आंदोलन अंकुश संघटनेने जय शिवराय संघटनेशी संबंध तोडले; शेतकरी संघटनांचे ऐक्य भंगले – Loksatta

Written by

Loksatta

कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्व भागात प्रभाव असलेल्या जय शिवराय व आंदोलन अंकुश या दोन्ही संघटनेतील मतभेद शनिवारी समोर आले. जय शिवराय संघटनेने शरद सहकारी साखर कारखान्याची पहिली उचल २९०० रुपये प्रमाणे घेण्यास संमती दर्शवली आहे. याला आक्षेप घेऊन आंदोलन अंकुश संघटनेने जय शिवराय संघटनेची ही भूमिका मान्य नसल्याचे सांगून त्यांच्याशी संबंध तोडल्याचे आज जाहीर केले.
हेही वाचा- एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा मूळ प्रस्ताव कुणी दिला? फडणवीसांनी दिलेलं उत्तर ऐकून बसेल धक्का
कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना. आंदोलन अंकुश व जय शिवराय शेतकरी संघटना यांनी साखर कारखान्यांची ऊस वाहतूक रोखण्याचे सत्र सुरू केले आहे. जय शिवराय संघटनेने काल रात्री शरद कारखान्याची सुमारे १०० वाहने दोन ठिकाणी रोखली होती. कारखान्याचे शेती अधिकारी, पोलीस अधिकारी व जय शिवराय संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांच्यात चर्चा झाली.
कारखान्याने हंगाम संपल्यानंतर उताऱ्यानुसार सर्व रक्कम देणार आहे. तुर्त २९०० रुपये प्रमाणे पहिली उचल देत असल्याचे सांगितले. परिस्थिती लक्षात घेऊन माने यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यावर आंदोलन अंकुशचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी गेल्या गळीत हंगामातील उसाला अधिक रक्कम मिळावी व यावर्षी एफआरपी पेक्षा जादा रक्कम देण्यात यावी, ही संघटनेची भूमिका असताना जय शिवरायने दराबाबत तडजोड केल्याचा आरोप त्यांच्याशी संबंध तोडले असल्याचे जाहीर केले.
हेही वाचा- “सावित्रीबाई फुले मोठं कुंकू लावायच्या, मग..,” संभाजी भिडेंच्या वादग्रस्त विधानाचा भुजबळांनी घेतला समाचार
शेतकरी संघटनात फूट
या निर्णयामुळे जिल्ह्याच्या पूर्व भागात प्रभाव असलेल्या जय शिवराय, आंदोलन अंकुश व बळीराजा या तिन्ही संघटनेतील एकोपा दूर होऊन फूट पडल्याचे आज स्पष्ट झाले. दरम्यान शिवाजी माने यांनी आम्ही आंदोलन स्थगित ठेवले आहे. चुडमुंगे यांचा गैरसमज झाला आहे. दत्त दालमिया कारखान्याविरोधात पुन्हा आंदोलन सुरू करणार आहोत, असे स्पष्ट करून त्यांनी चुडमुंगे यांनी तडकाफडकी संबंध तोडण्याचा निर्णय घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares