शाळा बंदचा निर्णय मागे घ्या – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
01980
चंदगड ः नायब तहससीलदार हेमंत कामत यांच्याकडे निवेदन देताना नितीन पाटील, गोविंद पाटील, रणजित गावडे व विविध शाळेचे विद्यार्थी.
————————————-
शाळा बंदचा निर्णय मागे घ्या
चंदगडला बळीराजा शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाने तहसीलवर मोर्चा
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ७ ः वीस पटाखालील शाळा बंद करण्याचा शासनाचा निर्णय म्हणजे वाडी-वस्तीवरील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न आहे. शिक्षण हक्क कायद्याचा भंग करणारा हा निर्णय शासनाने मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष नितीन पाटील यांनी दिला. संघटनेच्या नेतृत्वाने आज येथे तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या वेळी उपस्थितांसमोर त्यांनी या प्रश्नाची दाहकता मांडली.
जुन्या बस स्थानकापासून मोर्चाला सुरुवात झाली. प्राथमिक शिक्षक, विद्यार्थी, समाजातील जाणकार व्यक्ती, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. शिक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, गोरगरिबांच्या मुलांना शिकू द्या, वाडी-वस्तीवर शिक्षण मिळालेच पाहिजे, शिक्षणाचा खेळखंडोबा करू नका अशा आशयाचे फलक घेऊन विद्यार्थी सहभागी झाले होते. गुरुवार पेठ, रवळनाथ मंदिर मार्गे, नवीन वसाहत, न्यायालयाजवळून मोर्चा तहसील कार्यालयावर आला. नितीन पाटील यांनी या निर्णयाचा ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा परिणाम स्पष्ट केला. नायब तहसीलदार हेमंत कामत यांना निवेदन दिले. गोविंद पाटील, धनाजी पाटील, सुभाष बेळगावकर, शंकर मनवाडकर, प्रकाश पाटील, प्रकाश बोकडे, प्रवीण साळुंखे यांनी मनोगते व्यक्त केले. रणजित गावडे, विक्रम मुतकेकर, बाळासाहेब हळदणकर, गोविंद मासरणकर, कृष्णा पाटील, अनिल दळवी, सुरेश सातवणेकर आदी सहभागी झाले होते.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares