Agriculture News : जुलै महिन्यात 26 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका, पहिल्या टप्प्यात 22 लाख – ABP Majha

Written by

By: एबीपी माझा वेब टीम | Updated at : 26 Aug 2022 12:26 PM (IST)
Edited By: गणेश लटके
Agriculture News
Agriculture News : आत्तापर्यंत राज्यात चांगला पाऊस (Rain) झाला आहे. मात्र, काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडले आहेत.  मराठवाडा (Marathwada)आणि विदर्भातील (Vidarbha) शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. जुलै महिन्यात राज्यातील 26 जिल्ह्यातील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. जुलै महिन्यात तब्बल 18 लाख 21 हजार हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. त्यानुसार 22 लाख 89 हजार शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.
जुलै महिन्यात नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे झाले आहेत. त्या शेतकऱ्यांना आता मदत मिळणार आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईपोटी अंदाजित बावीशे ते अडीच हजार कोटी रुपये मिळणार आहेत. त्याचा अहवाल कृषी विभागाने सरकारला सादर केला आहे. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात ऑगस्टमधील बाधित शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे.
या 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा
अतिवृष्टीमुळे जुलै महिन्यात राज्यातील 26 जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये राज्यातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, पुणे, सांगली, कोल्हापूर, हिंगोली, लातूर, नांदेड, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या 26 जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यातील 18 लाख 21 हजार हेक्टरवरील क्षेत्र बाधित झालं होतं. जवळपास 22 लाख 89 हजार शेतकऱ्यांना याचा फटका बसला होता. या सर्व शेतकऱ्यांना आता मदत मिळणार आहे.
 
आत्तापर्यंत अतिवृष्टीमुळं राज्यातील 81 लाख 2 हजार हेक्टर जमीन बाधीत 

REELS
राज्यात अतिवृष्टीचा खूप मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीनं राज्यातील 81 लाख 2 हजार हेक्टर जमीन बाधीत झाली आहे. यामध्ये जिरायती क्षेत्र 17 लाख 59 हजार 633 हेक्टर असून, बागायती क्षेत्र 25 हजार 476 हेक्टर आहे. फळ पिकांमध्ये 36 हजार 294 हेक्टर एवढे क्षेत्र बाधित झाले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अतिवृष्टी आणि पूर यामुळं आत्तापर्यंत सुमारे 138 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबियांना चार लाख रुपये तातडीची मदत केली आहे. 21 हजार व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. 
महत्त्वाच्या बातम्या:
Sharad Pawar Speech In Shirdi: संकुचित विचारांच्या सत्ताधाऱ्यांमुळे राज्य अधोगतीला जाऊ शकते, पवारांचा हल्लाबोल; वाचा भाषणातील प्रमुख मुद्दे
Maharashtra News Updates : आदित्य ठाकरे यांना आणखी एक धक्का, औरंगाबादनंतर बुलढाण्यातही सभेला परवानगी नाकारली
Appasaheb Nalvade Gadhinglaj Sugar Factory : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्यासाठी उद्या मतदान; आमदार मुश्रीफ व पाटील यांच्यात प्रतिष्ठेची लढत
Exclusive: ‘किरण लोहारांवर नियमानुसार कारवाई होणारच, पाठिशी घालण्याचा विषयच नाही’: सोलापूर ZP CEO दिलीप स्वामी
Nashik News : ‘ऑक्सिजन सिलिंडर संपायला आलं होत, मात्र नाशिकचा तरुण ठरला चिमुरड्यासाठी ‘प्राणवायू’ 
Uddhav thackeray : राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
Ashish Shelar: आमदार फुटू नये म्हणून उद्धव ठाकरेंची मध्यावधीची भाषा, आशिष शेलारांचं प्रत्युत्तर
Sharad Pawar: हाताला बँडेज, चेहऱ्यावर थकवा तरीही शरद पवार यांची शिबिरात हजेरी, कार्यकर्त्यांना म्हणाले…
Syed Mushtaq Ali Trophy 2022 Final: मुंबईनं टॉस जिंकला, हिमाचलला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण; दोन्ही संघाच्या प्लेईंग इलेव्हनवर एक नजर
Ajit Pawar : अजित पवार पुन्हा नाराज? शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबीराला गैरहजर

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares