राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार , जाणून घ्या दिवसभरात – ABP Majha

Written by

By: एबीपी माझा वेब टीम | Updated at : 07 Nov 2022 05:00 AM (IST)
Edited By: धनाजी सुर्वे
Top News
Todays Headline : राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार आहे.  संध्याकाळी साडेसात वाजता नांदेडच्या देगलूरमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचं आगमन होईल.   सिल्लोडमध्ये आज आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदेंची एकाचवेळी सभा होणार आहे. याबरोबरच मोदी सरकारने दिलेल्या दहा टक्के आर्थिक आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयात आज निर्णय येणार आहे. आदित्य ठाकरे संध्याकाळी सहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील मोकळ्या जागेत शेतकऱ्यांशी संवाद साधतील. या महत्वाच्या बातम्यांसह आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम, घटना-घडामोडींबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची थोड्यात माहिती देणार आहोत. 
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार 
आज राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार आहे.  संध्याकाळी साडेसात वाजता नांदेडच्या देगलूरमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचं आगमन होईल. तिथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येईल. तिथेच राहुल गांधी यांचं छोटेखानी भाषण होईल. 
 
सिल्लोडमध्ये  आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदेंची सभा 
 सिल्लोडमध्ये आज आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदेंची एकाचवेळी सभा होणार आहे.  आदित्य ठाकरे संध्याकाळी सहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील मोकळ्या जागेत शेतकऱ्यांशी संवाद साधतील. तर  श्रीकांत शिंदेंची सायंकाळी चार वाजता सिल्लोडच्या जिल्हा परिषद ग्राउंडवर सभा होणार आहे. 
 
 आदित्य ठाकरेंचा आजपासून शेतकरी संवाद 
आदित्य ठाकरे अकोला, बुलडाणा आणि औरंगाबादला शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. 
 
केंद्र सरकारने दिलेल्या आर्थिक आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात निकाल 
 मोदी सरकारने दिलेल्या दहा टक्के आर्थिक आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयात आज निर्णय येणार आहे.  सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने दीर्घ सुनावणी केल्यानंतर हा निकाल राखून ठेवला होता. आज 103 वी घटनादुरुस्ती वैध की अवैध याचा निर्णय होणार आहे.  सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या निवृत्तीआधी महत्त्वाचा निर्णय आज येणार आहे.  
 
 ठाकरे गटाचे आंदोलन 
 गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले होते. याविरोधात शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने घाटकोपर पूर्व रेल्वे स्थानक जवळ सकाळी दहा वाजता निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. 
 
 चित्रा वाघ यांचा महाराष्ट्र दौरा
भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर चित्रा वाघ यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला आजपासून सुरुवात होणार आहे. बुलडाण्याच्या सिंदखेडराजा येथे जिजाऊंना अभिवादन करुन आज या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. तसेच त्या महिला मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी दहा वाजता चित्रा वाघ यांची पत्रकार परिषद होणार आहे. 
अंधेरी येथे भाजपची सभा 

REELS
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात भीषण अपघात, तीन मुलींसह एकाचा मृत्यू  
Maharashtra News Updates : ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये जितेंद्र आव्हाड, हर हर महादेव चित्रपट न पाहण्याचं प्रेक्षकांना आवाहन
Bharat Jodo : राहुल गांधींच्या हाती तळपती मशाल, हजारो मशालींच्या तेजात भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल
Shrikant Shinde: उद्धव ठाकरे रुग्णालयात असतांना ‘युवराज’ पर्यटनात व्यस्थ होते; श्रीकांत शिंदेंची टीका
Maharashtra police : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! गृह विभागाचे आदेश
Congress Twitter: काँग्रेस पक्षाचं ट्विटर हँडल ब्लॉक करण्याचे कोर्टाचे आदेश- काय आहे प्रकरण
Vasai Crime : बहिणीच्या लग्नासाठी जमवलेल्या पैशावर भावाचा डल्ला, 26 लाख रुपयांची चोरी
Automatic Car Cover: बटन दाबताच फक्त 30 सेकंदात तुमची कार होणार ऑटोमॅटिक कव्हर, जाणून घ्या कसं
‘वरळीत पोटनिवडणूक करा, मग कळेल मशाल आहे की चिलीम’; आशिष शेलारांचं ठाकरेंना आव्हान 
Aurangabad NCP Protest : औरंगाबादेत Abdul Sattar यांच्या घरावर राष्ट्रवादीकडून दगडफेक

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares