Maharashtra Breaking News: हाजीअली दर्गा येथे दहशतवादी हल्ल्याची धमकी; महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या अपडेट्स एका क्लिकवर! – Loksatta

Written by

Loksatta

Mumbai News Updates, 04 November 2022 : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी वारीनिमित्त शासकीय महापूजा पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत ही पूजा केली. तर यंदा औरंगाबादच्या साळुंखे दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्याबरोबर शासकीय पूजा करण्याचा मान मिळाला. आषाढी आणि कार्तिकी या दोनही महापूजेचा मान मिळवणारे फडणवीस हे पहिजे राजकारणी ठरले आहेत.
राज्यात शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आलेलं सरकार आमदारांच्या पात्रतेच्या मुद्द्यावर कोसळू शकेल, असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात होता. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे सरकार कधी पडणार, याचंच भाकित केलं आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा रंगली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत युती करण्याची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली आहे. दोन्ही नेते लवकरच फोनवरुन चर्चा करणार असून यानंतर निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संभाव्य युतीवर टीका केली असून आम्ही त्यांचा सामना करु असं म्हटलं आहे.
राज्यातील विविध क्षेत्रातील महत्त्वपूर्ण घडामोडी सविस्तर वाचा केवळ एकाच क्लिकवर
Live Marathi News Today, 04 November 2022 : राज्यातील विविध क्षेत्रातील महत्त्वपूर्ण घडामोडी सविस्तर वाचा केवळ एकाच क्लिकवर
 
पिंपरी महापालिकेतील नोकरभरती आणि पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या पदोन्नतीत कोणत्याही प्रकारे गैरप्रकार झाले नसून याबाबतची सर्व कार्यवाही नियमानुसारच झाली असल्याचा दावा पिंपरी-चिंचवड महापालिकेने केला आहे.

सविस्तर वाचा

मागील काही वर्षांपासून आपल्या गाडीला आवडीचा नंबर घेण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. नवी मुंबई शहरात देखील हा ट्रेंड वाढत असून यावर्षी जानेवारी ते ऑक्टोबर पर्यंत एकूण ३४२८ जणांनी आपल्या आवडीचा नंबर घेतला असून यासाठी हजारो ते लाखो रुपये मोजण्यात आलेले आहेत.

सविस्तर वाचा
वीज पुरवठा खंडित करण्याची भीती दाखवून फसवणुकीचे सत्र कायम असून सायबर चोरट्यांनी एका महिलेची एक लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात विरोधात माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा
वीज पुरवठा खंडित करण्याची भीती दाखवून फसवणुकीचे सत्र कायम असून सायबर चोरट्यांनी एका महिलेची एक लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात विरोधात माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

भायखळा येथील जे.जे.रुग्णालयातील डी.एम.पेटीट या १३० वर्षे जुन्या इमारतीच्या खाली भुयार आढळले आहे. या इमारतीचा परिसर हा नर्सिंग कॉलेजचा असून सापडलेला भुयारी मार्ग हा प्रसूती विभाग ते लहान मुलांच्या विभागापर्यंत आहे.

सविस्तर वाचा

महालक्ष्मी येथील हाजीअली दर्गा येथे दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली असून यासंदर्भातील धमकीचा फोन गुरुवारी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला. हा फोन उल्हासनगरमधून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या फोननंतर तत्काळ हाजीअली परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

सोलापुरमधील मंगळवेढा येथे आवताडे शुगर्स प्रथम गळीत हंगाम शुभारंभ व शेतकरी मेळाव्यास आज(शुक्रवार) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाषणादरम्यान त्यांच्या मी पुन्हा येईन, या गाजलेल्या वाक्याचा उल्लेख केला. शिवाय, आम्ही करेक्ट कार्यक्रम केला, असं म्हणत महाविकास आघाडीला टोलाही लगावला. वाचा सविस्तर बातमी…
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अनुयायी मॅडेलीन स्लेड उर्फ मीराबेन यांनी लिहिलेल्या “द स्पिरिट्स पिलग्रिमेज” या साहित्यकृतीचा अनुवाद आणि प्रकाशनाच्या परवान्यावर आक्षेप मागवण्यासाठी जाहीर नोटीस काढा, असे आदेश उच्च न्यायालयाने स्वामित्त्वहक्क निबंधकांना दिले आहेत.

सविस्तर वाचा

मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत. पेडणेकर यांनी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मिळाणाऱ्या सामान्य नागरिकांच्या सदनिका हस्तगत केल्या आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. तर दुसरीकडे पेडणेकर यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. दरम्यान आज किरीट सोमय्या यांनी या पार्श्वभूमीवर निर्मल नगर पोलीस स्टेशन, वांद्रे पूर्व येथे जाऊन किशोरी पेडणेकरांविरोधात फसवणूक, खोटारडेपणा आणि झोपडपट्टीतील रहिवाशांची एसआरए सदनिका हडप केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. वाचा सविस्तर बातमी…
राज्यातील सरकारी शाळांची गुणवत्ता, तेथील कार्यक्षमता, सोयी-सुविधा याचा विचार करून जाहीर करण्यात येणाऱ्या ’कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकात’ यंदा महाराष्ट्राने ९२८ गुण संपादन करत केरळ आणि पंजाबसह संयुक्तरीत्या प्रथम क्रमांकावर येण्याचा बहुमान पटकावला आहे.

सविस्तर वाचा
शिंदे गटातील आमदार संजय बांगर पुन्हा एकदा वादात अडकले असून मंत्रालयाच्या गेटवर पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. आपल्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांना अडवल्याने संजय बांगर यांनी पोलीस कर्मचाऱ्याला जाब विचारत शिवीगाळ केल्याचं सांगितलं जात आहे. संजय बांगर यांनी मात्र आरोप फेटाळले असून, सीसीटीव्ही फूटेज तपासून पाहा असं सांगितलं आहे. दरम्यान, यावर ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
सविस्तर बातमी
Madhya Pradesh Road Accident: मध्य प्रदेशात बसने वाहनाला दिलेल्या धडकेत ११ कामगारांचा मृत्यू झाला आहे. बेतूल येथे गुरुवारी रात्री हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे सर्व ११ कामगार महाराष्ट्रातील होते. बसने दिलेल्या धडकेनंतर कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. पोलिसांना पत्रा कापून काही मृतदेह बाहेर काढावे लागले. एका जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सविस्तर बातमी
शिंदे गटातील हिंगोलीचे आमदार संजय बांगर पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. संजय बांगर यांनी मंत्रालयाच्या गेटवरील पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. मंत्रलायात जाताना सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलीस कर्मचाऱ्याने थांबवत पास काढण्यास सांगितल्याने संजय बांगर संतापले आणि शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. मला ओळखत नाही का? अशी विचारणा संजय बांगर यांनी केल्याचं वृत्त ‘एबीपी माझा’ने दिलं आहे.
सविस्तर बातमी
शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. एका महिला पत्रकाराने कुकू लावलं नसल्याने संभाजी भिडे यांनी तिच्याशी बोलण्यास नकार दिला. “तू आधी कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलतो” असं विधान त्यांनी केलं असून यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात संभाजी भिडेंविरोधात काँग्रेस महिला आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं.
सविस्तर बातमी
गुजरात राज्यातील साखर कारखान्यांप्रमाणे न्याय ऊसदर मिळावा, ऊस वजनातील काटेमारी थांबवण्यात यावी, आधी ऊसदर जाहीर करावा आणि नंतरच गाळप हंगाम सुरू करावा आदी मागण्यांसाठी विविध शेतकरी संघटना आक्रमक होवून एकजूट साधत असल्याने शेतकरी संघटनांच्या आंदोलनाचा भडका उडण्याची चिन्हे आहेत.

सविस्तर वाचा…
लीव्ह इन रिलेशनशीपमध्ये मित्रासोबत राहणे एका बारबालेला महागात पडले आहे. दोन वर्षांपासून ही बारबाला रिक्षाचालक मित्रासोबत करंजाडे वसाहतीमध्ये राहत होती. करंजाडे वसाहतीमधील सेक्टर ६ येथील गणेश प्लाझा कॉ. ॲप सोसायटीमध्ये या बारबालेवर मित्रानेच हाताबुक्याने मारहाण केली.

सविस्तर वाचा
चेंबूर ते संत गाडगे महाराज मोनोरेल प्रकल्पातील प्रवासी संख्या वाढविण्यासाठी मोनोरेल, मेट्रो ३ आणि उपनगरीय रेल्वेशी जोडण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे.संत गाडगे महाराज चौक मोनोरेल स्थानक मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) मार्गिकेतील महालक्ष्मी स्थानक तसेच महालक्ष्मी रेल्वे स्थानकाशी पादचारी पुलासह ‘ट्रॅव्हलेटर’ अर्थात सरकत्या मार्गाने जोडण्यासाठी एमएमआरडीएने निविदा मागविल्या आहेत.

सविस्तर वाचा
दरवर्षी जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात हजारो माणसे मरतात, शेतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. याचे कारण म्हणजे भारतात लागू करण्यात आलेली सरसकट शिकारबंदी हे होय. जगातील कोणत्याही देशात अशी शिकारबंदी नाही.

सविस्तर वाचा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महाप्रबोधन यात्रेनिमित्त धरणगावात आयोजित जाहीर सभेत पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि त्यांच्या समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी धरणगाव येथील पोलीस ठाण्यात युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा
अधिसभेचा कार्यकाळ संपुष्टात आला असल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघासाठी तब्बल ९८ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.पुणे विद्यापीठाचे पदवीधर तसेच पुणे विद्यापीठ कार्यक्षेत्रात वास्तव्यास असलेल्या आणि पुणे विद्यापीठाची स्थापना होण्यापूर्वी मुंबई विद्यापीठाचे पदवीधर असलेल्या व्यक्ती विद्यापीठात नोंदणीकृत पदवीधर म्हणून नाव नोंदविण्यास देण्यात आलेली मुदत गुरुवारी संपली.

सविस्तर वाचा

कल्याण डोंबिवली पालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीतर्फे दुर्गाडी खाडी किनारी उभारण्यात येत असलेल्या नौदल संग्रहालयात आरमारी सामुग्री बरोबर टी-८० ही नौदलातून निवृत्त झालेली युध्द नौका विराजमान करण्याचा निर्णय पालिका स्मार्ट सिटी कंपनी आणि नौदल अधिकाऱ्यांच्या एकत्रित बैठकीत होऊन, या विषयीचा सामंजस्य करार दोन्ही बाजुने करण्यात आला.

सविस्तर वाचा

आमदार प्रताप सरनाईकांवर ईडी कडून कारवाई सुरू होती. सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या तब्बल ११.४ कोटींची मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात ताब्यात घेतली होती. मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे आणि भाजपाचे सरकार राज्यात आल्याने आणि सत्ता बदल झाल्यानंतर सरनाईकांवरील कारवाई टळणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता ती मालमत्ता जप्त करण्यासाठी ईडीला हिरवा कंदील मिळाल्याने, शिंदे गटासोबत असणाऱ्या प्रताप सरनाईकांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्वीटद्वारे सरनाईकांना टोला लगावला आहे. वाचा सविस्तर बातमी…
कॅसलमील येथील मिनाताई ठाकरे चौक उड्डाणपूलावरून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर शुक्रवारी काँक्रिटीकरणाचे काम केले जाणार आहे. त्यामुळे उड्डाणपूलावरून कोर्टनाका, खोपटच्या दिशेने वाहतूकीस प्रवेशबंदी करण्यात आली

सविस्तर वाचा
ट्विटरवर ताबा मिळताच एलॉन मस्क यांनी नोकरकपातीचे संकेत दिले होते. याबाबत नवी माहिती समोर येत आहे. कामावरुन काढण्यात आलं आहे की नाही, याबाबत ट्विटरकडून ईमेलद्वारे आज कर्मचाऱ्यांना कळवण्यात येणार आहे, असं वृत्त ‘सीएनएन’नं दिलं आहे.

सविस्तर बातमी वाचा…
“महाराष्ट्राचा विकास करणारे सर्व प्रकल्प गुजरातला पळवले. त्याबाबत घोषणा करताच गुजरातची निवडणूक लागली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातदेखील प्रकल्पांबाबत घोषणा होत आहेत. त्यामुळे कदाचित महाराष्ट्रातही विधानसभेची निवडणूक लागेल” असे भाकित अरविंद सावंत यांनी वर्तवले आहे.

सविस्तर बातमी वाचा…
महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार लवकरच पडेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या सरकारच्या स्थिरतेबाबत मोठं विधान केलं आहे. “जोपर्यंत १४५ आमदार एकनाथ शिंदेंच्या पाठिशी आहेत, तोपर्यंत हे सरकार चालेल. ज्यादिवशी हा आकडा कमी होईल, त्या दिवशी हे सरकार जाईल”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

सविस्तर बातमी वाचा…

राज्यात गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा रंगली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत युती करण्याची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली आहे. दोन्ही नेते लवकरच फोनवरुन चर्चा करणार असून यानंतर निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संभाव्य युतीवर टीका केली असून आम्ही त्यांचा सामना करु असं म्हटलं आहे. ते पंढरपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. वाचा सविस्तर बातमी…

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री. विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी वारीनिमित्त शासकीय महापूजा पार पडली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली. यंदा औरंगाबादच्या साळुंखे दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्याबरोबर शासकीय पूजा करण्याचा मान मिळाला. आषाढी आणि कार्तिकी या दोनही महापूजेचा मान मिळवणारे फडणवीस हे पहिजे राजकारणी ठरले आहेत. वाचा सविस्तर बातमी…

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री. विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी वारीनिमित्त शासकीय महापूजा पार पडली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली. यंदा औरंगाबादच्या साळुंखे दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्याबरोबर शासकीय पूजा करण्याचा मान मिळाला.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares