राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार, जाणून घ्या दिवसभरातील घडामोडी – ABP Majha

Written by

By: एबीपी माझा वेब टीम | Updated at : 07 Nov 2022 05:00 AM (IST)
Edited By: धनाजी सुर्वे
Top News
Todays Headline : राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार आहे.  संध्याकाळी साडेसात वाजता नांदेडच्या देगलूरमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचं आगमन होईल.   सिल्लोडमध्ये आज आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदेंची एकाचवेळी सभा होणार आहे. याबरोबरच मोदी सरकारने दिलेल्या दहा टक्के आर्थिक आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयात आज निर्णय येणार आहे. आदित्य ठाकरे संध्याकाळी सहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील मोकळ्या जागेत शेतकऱ्यांशी संवाद साधतील. या महत्वाच्या बातम्यांसह आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम, घटना-घडामोडींबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची थोड्यात माहिती देणार आहोत. 
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार 
आज राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार आहे.  संध्याकाळी साडेसात वाजता नांदेडच्या देगलूरमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचं आगमन होईल. तिथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येईल. तिथेच राहुल गांधी यांचं छोटेखानी भाषण होईल. 
 
सिल्लोडमध्ये  आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदेंची सभा 
 सिल्लोडमध्ये आज आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदेंची एकाचवेळी सभा होणार आहे.  आदित्य ठाकरे संध्याकाळी सहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील मोकळ्या जागेत शेतकऱ्यांशी संवाद साधतील. तर  श्रीकांत शिंदेंची सायंकाळी चार वाजता सिल्लोडच्या जिल्हा परिषद ग्राउंडवर सभा होणार आहे. 
 
 आदित्य ठाकरेंचा आजपासून शेतकरी संवाद 
आदित्य ठाकरे अकोला, बुलडाणा आणि औरंगाबादला शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. 
 
केंद्र सरकारने दिलेल्या आर्थिक आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात निकाल 
 मोदी सरकारने दिलेल्या दहा टक्के आर्थिक आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयात आज निर्णय येणार आहे.  सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने दीर्घ सुनावणी केल्यानंतर हा निकाल राखून ठेवला होता. आज 103 वी घटनादुरुस्ती वैध की अवैध याचा निर्णय होणार आहे.  सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या निवृत्तीआधी महत्त्वाचा निर्णय आज येणार आहे.  
 
 ठाकरे गटाचे आंदोलन 
 गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले होते. याविरोधात शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने घाटकोपर पूर्व रेल्वे स्थानक जवळ सकाळी दहा वाजता निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. 
 
 चित्रा वाघ यांचा महाराष्ट्र दौरा
भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर चित्रा वाघ यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला आजपासून सुरुवात होणार आहे. बुलडाण्याच्या सिंदखेडराजा येथे जिजाऊंना अभिवादन करुन आज या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. तसेच त्या महिला मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी दहा वाजता चित्रा वाघ यांची पत्रकार परिषद होणार आहे. 
अंधेरी येथे भाजपची सभा 

REELS
Nagpur Crime : धक्कादायक! स्कूल व्हॅन चालकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार, आरोपीला अटक
Maharashtra News Updates : पुण्यात राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा
Aaditya Thackeray : स्वतःचा इमान न विकणाऱ्या सच्च्या शिवसैनिकाला मिठी मारायला आलोय: आदित्य ठाकरे
Sangli News : इस्लामपूर शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी माजी नगराध्यक्ष निशिकांत भोसले उतरले रस्त्यावर!
Maharashtra Politics: श्रीकांत शिंदेंच्या सभेत आदित्य ठाकरेंचे कार्टून; अब्दुल सत्तारांनी सांगितले कारण
EWS Reservation: 10 टक्के आर्थिक आरक्षणाचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाकडून मोकळा, कोणते न्यायमूर्ती काय म्हणाले?
EWS Reservation: सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल, EWS आरक्षण वैधच, घटनापीठाचा 3 विरुद्ध 2 असा निर्णय
Navneet Rana News : आरोपी महाराष्ट्रातच आहे ना? नवनीत राणांविरोधात कारवाई होत नसल्याने शिवडी कोर्टाची विचारणा
EWS आरक्षण हा बौद्धिकदृष्ट्या भ्रष्ट निर्णय, मागच्या दाराने मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न : प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
T20 world Cup 2022: सूर्यासमोर 20वं षटक टाकताना गोलंदाज जोडतात हात; अवघ्या 18 चेंडूत ठोकल्यात ‘इतक्या’ धावा

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares