Sugarcane industry : मोदीच्या निर्णयामुळे ऊस कारखानदारी जीवंत राहिली; उपमुख्यमंत्री फडणवीस – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
मंगळवेढा : मंगळवेढ्यातील प्रलंबित असलेल्या मागण्यांसंदर्भात आ.आवताडे यांनी केलेल्या कामाच्या मागण्याची नोंद घेतली असून मागणी केलेले सर्व प्रश्न मार्गी लावून भविष्यात कामाच्या भरोश्यावर पुन्हा मत मागण्यास जावू असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी तालुक्यातील नंदूर येथे बोलताना व्यक्त केले.
आवताडे शुगर अॅन्ड डिस्टलरीज प्रा.लि.च्या प्रथम गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे होते.यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,मोदीच्या निर्णयामुळे ऊस कारखानदारी जीवंत राहिली.त्यानंतर सातत्याने एफ आर पी वाढवण्यात आली.एफ आर पी देण्यासाठी सक्षम करण्यासाठीची मिनीमम सेलिंग प्राईजचा आध्यादेश काढला.कारखानदारांनी उपपदार्थावर भर दिला पाहिजे,कारण इथेनालच्या माध्यमातून दोन पैसे मिळाल्याने वेळेत एफ आर पी शक्य होते.मोदीना साखर कारखानदारीतील काय कळते म्हणणारे आज मान्य करतात की आता पर्यंत सर्वाधिक निर्णय घेतले,
सातत्याच्या पावसाने नुकसान झाले तरी 65 मि.मी अट न ठेवता मदत सुरू केली.मागील सरकारने नियमित कर्ज भरणाय्रा शेतकऱ्यांना 50 हजार देण्यास टाळाटाळ केली मात्र शेवटी पांडूरंगाच्या इच्छा होती म्हणून शेतकय्राचे हिताचे निर्णय घेणारे सरकार अस्तित्वात आहे.मुखमंत्री एकनाथ शिंदे नी एका क्लिकवर 7 हजार कोटीची मदत केली.24 गावाच्या योजनेसाठी स्व सुधाकर परिचारक यांच्या प्रचारात मी शब्द दिला पण सरकार आले नाही पण मी खात्रीने सांगीतले की मी पुन्हा येईन आता पाण्यासाठीच्या सगळ्या मान्यता घेतल्या नवीन दरसुचीनुसार प्राकलन आल्यानंतर मंजूरी घेवू लोकांसमोर ताठ मानेने जाता येईल, बसवेश्‍वर स्मारक देखील पुर्ण करू चोखोबाच्या स्मारक आराखड्याला निधी देवूनही काम झाले नाही
नव्या आराखड्याला मान्यता देवून हा प्रश्न देखील सोडवणार आहे.पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील म्हणाले की,या भागाच्या विकासासाठी आ.आवताडेनी झोकून दिले.त्यास उपमुख्यमंत्रीच पाठबळ देत आ.आवताडेचे समाधान केले,केंद्र सरकारमुळे साखर कारखानदारी टिकून आहे.मी शेतकऱ्यांचा नेता भासवून शेतकरी मागे फिरत राहिला पाहिजे या भुमिकेतून खेळवत ठेवले.दिल्लीत शिष्टमंडळ न्यायचे आणि रिकाम्या हाती परत आणायचे,20 वर्षे साखर कारखानदारी सांभाळायला दिली त्यानीच ती विकायला निघाली,
याचे प्रायश्चित्त कोण करणार,कारखानदारीत आवताडे नी सुखाचा जीव दुखात घातला. जो उद्योग हातात नाही त्या उद्योगात दर वाढ झाल्यास कोण आंदोलन करते का ?असा प्रश्न करत कारखानदारी शेतकय्राच्या हातात आहे.सहकार कसा चालवायचे हे परिचारकाकडून शिकले पाहिजे,प्रास्ताविकात आ.आवताडे म्हणाले की,महाविकास सरकारचा करेक्ट कार्यक्रम करून पांडुरंग आशिर्वाद घेताना उपमुख्यमंत्र्यामुळे बंद झालेला नंदूरचा कारखाना सुरू केला.त्यातून हजारोना रोजगार मिळाला.तीन महिन्यात 600 कोटीचा निधी मतदारसंघासाठी दिला असून मंगळवेढ्याचे राजकारण पाण्यावर झाले या पाण्याने राजकारणाची आग भडकावली.718 कोटीच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी उपमुख्यमंत्रीच तगादा लावत आहे.
बसवेश्वर व चोखोबा स्मारक,भिमा नदीच्या पात्रात कोल्हापूर पध्दतीचे बंधारे,गादेगाव व निंबोणी ग्रामीण रूग्णालय,ग्रामीण रूग्णालयाचे सामान्य रूग्णालयात वर्ग,अतिवृष्टीने नुकसान झालेल्या सर्वच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी,पौट साठवण तलावाचा प्रश्न,माण नदीला कालव्याचा दर्जा देण्याची मागणी करताना ऊसदराचा प्रश्न देखील सोडवण्याची मागणी केली.यावेळी खा.जयसिंध्देश्वर शिवाचार्य महास्वामी,खा.रणजीतसिंह नाईक निंबाळकर,आ.सचिन कल्याणशेट्टी,आ.सुभाष देशमुख,आ.रणजीतसिंह मोहिते-पाटील,आ.राम सातपुते,आ.शहाजी पाटील,लक्ष्मण ढोबळे,प्रशांत परिचारक,हर्षवर्धन पाटील,उद्योजक संजय आवताडे,सचिन जाधव,शशिकांत चव्हाण,विष्णुपंत आवताडे,सोमनाथ आवताडे,विनायक यादव,कार्यकारी संचालक मोहन पिसे,ज्ञानेश्वर बळवंतराव,विजयराज डोंगरे,सरोज काझी,आंबादास कुलकर्णी,प्रदीप खांडेकर,सुरेश भाकरे,भारत निकम आदी उपस्थित होते.सुत्रसंचालन श्वेता हुल्ले यानी तर आभार बापू मेटकरी यांनी केले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares