी राज्यातील सर्वच कारखानदारांना एफआरपीप्रमाणे होणारी पहिली उचल जाहीर केल्याशिवाय कारखाना सुरू करता येणार नाही, असे सांगितले आहे; परंतु शरद साखर कारखाना प्रशासनाने पहिली उचल जाहीर न करता साखर कारखाना सुरू केला आहे. यामुळे जय शिवराय किसान संघटना व आंदोलन अंकुश संघटना यांनी शुक्रवारी शरद साखर कारखान्याची ऊस वाहतूक रोखून धरणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज भेंडवडे फाटा, कुंभोज फाटा, सावर्डेदरम्यान शरद साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर-ट्रॉली रोखून धरली. ऊस वाहतूक बेमुदत बंद केली जाईल, असा इशाराही त्यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात रामदास वड्ड, सुनील पाटील, प्रताप चव्हाण, राजू थोरवत, बंडा पाटील, भैरवनाथ मगदूम यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares