Isudan Gadhvi: मोदींच्या होमग्राउंडवर कोण आहेत 'आप'चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; जाणून घ्या – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
शेतकरी कुटुंबातला… पत्रकारितेचं शिक्षण घेतलेला… गुजरातच्या द्वारका जिल्ह्यातल्या पिपालिया गावातला एक तरुण. जो २०२१ पर्यंत पत्रकार म्हणून काम करत असतो. पण, आपच्या प्रदेश नेत्यांनी संपर्क केल्यानंतर आणि अरविंद केजरीवालांच्या नेतृत्वानं प्रभावित होऊन तो आप पक्षात प्रवेश करतो.. आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जिथून येतात त्याच गुजरात राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा एक दावेदार बनतो… ते म्हणजे ईसुदान गढवी.
आप पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी आज गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून ईसुदान गढवी यांचं नाव घोषित केलं होतं. गुजरातच्या मुख्यमंत्री पदासाठी एक सर्वेक्षण करण्यात आलं होतं. ज्यामध्ये ७३ टक्के लोकांनी मेसेजेस, ई-मेल, व्हॉईस नोट्सच्या माध्यमातून गढवींना मुख्यमंत्रिपदासाठी मतं दिली आहेत. त्यामुळे जनमताचा विचार लक्षात घेता ईसुदान गढवींना आपकडून मुख्यमंत्रिपदाचा दावेदार म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
हेही वाचा: Congress: 'बहिण-भावाचं पटत नाहीये, म्हणून दीड महिना होऊनही…''; राहुल-प्रियंकाबाबत भाजप नेत्याचा दावा
आता ईसुदान गढवी कोण आहेत?
ईसुदान गढवी हे ३९ वर्षांचे आहेत. गुजरातच्या द्वारका जिल्ह्यातील खंबालियानजीकच्या पिपालिया गावात त्यांचा जन्म झाला असून ईसुदान गढवी यांची पार्श्वभूमी शेतीशी आहे. जामनगरमध्ये पदवीचं शिक्षण घेतलं तर पत्रकारितेत करिअर घडवण्यासाठी ते अहमदाबादेत आले. पत्रकारितेच्या करिअरविषयी बोलायचे झाल्यास, गढवींनी दूरदर्शनसाठी योजना या विशेष कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं.
पत्रकार असतानाच त्यांनी गुजरातच्या डांग जिल्ह्यातील १५० कोटींच्या वृक्षतोडीसंदर्भातील घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता, ज्यामुळे राज्य सरकारला आरोपींवर कठोर कारवाई करावी लागली. २०१५ साली, ईसुदान गढवी गुजरातमधील एका वृत्त वाहिनीचे सर्वात युवा संपादक बनले. याच चॅनलच्या महामंथन कार्यक्रमाचं त्यांनी सूत्रसंचालन केलं, हा झाला त्यांचा पत्रकार म्हणून प्रवास…
राजकारणात कसा प्रवेश मिळवला?
तर आपचे प्रदेश नेते गोपाल इटालिया यांनी संपर्क केल्यानंतर जून २०२१ मध्ये ईसुदान गढवींनी आप पक्षात प्रवेश मिळवला. गढवी हे गुजरातमधील ओबीसी समाजाचे नेते आहेत.
हेही वाचा: Gulabrao Patil: सुषमा अंधारेंच्या सभेला जळगावात परवानगी नकारली; गुलाबराव पाटील म्हणाले, 'हे नवीन पार्सल…'
ईसुदान गढवींशी संबंधित वाद कोणते?
डिसेंबर, २०२१ मध्ये गुजरातमध्ये पेपरलीक प्रकरणामुळे आप कार्यकर्त्यांनी भाजपा मुख्यालयात घुसून आंदोलन केलं. यावेळी ईसुदान गढवींनी मद्यधुंदावस्थेत कार्यालयातील महिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप त्यावेळी भाजपानं केला. दरम्यान, त्यावेळी ईसुदान गढवींच्या तपासणीत अत्यल्प प्रमाणात अल्कोहोलची मात्रा असल्याचं निष्पन्न झालं होतं.
तर आज पक्षाकडून मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित होताच ईसुदान गढवींनी थेट मोदींना चॅलेंज केलंय. यावेळी ‘तुम्ही देश पाहा, आम्हाला गुजरात द्या’ असं गढवींनी म्हणाले आहेत.
दरम्यान कालच केंद्रीय निवडणूक आयोगानं गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी १ आणि ५ डिसेंबरला मतदान होणार आहे तर ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares