Nandurbar : वेचणीसाठी आलेल्या कापसावर चोरांचा डोळा, तर दुसरीकडे मजुरांअभावी कापूस – ABP Majha

Written by

By: भिकेश पाटील, एबीपी माझा | Updated at : 05 Nov 2022 10:16 AM (IST)
Edited By: गणेश लटके
Nandurbar
Nandurbar Agriculture News : राज्यातील अनेक जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टी (Rain) झाली आहे. याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना (Farmers) बसला आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं वाया गेली आहेत. उत्तर महाराष्ट्रात देखील अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्याला देखील परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला होता. या पावसातूनही काही शेतकऱ्यांची पिकं वाचली आहेत. सध्या काही ठिकाणी कापूस (Cotton) काढणीला आला आहे. तर काही ठिकाणी कापसाची काढणी सुरु आहे. मात्र, या वेचणीसाठी आलेल्या कापसावर चोरांचा डोळा आहे. तर दुसरीकडं मजुरांअभावी कापूस वेचणीत खोडा येत आहे.
नगदी पीक म्हणून कापसाकडे पाहिले जाते. त्यासोबतच कापसाला मिळणाऱ्या चांगल्या दरामुळं यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कापूस पिकाकडं कल दाखवला होता. कापसाची मोठ्या प्रमाणात लागवडही केली होती. आता कापूस वेचणीला आला आहे. मात्र, शेतकऱ्यांसमोर कापूस चोरीची मोठी समस्या उभी राहिली आहे.  कापसाला मिळत असलेल्या चांगल्या दरामुळं चोरट्यांनी आता आपला मोर्चा कापूस चोरीकडे वळवला आहे. चोरट्यांच्या टोळ्या रात्री शेतात घुसून कापूस वेचून घेऊन जात आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तर दुसरीकडं मजूर मिळत नसल्यानं वेळेत कापसाची वेचणी होत नाही. हेच चोरट्यांच्या पथ्यावर पडत आहे. 


रोजगाराच्या शोधात मोठ्या प्रमाणात मजुरांनी गुजरात आणि मध्य प्रदेश मध्ये स्थलांतर केले आहे. त्यामुळं स्थानिक मजूर नसल्यानं शेतकऱ्यांना 40 ते 45 किलोमीटरवरुन मजूर आणावे लागत आहेत. त्यातच मंजुरांच्या वाहतुकीसाठी लागणारा खर्च वाढला आहे. यामुळं जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून, कापूस चोरी करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मजूर टंचाईमुळं कापूस वेचणी वेळेवर होत नसल्यानं हे चोरट्यांच्या पथ्यावर पडले आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. किरकोळ कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी केवळ शेतकऱ्यांकडूनच कापूस खरेदी करावा अशी अट प्रशासनाने घालून द्याव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नंदूरबार जिल्ह्यात खरीप हंगामात कापसाच्या खालोखाल मिरचीची लागवड केली जाते. परतीच्या पावसामुळं कापूस आणि मिरचीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मिरची आणि कापूस पावसात सापडल्यानं कापसाची काढणी आणि मिरचीची तोडणी करणं शेतकऱ्यांना क्रम प्राप्त आहे. त्यात मजूर मिळत नसल्यानं पावसात सापडलेली मिरची आणि कापूस खराब होत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:
यशोगाथा! दुष्काळी भागात सीताफळाची बाग फुलवली; दीड एकरातून 12 लाखांचे उत्पन्नाची अपेक्षा
Ravikant Tupkar : बुलढाण्यात उद्या सोयाबीन-कापूस उत्पादकांचा ‘एल्गार’, सर्वांनीचं बळीराजाच्या पाठिशी उभं राहावं, तुपकरांचं आवाहन
Pakistan’s Red Chilli : अशियातील मिरची राजधानीला पुराचा मोठा फटका, पाकिस्तानात दर वाढण्याची शक्यता 
Seed Subsidy : रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे खरेदीत 50 टक्के अनुदान, ‘या’ सरकारचा मोठा निर्णय
Lumpy Skin : लम्पीमुळं दोन महिन्यांपासून धुळ्यातील गुरांचा आठवडे बाजार बंद, 35 कोटींची उलाढाल ठप्प 
Andheri Bypolls: निवडणूक आयोगाचा भन्नाट प्रयोग; अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ‘व्होट फ्रॉम होम’ला चांगला प्रतिसाद
Chandrakant Khaire: काँग्रेस आमदारांच्या फुटीबाबत केलेले वक्तव्य खैरेंकडून मागे; दिलगिरीही व्यक्त केली
T20 World Cup 2022: इंग्लंड सेमीफायनलमध्ये! श्रीलंकेच्या पराभवासह ऑस्ट्रेलियाचंही आव्हान संपुष्टात
Sharad Pawar Speech In Shirdi: संकुचित विचारांच्या सत्ताधाऱ्यांमुळे राज्य अधोगतीला जाऊ शकते, पवारांचा हल्लाबोल; वाचा भाषणातील प्रमुख मुद्दे
Uddhav thackeray : राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares